Monday, 11 September 2017

"भ्रष्ट नेत्यांनी खाबुगीरी सोडुन जनतेची सेवा करावी " या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचे शेतकरी मिशन कडुन स्वागत

"भ्रष्ट  नेत्यांनी खाबुगीरी सोडुन जनतेची सेवा करावी " या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचे शेतकरी मिशन कडुन स्वागत 

दिनांक १२ सप्टेंबर २०१७
http://www.dnaindia.com/mumbai/report-dna-exclusive-devendra-fadnavis-fires-a-warning-shot-2544548

आघाडी सरकारच्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांप्रमाणे भाजपच्या सरकारमधील मंत्री ,खासदार व आमदारांच्या झटपट संपत्ती गोळा करण्याच्या खाबुगीरी करण्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्यामुळे व्यथीत झालेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य भाजपा कार्यकारीणीच्या पदाधीकारी व विस्ताराकांच्या बैठकीत  आपला कारभार सुधारा नाहीतर बाहेरची वाट धरा ह्या निर्वाणीच्या इशाऱ्याचे शेतकरी मिशनचे अध्यक्ष व  भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आहे . 
शनीवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देतांना मागील सरकार एका नंतर एक घोटाळ्यांच्या आरोपमुळेच गेले असुन केंद्रातील व राज्यातील भाजप  सरकारकडून  भ्रष्टाचाराच्या विरोधात शून्य सहनशीलतेच्या तत्त्वावर कोणताही तडजोड होणार नाही व दोषी मंत्री ,खासदार वा आमदार कोणालाही माफ करण्यात येणार नाही म्हणून १२२ आमदार व २३ खासदारांनी आपली कामगीरी तात्काळ सुधारावी असा सज्जड समज देतांना सध्या ३९ आमदार व ११ खासदार यांनी कामगीरी असमाधानकारक असल्याच्या तक्रारी वारंवार येत असुन जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेवर आजही तगडा विश्वास असुन सरकारच्या योजना वंचितांना मिळण्यासाठी आपल्या व आपल्या स्वीय सहाय्यकांना आपले वर्तन विनयशील करण्याचा सज्जड समज दिल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाल्यानंतर यावर तिवारी यांनी आनंद व्यक्त करून जे खासदार, मंत्री ,आमदार आपले डझनावर विषेय कार्यकारी अधिकारी (ओ एस डी ) वा स्वीय सहाय्यकांचा बाजार लाऊन झटपट संपत्ती जमा करण्याचा जो उद्द्योग सुरु केला आहे याचा खुला विरोध तिवारी सुरु केला असून आपला त्रागा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन व्यक्त केला आहे . 

या वृत्ताप्रमाणे मुख्यमंत्र्यानी  सर्व खासदारांच्या आमदारांना वैयक्तिक अहवाल देण्यासाठी व जनतेशी निरंतर संवाद ठेवण्यासाठी दौरे करून सर्व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वय राखण्याचे प्रयत्न करण्याची  मुख्यमंत्र्यांची इच्छा व्यक्त केली. , खासदार आणि आमदारांनी आपापल्या मतदारसंघात युद्धस्तरावर काम करून मतदारांचे आत्मविश्वास जिंकणे व  त्यांनी पक्षाच्या संघटनेला बूथ स्तरावर आणखी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे व सरकारच्या सर्व विकासाच्या अनेक योजनांवर  लाभ वंचितांना व शेतकऱ्यांना देण्याच्या सूचनेचे तिवारी यांनी स्वागत केले आहे . 

लोक चांगले दिवस येण्यासाठी व शेतकरी शेत मजुर आदीवासी दलीत यांच्या घरात सुखींचे दिवस येणार या आशेने सरकारे बदलतात मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे समाजसेवक व राजकीय नेते चांगले दिवस येऊ देत नाहीत . भ्रष्ट व नालायक अधिकाऱ्यांनी व नेत्यांनी देशच विकण्याचा धंदा सुरु केला असुन आता जनतेला दिल्लीत नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात फक्त देवेंद्र फडणवीस हाच एक आशेचा किरण असुन त्यालाही पोटभरू नेते मिटवीत असल्याचा आरोप  तिवारी यांनी केला  आहे .
No comments:

Post a Comment