Saturday, 13 June 2015

"महाराष्ट्राच्या शेतकरी आत्महत्यांचा कृषी संकटाशी निगडीत नाहीत " हा शोध लावणाऱ्या १३ प्रधान सचिवांचा शेतकरी विधवा करणार जाहीर सत्कार

"महाराष्ट्राच्या शेतकरी आत्महत्यांचा कृषी संकटाशी  संबंध  नाही " हा शोध लावणाऱ्या १३ प्रधान सचिवांचा शेतकरी विधवा करणार जाहीर सत्कार 
दिनांक -१३ जुन २०१५
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विदर्भातील यवतमाळ व मराठवाड्यातील उस्मानाबाद या दोन जिल्याना पायलट  प्रोजेक्ट म्हणून एका वर्षात शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी यवतमाळ व  उस्मानाबाद जिल्यातील प्रत्येक उपविभागीसाठी एक असे १३ प्रधान सचिवांची चमु नियुक्त करण्यात आल्यावर या १३ प्रधान सचिवांची  जबाबदारी निश्चित करून कृषी संकटाची व शेतकऱ्यांमधील तणाव दूर करण्यासाठी सरकारी योजनांचा फायदा शेतकऱ्यांना देण्यासाठी व संवाद प्रस्थापित करून नैरायात एक नवीन उमेद आणण्यासाठी सरकारच्या साऱ्या प्रयन्तावर या १३ प्रधान सचिवांची  'महाराष्ट्रातील  शेतकरी आत्महत्यांचा दुष्काळ, नापिकी, कर्ज , कृषीमालाचा भाव या बाबींचा काहीही काडीमात्र संबंध नसुन साऱ्या शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांच्या घरगुती कारणामुळे व अनियंत्रित खर्चामुळे वा व्यसनाधीनतेमुळे होत असल्याच्या अहवाल' मुख्यसचिवाना पाणी फेरले आहे या १३  प्रधान सचिवांनी शेतकरी आत्महत्यांवर लावलेला शोध मागील १७ वर्षापासून अनेक संस्थांनी ,आयोगांनी व  लोकसभा व विधान सभेच्या खासदार व आमदारांनी सादर केलेल्या साऱ्या अह्वालाना केराची टोपली दाखविणारां असल्यामुळे या अतिशय विचारी व सात दिवसात शेतकरी आत्महत्यांचे मूळ शोधल्यामुळे ज्या यवतमाळ जिल्यातील केळापूर तालुक्यातील धोददरा या गावाचे पाटील माधवराव गोळे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मी आत्महत्या करीत व माझ्या  आत्महत्येला सरकार जबाबदार असे पत्र आपली जीवनयात्रा संपविली त्या खेड्यात यवतमाळ जिल्यातील शेकडो विधवा या १३  प्रधान सचिवांचा जाहीर सत्कार करणार असुन या त्यांच्या कृषी संकटावरील  अफलातून तयार केलेल्या अह्वालावर त्यांना प्रत्येकी १ रुपयांचे नगदी बक्षिशही येत्या  २० जूनला देणार असल्याची माहीती शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या अप्रना मालीकर व शेतकरी आत्महत्यांवर मागील दोन दशकापासून सतत ओरड करणारे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली . 
'या अधिकाऱ्यांनी अत्यंत अडचणीत दररोज  यवतमाळ जिल्यात ३ ते ४ शेतकरी आत्महत्या करीत असतांना त्यांना वाचविण्याचे सोडून हा शोध निंबध वा अहवाल कोणाच्या आदेशाने तयार केला व महाराष्ट्राच्या भाजप व शिवसेना नेत्यांची या नौकरशाहीच्या उन्मादाला मान्यता आहे का ? असा सवाल किशोर तिवारी केला असुन सरकारने मागील सर्व शेतकरी आत्महत्यांवर देण्यात आलेले १९९७ पासूनचे अहवाल खोटे असून आता या १३  प्रधान सचिवांचा नवा शोध त्यांच्या शेतकरी धोरणाचा पाया आहे का हा सुद्धा आता चिंतेचा विषय झाला आहे कारण १३  प्रधान सचिवांचा हा रिपोर्ट मुख्यसचिवांनी माध्यमांना दिल्यानंतर सत्तेची मजा घेणाऱ्या  एकाही भाजप व शिवसेना नेत्यांनी यावर आपले मत मांडले वां याला खुला विरोध केला ही शरमेची बाब आहे असा आरोपही तिवारी यांनी केला आहे . 

महाराष्ट्रातील  शेतकरी आत्महत्यांचा दुष्काळ, नापिकी, कर्ज , कृषीमालाचा भाव या बाबींचा काहीही काडीमात्र संबंध नसेल तर कृषी संकटाची कारणे नौकरशाही निश्चित करणार असेल लोक नियुक्त सरकारने यावर बोलू नये आम्ही या अधिकाऱ्यांना त्यांचा सत्कार करून हिशोब घेऊ जर येत्या २० जूनला यवतमाळ जिल्यातील केळापूर तालुक्यातील धोददरा या खेड्यात हे १३  प्रधान सचिव सत्काराचे आमंत्रण देऊनही येणार नसतील तर यांच्या प्रतिमांचा सत्कार करून त्यांचे  प्रत्येकी १ रुपयांचे नगदी बक्षिश मनीऑरडरणे पाठविण्यात येणार असल्याची माहीती शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या अप्रना मालीकर यांनी दिली . 

No comments:

Post a Comment