Thursday, 11 June 2015

माधवराव पाटलांच्या 'सूसाइड नोट' ने विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्य जगासमोर मांडले

माधवराव पाटलांच्या 'सूसाइड नोट' ने विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्य जगासमोर मांडले  
दिनांक -११ जुन २०१५

ज्या दिवशी महाराष्ट्राचे १३ प्रधान सचिव मुख्य सचिवांना विदर्भाच्या शेतकरी आत्महत्यांचा कृषी संकटाचा , सतत नापिकी व अभुतपुर्व दुष्काळाचा सरळ संबंध नसून विदर्भाच्या शेतकरी आम्हत्याना सरकारचे चुकीचे धोरण व प्रशासनाचे उदासीनता जबाबदार नसुन सारे शेतकरी घरगुती व व्यसनाधिन्तेमुळे आलेला तणाव असल्याचा गंभीर अहवाल  सादर केल्यावर या  अहवालाची कटू सत्यता जगासमोर यवतमाळ जिल्यातील घोड्दरा या खेड्यातील एक सामाजीक नेते ज्यांनी आपल्या ४० वर्षांच्या राजकीय जीवनात १५ वर्ष ग्राम पंचायतीमध्ये तर जिल्याचा सहकार चळवळीत तेलंगटाकळी आदिवासी विविध सहकारी सोसायटीच्या संचालक या नात्याने १२ वर्ष शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावल्या त्या माधवराव गोळे पाटील यांनी आपल्या शेताच्या   विहरीत आत्महत्या करतांना लिहलेल्या  'सूसाइड नोट' ने मांडली आहे व सरकारने या मृत्यूपूर्व चिठ्ठीची गंभीर दखल घ्यावी व माधवराव गोळे यांनी सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतीमालाला भाव या दोन मागण्या मान्य कराव्या अशी विनंती विदर्भ जनांदोलन समितीचे शेतकरी नेते किशोर तिवारी महाराष्ट्र सरकारला केली आहे . 

मृत्यूपूर्व चिठ्ठीत माधव गोडे यांनी सरकारला पोलिसांच्या मार्फत स्पष्ट म्हटले आहे की  'आजपर्यंत कर्जमाफी मिळण्याची वाट बघत होतो. मात्र दोन महिने वाट बघूनही कर्जमाफी मिळाली नाही. कर्जमाफीची वाट बघून थकल्याने अखेर मी आज आत्महत्या करीत आहे' असा निरोप महाराष्ट्र सरकारला दीला व माझ्या आत्महत्येचा विचार करून इतर कर्जबाजारी शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी, असेही आवाहनही माधवराव पाटील गोळे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे . माधव तुकाराम गोडे यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीतून विदर्भातील शेतकर्‍यांचे वास्तवच मांडले आहे त्यांनी माझ्या कडे पाच एकर शेती आहे व  मात्र सततची नापिकी आणि उत्पादनातील घट व शेतमालाला मिळणारा तोकडा दर यामुळे मी  वैतागले होते व  नापिकीमुळे कर्ज फेडणे त्यांना अशक्य झाले होते असे लिहले असुन  त्या चिठ्ठीत माधव गोडे यांनी विदर्भातील शेतकर्‍यांचेच जणू वास्तव लिहिले होते. 'माझ्या मृत्यूला गावातील किंवा नातेवाईक कोणी जबाबदार नसून सरकार व सरकारचे धोरण जबाबदार आहे, माझ्यावर सोसायटीचे ७० हजार व खासगी बँकेचे ५०ते ६०  हजार कर्ज असल्याचे तसेच कर्जमाफी मिळाली नाही, आता मी पुढे शेती करू शकत नाही म्हणून हे जग सोडून जात आहे असे लिहिले आहे ,सरकारने या पत्राची साधी दखल घेतलेली नाही व एकही जबाबदार प्रधान सचिव  त्यांचा दारी गेलेला ही शोकांतिका असुन माननीय  मुख्यमंत्र्यांनी माधवरावांच्या घरी भेट द्द्यावी अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे . 
 यावर्षी विदर्भाच्या ५० लाख कर्जबाजारी व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांमधून फक्त २० टक्के मागील वर्षीच्या २०१४-१५ थकितदारांना पीककर्ज पुनर्वसन योजनेचा लाभ मिळणार असून मागील तीन वर्षापासून सतत नापिकी ,दुष्काळ व अतिवृष्टीचा मार बसणारे  ४० लाख तणावग्रस्त शेतकरी नवीन पिककर्जा पासुन वंचित राहणार हे आता स्पष्ट होत आहे त्यामुळे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व शेतकऱ्याने १५ जून पर्यंत नवीन पीककर्ज मिळणार अशी घोषणा रोज करीत मात्र सरकारच्या आदेशानुसार फक्त २० टक्के मागील वर्षीच्या २०१४-१५ थकितदारांना पीककर्ज पुनर्वसन योजनेचा लाभ मिळणार असून मागील तीन वर्षापासून सतत नापिकी ,दुष्काळ व अतिवृष्टीचा मार बसणारे थकितदार  ४० लाख तणावग्रस्त शेतकरी यांनी काय करावे यावर बोलत नाही एकीकडे मुख्यमंत्री कर्जमाफीचा विचार चालू आहे अशी पुंगी सोडतात तर अर्थमंत्री सुधीर  मूनगणट्टीवार सातबारा कोरा करता येत नाही कारण तिजोरी रीकामी आहे असा हवाला देतात या सरकारने विदर्भाच्या कृषी संकटाचा  व शेतकरी आत्महत्यांचा गांभीर्य गमावले असुन सरकारच्या उदासीनतेमुळे जास्त शेतकरी मरत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे . यावर्षी सर्व २०१२-१३,१३-१४,व १४-१५ चे थकित  पीककर्ज ,मध्यम मुदतीचे सर्व प्रकारचे कृषी कर्ज व तारण कर्ज यांचे पुनर्वसन करण्याची मागणी शेतकरी करीत असून नौकरशाहीच्या समोर शरणागती घेतलेल्या सरकारने यावर जाणून बुजून मौन धारण केले आहे यामुळे येत्या महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती तिवारी व्यक्त केली आहे .

No comments:

Post a Comment