Sunday, 5 July 2015

दुबार पेरणी व बँकांनी कर्ज नाकारल्याने विदर्भात आणखी आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -पंतप्रधान व मुख्यमंत्री विदेशात आणी शेतकरी चालले मसनात


दुबार पेरणी व बँकांनी कर्ज नाकारल्याने विदर्भात आणखी आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -पंतप्रधान व  मुख्यमंत्री विदेशात आणी शेतकरी चालले मसनात 
दिनांक -५ जुलै २०१५
सहकारी बँकांना रुपये २ हजार कोटीची सरकारची हमी व पत पुरवठा आवश्यक असताना फक्त २५ कोटी रुपये दिल्याने विदर्भातील ४ लाखावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज वाटप न झाल्याने व जूनच्या पाऊसाने दड्डी दिल्याने आता दुबार पेरणी कशी करावी या चिंतेपोटी मागील  दोन दिवसात यवतमाळ जिल्यातील ४ तर अमरावती व वर्धा जिल्यातील प्रत्येकी दोन शेतकऱ्यांनी आत्म्हत्या केल्याचे घटना समोर आल्या आहेत यामध्ये यवतमाळ जिल्यातील  वाटखेड येथील आदीवासी शेतकरी पांडुरंग मडावी ,पांढरीचे मारोतराव  एटरे ,शिरसगावचे अमोल वहिले ,  टाकळी येथील महीला शेतकरी गुजाबाई मडावी तर अमरावती जिल्यातील शेन्दुर्जाना संतोष चतुले व भिवापुरचे श्यामराव कोकार्डे आणी वर्धा जिल्यातील पोरगव्हाणचे दिनेश भोंडे व  गोह्दाचे  सतीश सिदराम यांचा समावेश यावर्षी एकट्या विदर्भात ८०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन ,एकीकडे शेतकरी विक्रमी संख्येत आत्महत्या करीत आहेत तर सारे सरकार सत्कार स्वागत विदेशवारी मध्ये गुंतले असल्यामुळे मस्तवाल अधिकाऱ्यांच्या नाकार्त्यामुळे हवालदील शेतकरी मरत असल्याचा आरोप विदर्भ जनादोलन समितीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे . 

यावर्षी विदर्भाच्या ५० लाख कर्जबाजारी व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांमधून फक्त २० टक्के मागील वर्षीच्या २०१४-१५ थकितदारांना पीककर्ज पुनर्वसन योजनेचा लाभ मिळाला असुन  मागील तीन वर्षापासून सतत नापिकी ,दुष्काळ व अतिवृष्टीचा मार बसणारे  ४० लाख तणावग्रस्त शेतकरी नवीन पिककर्जा पासुन वंचित राहिले आहे  त्यामुळे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व शेतकऱ्याने १५ जून पर्यंत नवीन पीककर्ज मिळणार अशी सरकारची घोषणा हवेत विरली असून आता  मागील तीन वर्षापासून सतत नापिकी ,दुष्काळ व अतिवृष्टीचा मार बसणारे थकितदार  ४० लाख तणावग्रस्त शेतकरी यांनी काय करावे यावर सरकारने बोलावे  एकीकडे मुख्यमंत्री कर्जमाफीचा विचार चालू आहे अशी पुंगी सोडतात तर अर्थमंत्री सुधीर  मूनगणट्टीवार सातबारा कोरा करता येत नाही कारण तिजोरी रीकामी आहे असा हवाला देतात या सरकारने विदर्भाच्या कृषी संकटाचा  व शेतकरी आत्महत्यांचा गांभीर्य गमावले असुन सरकारच्या उदासीनतेमुळे जास्त शेतकरी मरत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे . यावर्षी सर्व २०१२-१३,१३-१४,व १४-१५ चे थकित  पीककर्ज ,मध्यम मुदतीचे सर्व प्रकारचे कृषी कर्ज व तारण कर्ज यांचे पुनर्वसन करण्याची मागणी शेतकरी करीत असून नौकरशाहीच्या समोर शरणागती घेतलेल्या सरकारने यावर जाणून बुजून मौन धारण केले आहे यामुळे येत्या महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती तिवारी व्यक्त केली आहे 

जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करण्यात येत असुन नाले खोदून व जमिनीत ओलावा आणल्याने महाराष्ट्राचे कृषी संकट संपणार ही सरकारची दिवाळखोरी असून यावर्षी बारमाही सिंचनाची सोय असणार्‍या हजारो शेतक र्‍यांना कापूस, सोयाबीन , धानाला व तुरीला भाव न मिळाल्यामुळे झालेले नुकसान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहावे व ९० टक्के शेतकरी बँकेचे थकबाकीदार आहेत, लाखो शेतकरी आर्थिक संकटामुळे मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, आजारांवर उपचार करण्यास दमडीही नाही,अन्न व चारा याची सोय सुद्धा नाही व अतिशय अडचणीत असलेले शेतकरी मायबाप सरकार मदतीला येईल, अशी भोळी आशा करणार्‍या शेतक र्‍यांना नितीन गडकरी शेतक र्‍यांनी सरकार व देवावर आता मदतीसाठी पाहू नये तर त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पिककर्ज व दुष्काळग्रस्त व तणावग्रस्त मदतीचे पॅकेज मिळणार नाही, असा निरोप देतात यामुळेच मागील तीन महिन्यात शेतकरी आत्महत्या मोठय़ा प्रमाणात वाढल्या असुन याला विदर्भाचे केंद्र व राज्यातील नेतेच जबाबदार असुन हेच विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्या ह्या शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे व शेतक र्‍यांच्या तोट्याच्या शेतीमुळे झालेल्या कर्जामुळे होत असून आपण यावर गुंतवणूक अधीक ५0 टक्के नफा या सुत्राने कृषीमालाला आधारभूत किंमत व सर्व शेतक र्‍यांना नवीन कर्ज देऊ असे आश्‍वासन दिले होते. आता चुप का असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे.

यावर्षी महाराष्ट्र सरकारने एकूण ३९ हजार ४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास ६0 टक्के गावांमध्ये पूणर्त: खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. यामुळे ९0 लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असून जागतिक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापूस, तूर, सोयाबीन व दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. अशा आणिबाणीच्या वेळी विदर्भाच्या शेतकर्‍यांनी भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना हमीभाव वाढ, पीककर्ज मुक्ती व कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचे पीक घेण्यासाठी अनुदान अशी तीन सुत्री असलेला एकात्मिक कार्यक्रम सादर करण्यासाठी किशोर तिवारी यांनी विनंती केली होती मात्न सरकारने हमीभाव वाढ व पीककर्जमाफी देणार नाही हे स्पष्ट केल्यामुळे तणावग्रस्त शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment