Thursday, 20 July 2017

यवतमाळ येथील शेतकरी आंदोलन:शेतकऱ्यांनी अवसानात धाडलेल्या शेतकरी नेत्यांची काँग्रेस -राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन पुनर्वसनाची दयनीय धडपड

यवतमाळ येथील शेतकरी आंदोलन:शेतकऱ्यांनी अवसानात धाडलेल्या शेतकरी नेत्यांची काँग्रेस -राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन पुनर्वसनाची दयनीय  धडपड 

दिनांक -२० जुलै २०१७
सध्या संपुर्ण जगाच्या नकाशावर मागील दशकात ४ हजारावर शेतकरी आत्महत्यांनी देशाच्या कृषिसंकटाची ओळख करून देणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात पावसाळ्यात मशरुमासारखे पैदा झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या टाळुवरचे लोणी खाऊन कोट्यवधींची काळी कमाई केलेल्या अतीविद्वान व   स्वयंघोषित राष्ट्रीय शेतकरी  नेत्याच्या शेतकऱ्यांनी अवसानात धाडलेल्या शेतकरी नेत्यांची काँग्रेस -राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन पुनर्वसनाची दयनीय धडपड एक शोकांतीका असुन म्हातारंपणात नैरायात प्रसिद्धीसाठी  कोणत्या स्तरावर लोकांचा विश्वास गमावल्यानंतर एखादा नेता जाऊ शकतो याचा वेदनादायी अनुभव यवतमाळकरांनी विकृत आंदोलनाच्या व त्यानंतर पत्रकार परिषदांमध्ये घेतला असुन हा प्रकार अत्यंत घृणास्पद असल्यामुळें याचा निषेध शेतकरी चळवळी कार्यकर्ते किशोर तिवारी केला आहे . आपण या  पोटभरु लोकांच्या विकृत आंदोलनापासुन दुर राहण्याची विनंती केल्यानंतर सरकारला सोडुन आपल्यावर तोँडसूख घेतल्यामुळे आपणाला हा निषेध करावा लागत आहे याचे दुःखही तिवारी यांनी व्यक्त केले आहे . 
यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी २००५ मध्ये दररोज मोठयाप्रमाणात आत्महत्या करीत असतांना गाव सोडून पळून गेलेल्या शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय नेत्याने आपल्याशी  ज्याप्रमाणे शरद जोशी ,बाबासाहेब सरोदे,प्रकाश पोहरे ,विनोद माहेश्वरी ,अभिजित पवार यांचेशी त्यांचेच मीठ खाऊन त्यांच्यात ताटात भोक पाडून बेईमानी केल्यामुळे आपणास आज बोलावे लागत आहे कारण "गरिबाचा माणसाचा देव " रेशमबागेत आहे असे आपल्याला  म्हणणाऱ्या फुकटखाऊ नेत्याने २०१२च्या डिसेंबरमध्ये याच रेशामबागेत  भाजपचा  झेंडा टोक्यावर घेऊन हजेरी लावली होती व नंतर कट्टर हिंदुवादी  व वेगळ्या विदर्भाच्या विरोधात असलेल्या शिवसेनेचा झेंडा उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करून २०१४च्या लोकसभेचा खुला प्रचार करीत असतांना आपला समाजवादी व गांधीवादी चेहरा कोणत्या कचऱ्याच्या टोपलीत टाकला होता असा सवालही किशोर तिवारी यांनी केला आहे . आपण संघाचे स्वयंसेवक आहोत व ब्राह्मण आहोत हे १९९८ मध्ये माझ्या दुष्काळ परिषदेमध्ये पुनर्वसनात आलेल्या या खोटा अहंकार ठेवणाऱ्याने दांभिक नेत्याने आपण दत्ताभाऊ मेघे यांच्या दारी खावटीची सोय लाऊन दिल्याची उपकाराची का  विसर पडल्याच्या  सवाल तिवारी यांनी केला आहे . 
मागील दोन वर्षांपासून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु कराव्या यासाठी मोदीसरकारच्या विरुद्ध  वारंवार आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सध्या  स्वामिनाथन आयोगाला सुरु केलेला विरोध अकालनीय आहे .खुल्या बाजारव्यवस्थेत बाजारापेक्षा दुपट्ट हमीभाव आपण डंकेलचे समर्थन करणाऱ्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सांगावे असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे . ज्यांना शेतकऱ्यांनी लोकसभेत धाडण्यासाठी ठिकाणी घरी पाठविलें त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखांचा अभ्यास करावा व एकदातरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी वाचाव्या व डॉ स्वामिनाथन यांच्याशी चर्चा करावी असा सल्ला तिवारी यांनी दिला आहे . महाराष्ट्र सरकारने जमिनीची मर्यादा न ठेवता सरसकट  दीडलाखपर्यंत पीक कर्जमाफी दिली याचा मसुदाही तयार झाला नाही केंद्र सरकारची बँकांना स्पष्ट आदेश येण्यासाठी आता राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रयन्त चालू त्यामध्येव विदर्भ व मराठवाड्याच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील अडचणीच्या शेतकऱ्यांनाच फायदा झाला पाहीजे आणी पश्चिम महाराष्ट्राचे मलाईदार शेतकरी कर्जमाफी लाटून नेणार नाही यासाठी धडफडं सुरु असतांना फसवणूक केली अशी ओरड करणाऱ्यांनी आपली लबाडी व शेतकऱ्यांच्या कबरी खोदण्यासाठी विदेशी कंपन्यांना साऱ्या शेतीचे नियंत्रण देण्याच्या लबाडीचा आठवण तिवारी यांनी यावेळी करून दिली . 
===================================================================== No comments:

Post a Comment