Thursday, 29 March 2018

शेतकऱ्यांनी आपल्या सात बाऱ्यावर व्यापाऱ्यांनां तूर विकू देऊ नये -किशोर तिवारी

शेतकऱ्यांनी आपल्या सात बाऱ्यावर व्यापाऱ्यांनां तूर विकू देऊ नये -किशोर तिवारी

दिनांक - ३० मार्च २०१८ 

    शेतकऱ्यांची तूर मंदीच्या नावावर तीन  हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटल या पडेल भावात घ्यावी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने या खाजगी व्यापाऱ्यांची तूर सरकारी नाफेडच्या खरेदीमध्ये विकावी या मागील दोन वर्षांपासून राजरोसपणे सुरु असलेला धंदा बंद करण्यासाठी सरकारने सुरु केलेली पारदर्शक ऑन पद्धती सुरु केल्यांनतर आता शेतकऱ्यांकडून सातबारे गोळाकडून त्यांच्या नावावर नाफेडच्या खरेदी केंद्रावर हमीभाव ५ हजार चारशे दराने सुरु असलेला गोरखधंदा बंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यांना आपला सातबारा वापर करू देऊ नये अशी विनंती कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली असुन जे व्यापारी व अधिकारी - कर्मचारी अशा प्रकारे त्यांनी माहीती शेतकरी मिशन द्यावी असे आवाहन केले आहे . 
मागीलवर्षी  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रमी २५ लाख मे क्वी तुरीची हमीभावात खरेदी केली मात्र नाफेड व पणन विभागाने याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ दिला नाही कारण  त्रासदायक निकष ,गोदामांचे व चुकाऱ्याची शून्य नियोजन ,व्यापारी धार्जीणे धोरण राबवून शेतकऱ्यांना पडेल भावात व्यापाराना विकण्यास भाग पाडले त्यामुळे यावर्षी पारदर्शक ऑन पद्धती सुरु करण्यात आली मात्र नाफेड व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कट रचुन महीना महीना खरेदीसाठी विलंब व खरेदी केल्यानंतर  महीना महीना चुकारे न दिल्यामुळे पुन्हा या वर्षीही हवालदील कर्जबाजारी शेतकरी व्यापाऱ्यांना पडेल भावात विकत आहे यामुळे पोटभरू अधिकाऱ्यांनी सालाबादप्रमाणे सरकारी खरेदीचे तीनतेरा केले आहेत असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे . 
या पूर्वी किशोर तिवारी यांनी  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन मागील दोन महिन्यापासून   नाफेड व पणन विभागाच्या त्रासदायक निकष ,गोदामांचे व चुकाऱ्याची शून्य नियोजन ,व्यापारी धार्जीणे धोरण यामुळे तूर  खरेदीचा खेळखंडोबा होत असुन ऑनलाईन बुकिंग केल्यांनतर २० ते २५ दिवसाचा खरेदीसाठी विलंब व नंतर महीना महीना चुकाऱ्याची वाट यामुळे राजरोसपणे पडेल भावात होत असलेली तुरीच्या विक्रीचा मुद्दा चव्हाट्यावर आणला होता व विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात या निवेदनावर चर्चा झाल्यानंतर सरकारच्या जबाबदार सनदी अधिकाऱ्यांची कुंभकर्णी झोप जागली असुन केंद्राकडून चुकाऱ्याची रक्कम प्राप्त झाल्यामुळे आजपासुन सर्व प्रलंबीत चुकारे सुरु झाल्याची माहीती राज्याचे कृषी सचिव बिजयकुमार यांनी आज दिल्याचे शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी निवेदनाद्वारे सांगीतले होते  . या तूर खरेदीमध्ये पश्चिम विदर्भाच्या अमरावती विभागाच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील सर्वात अधिक चुकारे असुन नाफेडच्या खरेदीच्या या कटकटीतीमुळे तुरीचा हमीभाव ५ हजार चारशे असतांना तीन  हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटल विकत असल्याचे चित्र आहे यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदी योजना व्यापारी अधिकारी यानांच लाभकारी ठरत असल्याची चिंता शेतकरी मिशन सरकारकडे व्यक्त केली होती त्यामुळेसरकारला शेतकऱ्यांची नाराजी तर  नाकर्ते मंत्री व अधिकारी यांना विरोधकांचा आरोपांचा सामना करावा लागत असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली होती . 
या हंगामात सोयाबीन ,तूर आणि हरभरा उत्पादकांना  खुल्या बाजाराच्या  लुटीमुळे व सरकारी खरेदीचे तीन तेरा अधिकाऱ्यांनी केल्यामुळे प्रचंड आर्थिक तोटा सहन करावं लागत असून  ऐतिहासिक कृषी कर्जमाफी   इतिहास जमा होत असल्याचे चित्र समोर येत असल्याने तात्कळ नाफेड खरेदीच्या ठिकाणी हमीभाव फरक देण्याची योजना लागू करा अशी मागणी किशोर तिवारी सुध्दा यांनी केली होती  .
शेतकरी मिशनच्या वर्धा ,वाशीम ,अमरावती व यवतमाळ जिल्हाच्या मार्च महिन्याच्या दौऱ्यात शेकडो शेतकऱ्यांनी पहिलेच  तुरीचे उत्पन्न कमी आणि अत्यल्प भाव मिळत असताना तुरीचा चुकारा वेळेवर देन्यास असमर्थ असलेली शासन व्यवस्था यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असल्याची तक्रार केली होती हवालदिल शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे  नगदी चुकारा मिळवा यासाठी ३५०० ते ४००० च्या दराने आपली तूर गावातील खाजगी व्यापाऱ्याला विकत आहे तोच व्यापारी त्याच शेतकऱ्याचा सातबारा लावुन नाफेड विकत असल्याचे  सत्य  पाहील्यावर किशोर तिवारी यांनी शेतकऱ्यांना आपले सातबारा व नावाचा वापर चुकाऱ्यासाठी व्यापाऱ्याला करू देऊ नका अशी विनंती केली व सातबारा गोळा करणाऱ्या व्यापारी व त्यांची घरपोच तुरी घेणारे अधिकारी यांची तक्रार करण्याची विनंती केली आहे .
 

=============================================================

No comments:

Post a Comment