Tuesday, 2 January 2018

फ्लोराइडग्रस्त सर्व खेड्यानां आरोमशीन एटीएमची सुविधा देणार -खैरगाव व मंगी पोडावर किशोर तिवारी यांची घोषणा

फ्लोराइडग्रस्त सर्व खेड्यानां आरोमशीन एटीएमची सुविधा देणार -खैरगाव व मंगी पोडावर किशोर तिवारी यांची घोषणा 
दिनांक-३ जानेवारी २०१८ 
यवतमाळ जिल्हातील आदिवासी भागातील शेकडो खेड्यात पिण्याच्या पाण्याचे सौत्र  विषारी खनिज फ्लोराइड व आरेसेनिक यांची मात्रा जास्त असल्यामुळे   शेकडो लोकांना किडनी व हाडाचे गंभीर आजार होत असुन अनेक निष्पाप नागरीकांनी आपले जीव सुद्धा गमावले असल्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेत कै वसंतराव नाईक शेती स्वा . मिशन  अध्यक्ष किशोर तिवारी अशा खैरगाव ( बुजरूक ) व मंगी  कोलाम  पोडावर " सरकार आपल्यादारी कार्यक्रम " मंगळवार २ जानेवारीला आयोजित करून खैरगाव ( बुजरूक ) व मंगी  कोलाम पोडावर सरकार या सर्व बाधीत खेड्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध आरोचे पाणी देण्यास कटीबद्ध असुन या सर्व ठिकाणी तात्काळ आरो मशीनच्या एटीएमची सुविधा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने किशोर तिवारी यांनी केली . या खेड्यातील किडनीबाधित व फ्लोराइडग्रस्त रुग्णांचा उपचारसुद्धा सरकार तर्फे आरोग्य विभाग करणार असल्याची माहीती यावेळी तिवारी यांनी दिली . 
तत्पुर्वी तालुका आरोग्य अधिकारी डॉ मडावी यांनी खैरगाव येथे किडनीच्या आजारग्रस्त २१ रुग्णांची व 
किडनीच्या तसेच असाध्य रोगामुळे मृत्यु पावलेल्या ९ मयताची यादी सादर केली तसेच मंगी कोलाम पोडावर २३ फ्लोराइडग्रस्त रुग्णांची यादी सादर केली . यावेळी किडनी रोगाच्या विषेय डॉक्टरांची चमु कडुन संपुर्ण नागरीकांची तपासणी करणार असल्याची माहीती तिवारी यावेळी दिली . 
आदीवासी व मागास दुर्गम भागातील जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता सरकार मधील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनाच जावडीवर हजर  करून तक्रार निवारण करण्याच्या मोहीमेचा भाग आयोजीत "सरकार आपल्या दारी " कार्यक्रमास खैरगाव ( बुजरूक ) व मंगी  कोलाम पोडावर  तालुक्याचे तहसीलदार महादेव जोरवार , गट विकास अधिकारी मधुकर घसाळकर, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते ,उपअभियंता वीज विभाग शेख साहेब , उपविभागीय अन्न पुरवडा अधिकारी झाडे , विभागीय वन्य अधिकारी पवारसाहेब , सहायक निबंधक मेश्राम हे अधिकारी उपस्थित होते . 
कोलाम नेते लेतुजी जुनघरे, प्रशांत बावणे  यांनी अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेमध्ये कमी करण्यात  आलेले अन्न पूर्ववत करण्याची मागणी केली . यावेळी करंजी परीसरातील भाजप नेते डॉ एम झेड बावणे ,आदीवासी नेते चंद्रभान उदे गुरुजी . सरपंच संजूळाबाई गणेश   सराटे ,पोलीस पाटील नितीन येंडे यांनी जनतेच्या तक्रारी मांडल्या . 
=============
]]]]]]]]]]]]]]]]]]]]
===============


No comments:

Post a Comment