Wednesday, 24 January 2018

कीटकनाशकाच्या विषबाधेचा 'एस आय टी' च्या अहवालातील शेतकरी व शेतमजुरांच्या फौजदारी कारवाईच्या शिफारशी नकारा -किशोर तिवारी

कीटकनाशकाच्या विषबाधेचा 'एस आय टी' च्या अहवालातील शेतकरी व शेतमजुरांच्या फौजदारी कारवाईच्या शिफारशी  नकारा -किशोर तिवारी 
दिनांक २५ जानेवारी २०१८ 
यवतमाळ आणी महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील कीटकनाशक विषबाधामुळे नुकत्याच झालेल्या मृत्यूंचे राजकीय पडसाद उमटल्यामुळे व ५०च्या वर निर्दोष आदिवासी शेतकरी व शेतमजुरांचे बळी गेल्यांनतर   सरकारने  अशा सर्व कीटकनाशकांचा अनियंत्रित वापरावर नियंत्रण करण्यासाठी व ह्या दुर्घटना भविष्यात होणार नाही यासाठी नियुक्त केलेल्या विशेष तपास पथक (एसआयटी) च्या सोमवारी मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या अहवालात दिलेल्या शेतकरी व शेतमजुरांवर फौजदारी कारवाई करण्याच्या शिफारशींचा प्रखर विरोध कै वसंतराव नाईक शेती स्वा मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला असुन सरकारने या शेतकरी व शेतमजुरांवर अन्यायकारक व अडचणीच्या जाचक शिफारशी स्वीकारू नये असे स्पष्ट मत किशोर तिवारी सरकार कळविले आहे . 
ज्या कीटकनाशकाचे साधे पिकाचे लेबल सुद्धा नसतांना सारे नियम व कायदे धाब्यावर ठेऊन विकणाऱ्या कीटकनाशक कंपन्यांवर कोणतीही कारवाई न करता होणारी विक्री यावर अहवालात साधी चर्चाही होत नाही ,कृषी व आरोग्य विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात येत नाही कीटकनाशक कंपन्यां आपली कोणतीच जबाबदारी निश्चित करण्यात येत नाही आणी सारी जबाबदारी निर्दोष शेतकरी व शेतमजुर यांचेवर टाकण्यात आल्यामुळे सरकारची प्रतिमा अधिकारी कट रचुन खराब करीत असल्याच्या आरोप सुद्धा किशोर तिवारी यांनी केला आहे . 
जी कीटकनाशके जगात बंदी घालण्यात आली आहे त्यावर महाराष्ट्रात तात्काळ बंदी घालण्यासाठी सरकारने उच्चं न्यायालयात अर्ज करावा अशी मागणीनीही तिवारी यांनी केली आहे कारण सैपरमेथिईन व मोनोफोटोफास सारखे जीव घेणारे अत्यन्त विषारी व पर्यावरणाला धोका असणारे किटकनाशक अनेकांचे निर्दोष बळी  घेत असुन एसआयटीने सुद्धा बंदीची शिफारशी केली आहे कारण या कीटकनाशक औषधांची अँटीडोड ही सध्या  उपलब्ध नसुन ,यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कीटकनाशकाच्या विषबाधेचे ४० च्या वर बळी पडल्यानंतर मुंबई वरून डॉक्टरांची चमु आल्यानंतर उपचाराचा प्रोटोकॉल बदल्यानंतरच कीटकनाशकाचा फास नियंत्रणात आला व स्थानीय आरोग्य व कृषी खात्याचा भोंगळ कारभारच याला दोषी असल्याचा ठपका फारच गंभीर असुन यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणीचा रेटा आपण मुख्यमंत्र्याना करणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 
या कीटक नाशकांचा भीषण नरसंहाराचे कारण  तीन दशकातील कृषी क्षेत्रातील हरित क्रांतीच्या नावावर  घरात घरात अन्नाच्या प्रत्येक कणात विष टाकणाऱ्या, पर्यावरणात सारे मित्र पक्षी कीटक जीवाणु यांना संपवून परंपरागत हजारो वर्षापासून सुरु असलेल्या शास्वत शेतीला नष्ट करून सारी कृषी आर्थिक व्यवस्था जगाच्या फक्त ३ बहु राष्ट्रीय कंपन्याच्या हातात देणाऱ्या बहु राष्ट्रीय कंपन्या हेच खरे शेतकऱ्यांचे खरे मारेकरी असल्यामुळे यांचे कारवाई करून यांना गजाआड करण्याचे सोडून माझ्या शेतकऱ्यांवर व शेतमजुरांवर याचे खापर फोडणे वेदनादायक असुन सरकारने हा नरसंहार तात्काळ बंद करण्यासाठी विदर्भात व मराठवाड्यात  सिक्कीम राज्याप्रमाणे विषमुक्त वा नैसर्गीक शेतीचा मार्ग स्वीकारावा अशी विनंती शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पुम्हा एकदा केली आहे. 

=======================

No comments:

Post a Comment