Friday, 8 June 2018

तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्वी एक हजार रु . बोनस दोन हजार करावा - किशोर तिवारी

तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्वी एक हजार रु . बोनस दोन हजार करावा - किशोर तिवारी 

दिनांक -८ जुन २०१८

नाफेडने तूर खरेदी थांबवल्यानेच शेतकरी अडचणीत आला होता  त्यामुळे राज्य सरकारने केंद्राची एजन्सी बनून तूर खरेदी करावी किंवा भावातील भावांतर देण्याची मागणी कै वसंतराव नाईक  स्वालंबन मिशनने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती,दरम्यान आता या मागणीला मान्य करुन सरकारने तूर तसेच हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपयाचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी स्वागत केले आहे मात्र  सध्या तुरीचा हमीभाव पाच हजार ४५० रुपये आहे. दुसरीकडे बाजारभाव मात्र साडेतीन ते चार हजार रुपये आहे. प्रत्येक क्विंटल मागे शेतकऱ्यांचे जवळपास दिड ते दोन हजार रुपयांचे नुकसान होणार असल्याने सरकारने घोषीत प्रति क्विंटल एक हजार रुपयाचे अनुदान दोन हजार करावे अशी  मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे लाऊन ठरली असुन   यासाठी आपण पाठपुरावा सुरुच ठेवणार अशी माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 
विदर्भ व मराठवाड्यात हजारो शेतकऱ्यांनी  तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती व त्यांची तूर मागील दोन महिन्यापासून यार्डात व घरी पडली आहे त्यातच सरकारने तूर डाळ ३५ रु किलोने देणार अशी घोषणा मागिल आठ्वड्यात केल्याने तुरीचे भाव २०० ते ३०० रुपये व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात  पाडले होते सरकारने तूर खरेदीची तारीख वाढवून देत  नसेल तर हमी भाव तसेच बाजार भावातील फरकची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची  भावांतर योजना लागू करण्याची मागणी किशोर तिवारी  यांनी केली होती मात्र आता सरकारने तूर तसेच हरभरा उत्पादकांना फरकाचे एक हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याची घोषणा केल्याने  विदर्भ व मराठवाड्यात तूर उत्पादक शेतकरी कमीतकमी  प्रति क्विंटल एक हजार रुपयाचा तोटा सहन  करणार आहे एकीकडे बँका नवीन पीककर्ज देत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असतांना हा निर्णय अन्यायकारक असुन शेतकऱ्यांची नाराजी आमंत्रीत  करणारा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विनंती सहानुभूतीने  विचार करावा असे साकडे किशोर तिवारी टाकले आहे . 
विदर्भ व मराठवाड्यात हजारो तूर उत्पादक  शेतकऱ्यांनी आपल्याकडे तक्रार करुन तूर खरेदी बाबत सरकारवर दबाव निर्माण करण्याची विनंती केल्याने सरकारने घोषीत प्रति क्विंटल एक हजार रुपयाचे अनुदान दोन हजार करावे अशी  मागणी किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे . 
===============================
================

No comments:

Post a Comment