Thursday, 23 July 2015

किशोर तिवारी शासनाच्या शेतकरी चेतना मिशन पहिले संचालक -लोकमत

किशोर तिवारी  शासनाच्या  शेतकरी चेतना मिशन पहिले संचालक -लोकमत 

  • First Published :23-July-2015 : 02:47:34

  • http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=7278625
  • यदु जोशी, मुंबई
    शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दाहक वास्तव स्थानिक प्रसार-माध्यमांपासून बीबीसीपर्यंत आणि न्यायालय व सरकारसह विविध व्यासपीठांवर गेली १५ वर्षे सातत्याने मांडणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर तिवारी हे आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मिशनचे पहिले संचालक असतील.
    सूत्रांनी सांगितले की आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील २२ लाख शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेंतर्गत २ रुपये किलो दराने गहू, तर ३ रुपये किलो दराने तांदळाचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अटी शिथिल करण्यात येणार असून, या योजनेत आणखी इस्पितळांची नोंदणी करण्यात येणार आहे. या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी तिवारी यांच्यावर असेल. या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे कामही तिवारी यांच्या नेतृत्वात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
    यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी असलेले तिवारी हे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष आहेत. ते मूळचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते. त्यानंतर काही वर्षे ते भाजपाचेही पदाधिकारी होते. पुढे त्यांनी भाजपामधून बाहेर पडत विदर्भ जनआंदोलन समिती स्थापन केली. तेंदुपत्ता मजुरांच्या आंदोलनाने ते प्रकाशात आले. त्यानंतर त्यांनी शेतकरी आत्महत्या हा विषय लावून धरला. विदर्भात होणाऱ्या प्रत्येक शेतकरी आत्महत्येची माहिती त्यांनी जगासमोर आणली. असंख्य शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी माहिती घेतली. एवढ्यावरच न थांबता या आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा अभ्यास करून त्यांनी शासनाला प्रचंड पत्रव्यवहार केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक न्यायालयीन लढे दिले. आता तिवारी यांच्यावर अमरावती विभागातील ५, नागपूर जिल्ह्यातील १ आणि मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या मिशनची जबाबदारी देण्यात येणार आहे.

Saturday, 18 July 2015

NCRB farm suicide data is Hoax-VJAS

NCRB farm suicide data is Hoax-VJAS 

Dated-19th July 2015
A new methodology to adopted  National Crime Records Bureau (NCRB) in order to show there is sharp drop farmer suicides by over 50% in the year 2014 is being termed as Hoax and when  Rural India fared badly last year, with farm distress peaking and 12,360 farmers which is in fact  5% higher than in 2013, which recorded 11,772 cases, said Kishor Tiwari, president  Vidarbha Jan Andolan Samiti, a farmers’ advocacy group who are monitoring and documenting farmers suicides since 1995 .
The data is fabricated to show fewer deaths as Distress on the ground is higher than what NCRB figures show.” ,when major states like Rajasthan, Jharkhand, West Bengal, Odisha and Bihar  have not furnished any farmer suicides data for  2014 ,NCRB's farm suicides is regional not national ,the declassification to downplay  farm suicides figure NCRB has listed all landless tribal farmers and billions of leasehold tenancy farmers as agricultural workers moreover thousands of rural suicides cases has been classified in others category which has put question mark to NCRB credibility, NCRB data has been manipulated to give a rosy picture in the international arena when in reality is very gloom  ,Tiwari  added. 
“NCRB have deliberately divided the suicides under different heads. The report says 4,004 agriculture-related suicides were recorded in Maharashtra during 2014 and then subtracts agricultural workers from the number and gives 2,568 as the total figure. But even with 2,568, Maharashtra tops the country, and for the first time, the government has admitted that the landless farmers are also dying,” said  Tiwari 
The total number of farmers’ suicides in Maharashtra should be 4,004, which is almost 1,000 more than the 2013 figure. It’s shameful if the government takes credit for 500-odd fewer suicides. The issue is getting complicated everyday in Maharashtra. Farmers are not getting proper prices for their produce, but input costs are rising. Maharashtra has recorded over 2,000 farmers’ suicide until June this year. Over 800 farmers have killed themselves in Vidarbha and over 600 farmers committed suicide in Marathwada,” Mr. Tiwari said
In 2013, more than 3,000 farmers in the state ended their lives, according to records, but people in the know claim the NCRB does not reflect ground realities. “” said  Tiwari  adding there were more than 4,000 suicides in the state. “, it is  alarming. 

Thursday, 16 July 2015

विदर्भात आणखी पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या -जुलै महिन्यात ३२ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

  विदर्भात आणखी पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या -जुलै महिन्यात ३२ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या 
दिनांक -१६ जुलै २०१५ 
विदर्भात दुबार पेरणीचे संकट अधिकच भीषण झाले असून मागील पंधरा दिवसापासून दर आठ तासाला एक कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत असून मागील ४८ तासात आणखी पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा घटना समोर आली असून यामध्ये जगात शेतकरी आत्महत्यासाठी गाजत असलेल्या बोथबोडण येथील    आनंद कनीराम राठोड या शेतकऱ्यांचा समावेश असून मागील दशकातील बोथबोडण मधील ही २३ वी शेतकरी आत्म्हत्याची घटना असून जुलै महिन्यात यवतमाळ जिल्यातील वाटखेड व अमरावती जिल्यातील कलाशी गावात एका मागून एक अशा दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्या असून या शेतकऱ्यांना पेरणी बुडाल्यानंतर बँकांनी तर  कर्ज दिले नाही मात्र बाजारातूनही दमडीही मिळाली नसल्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून यावर्षी विक्रमी ८१९ शेतकऱ्यांच्या आम्ह्त्यांची विदर्भात नोंद झाली असुन जर सरकारने तात्काळ मदत व पिककर्ज माफी घोषित केली नाहीतर  मोठ्याप्रमाणात येत्या महीन्यात शेतकरी  आत्महत्यांची भीती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली असून  सर्व राजकीय पक्षांनी व समाजाच्या  सर्वच स्तरावरून शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असुन आत्महत्यांचे राजकारण बंद करण्याची विनंतीही तिवारी यांनी केली आहे. 
विदर्भ जनआंदोलन समितीने जुलै महिन्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची यादीच माध्यमांना दिली असून सरकारने याची गभीर दखल घ्यावी व मदतीचा हात समोर करावा अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. 

 अनुक्रमांक 
तारीख  
 नाव 
 गाव 
 जिल्हा 
 १
 २/०७/२०१५
 दिनेश धोंडे 
 पोरगव्हान 
 वर्धा 
 २
/०७/२०१५
 संतोष चटूले   
शेंदूरजना   
 अमरावती
 ३
 ३/०७/२०१५
 पांडुरंग मडावी 
वाटखेड

 यवतमाळ 
 ४
  ४/०७/२०१५
 अमोल वायले 
शिरसगाव 
यवतमाळ
 ५
  ४/०७/२०१५
शामराव कोराडे 
 भिवापूर 
अमरावती
 ६
  ५/०७/२०१५
 सतीश सिद्धराम 
 गोहद 
वर्धा  
 ७
  ५/०७/२०१५
  मारोतराव ऐटारे 
 पांढरी 
 यवतमाळ 
 ८
  ५/०७/२०१५
 हरिहर करडे 
 देऊळगाव 
 अकोला 
 ९
  ५/०७/२०१५
 नारायण ठाकरे 
 पिंपळ विहीर 
 अमरावती 
 १०
  ६/०७/२०१५
 मौह्मद अखिल सौदागर 
 काटपूर 
 अमरावती 
 ११
  ६/०७/२०१५
 प्रकाश चव्हाण 
 कंधारी 
 यवतमाळ 
 १२
  ७/०७/२०१५
 अंतराम टेकाम 
आलेन्दूर 
 भंडारा 
 १३
  ७/०७/२०१५
 सतीश पोखले 
 रोहीखेड 
 बुलढाणा 
 १४
  ९/०७/२०१५
 मनोहर वाटखुळे  
पवनार
 वर्धा 
 १५
  ९/०७/२०१५
 यादव जीवतोडे 
 शेम्बळ 
 चंद्रपूर 
 १६
 ९/०७/२०१५
 रामराव नैताम 
 वाटखेड 
 यवतमाळ 
 १७
१०/०७/२०१५
 पुडलिक उखाडे 
 किन्ही 
 यवतमाळ 
 १८
१०/०७/२०१५
 रामचंद्र कुम्बलकर 
 वडनेर 
 वर्धा 
 १९
१०/०७/२०१५
 रघुनाथ इंगळे 
 खालेगाव 
 बुलढाणा 
 २०
 ११/०७/२०१५
 मांगीलाल आडे 
 मनोरा 
 वाशीम 
 २१
  ११/०७/२०१५
 देवीदास तायडे 
 अहमदाबाद 
 अमरावती
 २२
 ११/०७/२०१५
 बळीराम भाटकर
 मोरझडी 
 अकोला 
 २३
 १२/०७/२०१५
 शालिक गेडाम 
 वाठोडा 
 यवतमाळ 
 २४
 १२/०७/२०१५
 विलास गावंडे 
 कलाशी 
 अमरावती 
२५ 
 १२/०७/२०१५
 देवीदास केट
 धनज 
 वाशीम 
 २६
 १३/०७/२०१५
 बापूराव झाडे 
 रावेरी 
 यवतमाळ 
 २७
 १३/०७/२०१५
 रामेश्वर जामनिक 
 कलाशी 
 अमरावती 
 २८
 १३/०७/२०१५
 पुंडलिक सुकलकर 
 दाभा पहूर 
 यवतमाळ 
 २९
१४/०७/२०१५
प्रमोदगावंडे 
 उटी 
 यवतमाळ 
 ३०
 १५/०७/२०१५
 मनोहर कलंगी 
 सलाई 
 वर्धा 
 ३१
 १६/०७/२०१५
 आनंदा राठोड 
 बोथ बोडण 
 यवतमाळ 
 ३२
 १६/०७/२०१५
 गणेश वाघ 
 पेण टाकली 
 बुलढाणा 


विदर्भातील ३० लाख शेतकऱ्यांनी पेरणी केली असुन फक्त जेमतेम ५ लाख शेतकऱ्यांना बँकांनी नवीन पिककर्ज दिले खाजगी सावकारांकडून व खुल्या बाजारातून   सुमारे २० लाख हेक्टर मधील केलेली पेरणी हातातून जात असल्यामुळे निराशेत शेतकरी आत्महत्या करीत आहेत ,सरकारने पिककर्ज माफी न देण्याचे व तसेच कापसाची व सोयाबीनची फक्त १०० रुपये व ५० रुपये केलेली  हमीभावाची घोषणेमुळे अचानक शेतकरी आत्महत्यांची नवी लाट आली असून ह्या सर्व शेतकरी आत्महत्या सरकारच्या चुकीच्या धोरणाचे बळी असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे . 
या शेतकरी आत्महत्या विदर्भाच्या कृषी संकटाची फक्त एक चाहूल असुन स्मार्टसिटी व मेट्रोरेलचा विकासाचा नारा देणाऱ्या सरकारला एक इशारा असून त्यांनी आपली धोरणे शेतकरी व गरिबाला समोर ठेऊन बदलावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे . 
==========================================