Monday, 2 May 2016

यवतमाळ जिल्यात रोह्टेक येथे ४ मेला शेतकरी मिशनचा "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम

यवतमाळ जिल्यात रोह्टेक  येथे ४ मेला शेतकरी मिशनचा  "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम 
दिनांक ३ मे २०१६ 
 शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम तोंडवर आल्यावर आता नवीन पिककर्ज ,ग्रामीण जनतेला काम ,अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण ,प्रकल्पग्रस्तांचे अनेक  प्रश्न यांना सरकार ,प्रशासन ,लोक प्रतिनिधी व सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्यात रोह्टेक  येथे ४ मेला शेतकरी मिशनचा  "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम हा कार्यक्रम कै वसंतराव नाईक शेतकरी  मिशनने आयोजित केला आहे या कार्यक्रमाला प्रशासनकडून जिल्हाधिकारी किरण गित्ते सह  महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी उपस्थित राहणार असुन या भागातील लोकप्रिय आमदार अशोक उइके  यांचेसह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सद्यस तसेच सर्व सरपंच व ग्रामपंचायतीचे  सद्यस यांना सादर आमंत्रित करण्यात आले असुन ,ग्रामीण जनतेनी आपल्या सर्व अडचणी व सरकारी योजनामध्ये होणाऱ्या गैरप्रकार समोर आणण्याकरिता कार्यक्रमात सहभागी होण्याचे  आवाहन शेतकरी मिशनचे अध्क्षश किशोर तिवारी यांनी केली आहे   
मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार "सरकार आपल्या दारी" या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी यांच्या तक्रारीची सुनावणी व  जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून  समाधान व कारवाई साठी अधिकारी -कर्मचारी चेतना जागृती अभियानाचा एक भाग म्हणून  यवतमाळ जिल्यात रोह्टेक  येथे ४ मेला  जनसुनावणी ठेवण्यात आली आहे . 

मागेल त्याला सुलभ पीक कर्ज योजनेचा घाटंजी येथे शुभारंभ  
अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी८० टक्के शेतक-यांना ३१  मेपूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, यासाठी तहसील कार्यालयातर्फे शेतक-यांच्या याद्या, तसेच सातबारा व आठ अ कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील, शेतक-यांना अकराशे कोटी रुपये पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा सर्व बँकांनी संकल्प करण्यासाठी घाटंजी येथे सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक ४ मे ला 
दुपारी २ वाजता तहसील कार्यालयात ठेवण्यात आली आहे . 
१- ८० टक्के शेतक-यांना ३१ मेपूर्वी कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण करा

२- मागेल त्याला पीक कर्ज, तालुकास्तरावर कर्ज मेळावे
३- शेतक-यांना सातबारा व आठ अ घरपोच देणे 
४- कर्जाचे पुनर्गठन करून सर्व शेतक-यांना पीककर्ज देणे 
५-शेतक-यांना पीककर्जासाठी  वाटपाचे वाढीव   ध्येय ठरवा

या मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार कारवाई पूर्ण करण्यासाठी येत्या मे महीन्यात संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात मागेल त्याला पीक कर्ज मोहीम व  तालुकास्तरावर कर्ज मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी मिशनचे अध्क्षश किशोर तिवारी यांनी दिली 

No comments:

Post a Comment