Monday, 18 January 2016

शेतकरी वाचवायचा असेल तर कामाला लागा -प्रबोधन मेळाव्यात किशोर तिवारींचा कर्मचारी वर्गाला सल्ला


शेतकरी वाचवायचा असेल तर कामाला लागा -प्रबोधन मेळाव्यात किशोर तिवारींचा कर्मचारी वर्गाला सल्ला 
प्रतिनिधी १८ जानेवारी 
अमरावती - गावागावात कार्यरत असलेले ग्रामसेवक, तलाठी कृषीसेवक तसेच वायरमन यांच्याशी शेतकरी वर्गाचा थेट संबंध येतो. त्यामुळे शेतकर्र्यांचे सामाजिक, आर्थिक प्रश्न समजून घेवून शेतीपयोगी योजनांचा लाभ शेतकर्र्यांपर्यत पोहचविण्याची मोठी जबाबदारी तुमची आहे. मात्र बहुतेक कर्मचारी मुख्यालही राहत नसल्याने ते कायम दांड्या मारतात. वेळेवर शेतकर्र्यांना उपलब्ध होत नसल्याने अनेकांची कामे रखडून पडतात. काम पेंडींग ठेवणे म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणे होय. जो पर्यंत शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही तो पर्यंत त्यांच्यातील निराशा नाहिशी होत नाही शेतकर्र्याला वाचवायचे असेल तर कामाला लागा, काम करायचं नसेल तर नोकर्र्या सोडा या शब्दात कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कामचुकार कर्मचार्र्यांना कानपिचक्या घेतल्या. मोर्शी तालुक्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पदाधिकारी, ग्रामस्तरीय कर्मचारी, तालुकास्तरीय कर्मचारी यांचा प्रबोधन मेळावा स्थानिक तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. 
मेळाव्याला आ. डाॅ अनिल बोंडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, उपविभागीय अधिकारी ललीतकुमार वर्र्हाडे आदी उपस्थित होते. तिवारी पुढे म्हणाले की, जनतेने काँग्रेस सरकारला घरी का पाठविले, तर जनतेला ही सिस्टीम बदलावयाची होती. सरकार बदललं मात्र सिस्टीम बदललेली दिसून येत नाही. कर्मचार्र्यांच्या १५ वर्षापासूनच्या वाईट सवयी बदललेल्या नाही, तुमच्यामुळेच सरकारची बदनामी होते असे सांगतांना ते म्हणाले की, तुम्ही शेतकर्र्यांचा किती छळ करता याच्यात आमची पी.एच.डी. झाली आहे. राजकारणी, कंत्राटदार व अधिकारी यांची चेन तोडायची आहे. कुठल्याही योजना आणा शेतीतून पैसा निघूच शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीला किती पैसा लागतो हे जिल्ह्याची एक कमेटी ठरविते, ज्यांना शेतमधलं काहीच समजत नसते असेही ते यावेळी म्हणाले . शेतीमध्ये आवश्यक खते, किटकनाशके वापरून विनाकारण उत्पादन खर्च वाढवून घेवू नका हा एक बहूराष्ट्र कंपन्यांचा डाव असल्याचे सांगून सावकरांना उघडलेली कृषी सेवा केंद्र ताबडतोब बंद करण्याचे आदेश त्यांनी कृषी अधिकार्र्यांना दिले. कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्तरीय कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन नायब तहसिलदार अक्षय मांडवे यांनी केले तर आभार तहसिलदार अनिरूध्द बक्षी यांनी मानले  

No comments:

Post a Comment