Monday, 2 October 2017

विदर्भ-मराठवाड्यात कापसाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी -सर्व संकलन केंद्र तात्काळ सुरु करा -शेतकरी मिशनचे सरकारला साकडे


विदर्भ-मराठवाड्यात कापसाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी -सर्व संकलन केंद्र तात्काळ सुरु करा -शेतकरी मिशनचे सरकारला साकडे 
दिनांक -२ ऑक्टोबर २०१७ 
मागील वर्षी विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहु शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुरीचे विक्रमी उत्पादन केल्यांनतर व्यापाऱ्यांनी भाव पाडल्यामुळे हमीभावापेक्षा कमीभावात विकल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसानीला तोंड दिल्यानंतर  यावर्षी  विदर्भ व मराठवाड्यातील ४० लाखावर शेतकऱ्यांनी सुमारे ५० लाख हेक्टर मध्ये कापसाची या नगदी पिकाची पेरणी केलेली आहे व सध्या मागील २० दिवसापासून पडत असलेल्या उन्हामुळे कापूस प्रचंड प्रमाणात फुटला असुन पहीला वेचा सीतादेवी करून घरात सुद्धा आला आहे व दसऱ्याला अनेक ठिकाणी खरेदीचा मुहूर्त झाल्याच्या वार्ता प्रकाशीत झाल्या आहेत मात्र सुरवातीला खरेदीचा भाव शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी भेरणारा आहे कारण मागील दोन वर्षांपासून सरासरी पाच हजार रुपये क्विंटल असणारा कापुस या वर्षी जागतीक मंदीचा नावावर व्यापाऱ्यांनी सरासरी चार  हजार रुपये क्विंटल भावात खरेदी करण्यास सुरुवात केल्याने राज्य सरकारने केंद्राच्या सि सि आय व फेडरेशनची कापुस खरेदी तात्काळ सुरु करावी अशी विनंती कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात  केली आहे . 
कापसाच्या पेरणीच्या पुर्वी जगात रुईचे भाव प्रती पौंड ८६  सेंट वर होते सरकीची भावही २४०० रुपये क्विंटल होता व अमेरीकेचा डॉलर चांगला ६८ रुपयावर होता म्हणुन भारतात कापसाच्या गाठीचे भाव २५ हजार रुपयाच्या घरात असल्यामुळे येत्या हंगामात कापुस कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये प्रती  क्विंटल राहतील या आशेने अख्या महाराष्ट्रात विक्रमी सुमारे ५० लाख हेक्टर मध्ये कापसाची या नगदी पिकाची पेरणी केलेली आहे मात्र आता रुईचे भाव प्रती पौंड ६८  सेंट वर तर  सरकीची भावही १८०० रुपये क्विंटल झाला असुन  व अमेरीकेचा डॉलर सस्ता झाला असुन ६४ रुपयावर आला आहे म्हणुन भारतात कापसाच्या गाठीचे भाव १८ हजार रुपयावर आले आहे याच वेळी स्वस्त दरात लगतच्या पाकीस्तान व बांगलादेशवरून कापसाची आवक  करण्यास  सुरुवात झाल्यामुळे भाव पाडण्यात कापडाच्या मिल मालकांना यश आले आहे अशातच सरकारने केंद्राच्या सि सि आय व फेडरेशनची कापुस खरेदी तात्काळ सुरु केली नाहीतर आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी आपला कापुस मातीमोल भावात विकतील व हाच कापुस व्यापारी सालाबादप्रमाणे सि सि आय व फेडरेशनला विकतील तरी हा गोरखधंदा रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती तिवारी केली आहे . 
यावर्षी  विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहु सजेटकरी आत्महत्याग्रस्त भागात   पाऊसाने वारंवार दगा दिल्याने व त्यातच बोडअळी ,गुलाबी अळी ने जबरदस्त हल्ला केल्याने अर्धे पीक खल्लास झाले आहे त्यामुळे लागवडीचा खर्च दुपट्टीने वाढला असतांना पहिलेच कर्जबाजारी असलेले शेतकरी उपासमारीला तोंड देत असुन अशा कठीण समयी भारताच्या लाडक्या संवेदनशील पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी लागवड खर्च अधिक ५० % नफा या प्रमाणे हमीभाव देऊन कापसाची व सोयाबीनची खरेदी विदर्भात तात्काळ करावी अशी मागणी भाजपला लोकसभेत व विधानसभेत खुला पाठींबा देणारे  शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी सरकारला  केली आहे. 
=======================================================
========================
===========  

No comments:

Post a Comment