Sunday, 7 June 2015

"आम्हाला पिक कर्जासाठी बांगलादेश ,मंगोलिया ,फिजीला पाठवा" विदर्भाच्या ५० लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे

"आम्हाला पिक कर्जासाठी बांगलादेश ,मंगोलिया ,फिजीला पाठवा" विदर्भाच्या ५० लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे 
दि-७ जून २०१५ 

मागील एका वर्षात  मंगोलिया, बांगलादेश, मॉरिशस, नेपाळ, फिजी  ,श्रीलंका व भुतान सारख्या आणि इतर देशांमध्ये दौरा करून तेथील शेती व विकासासाठी मंगोलिया, बांगलादेश, मॉरिशस, नेपाळ, फिजी  ,श्रीलंका व भुतान सारख्या देशात मंगोलिया, बांगलादेश, मॉरिशस, नेपाळ, फिजी  ,श्रीलंका व भुतान सारख्या देशात सुमारे ३२ हजार कोटीची नवीन पत-कर्जाची खैरात वाटणाऱ्या   भारतीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना  आम्हला यावर्षी शेती करण्यासाठी नवीन  पिक कर्जासाठी मंगोलिया, बांगलादेश, मॉरिशस, नेपाळ, फिजी  ,श्रीलंका व भुतान सारख्या देशात पाठवा अशी विनंती करणारी याचिका विदर्भाच्या शेतकऱ्यांकडून विदर्भ जनांदोलन समितीने केली असून यावर्षी विदर्भाच्या ५० लाख कर्जबाजारी व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांमधून फक्त २० टक्के मागील वर्षीच्या २०१४-१५ थकितदारांना पीककर्ज पुनर्वसन योजनेचा लाभ मिळणार असून मागील तीन वर्षापासून सतत नापिकी ,दुष्काळ व अतिवृष्टीचा मार बसणारे  ४० लाख तणावग्रस्त शेतकरी सावकारांच्या दारावर पाय घासत मरतील नाहीतर ६०% जमिनीवर यावर्षी पेरणीच होणार नसल्याची भीती विदर्भ जनांदोलन समितीचे शेतकरी नेते किशोर तिवारी व्यक्त केली आहे . 
सत्तेत येण्यापूर्वी विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कैवार घेऊन सर्वांचे थकित पिककर्ज माफ करून  सात बारा कोरा करून सर्वांना नवीन पिककर्जाची हमी देणारे भारतीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी  सुमारे १३००च्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर एकदाही विदर्भात आले नाही मात्र मागील बारा महिन्यात साऱ्या जगाचा दौरा करून मंगोलिया, बांगलादेश, मॉरिशस, नेपाळ, फिजी  ,श्रीलंका व भुतान सारख्या देशात जाऊन सुमारे ३२हजार कोटीची  खैरात वाटल्यामुळे शेतकऱ्यांनी आता मोदींनी आम्ह्लाच मंगोलिया, बांगलादेश, मॉरिशस, नेपाळ, फिजी  ,श्रीलंका व भुतान सारख्या देशात पाठवावे अशी ओरड होत आहे मात्र सत्तेत आंधळे झालेल्या मोदींना विदर्भाच्या ५० लाख दुश्काऴग्रस्त  दुखं कोण सांगणार असा सवाल तिवारी यांनी केला आहे . 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व शेतकऱ्याने १५ जून पर्यंत नवीन पीककर्ज मिळणार अशी घोषणा रोज करीत मात्र सरकारच्या आदेशानुसार फक्त २० टक्के मागील वर्षीच्या २०१४-१५ थकितदारांना पीककर्ज पुनर्वसन योजनेचा लाभ मिळणार असून मागील तीन वर्षापासून सतत नापिकी ,दुष्काळ व अतिवृष्टीचा मार बसणारे थकितदार  ४० लाख तणावग्रस्त शेतकरी यांनी काय करावे यावर बोलत नाही एकीकडे मुख्यमंत्री कर्जमाफीचा विचार चालू आहे अशी पुंगी सोडतात तर अर्थमंत्री सुधीर  मूनगणट्टीवार सातबारा कोरा करता येत नाही कारण तिजोरी रीकामी आहे असा हवाला देतात या सरकारने विदर्भाच्या कृषी संकटाचा  व शेतकरी आत्महत्यांचा गांभीर्य गमावले असुन सरकारच्या उदासीनतेमुळे जास्त शेतकरी मरत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे . यावर्षी सर्व २०१२-१३,१३-१४,व १४-१५ चे थकित  पीककर्ज ,मध्यम मुदतीचे सर्व प्रकारचे कृषी कर्ज व तारण कर्ज यांचे पुनर्वसन करण्याची मागणी शेतकरी करीत असून नौकरशाहीच्या समोर शरणागती घेतलेल्या सरकारने यावर जाणून बुजून मौन धारण केले आहे यामुळे येत्या महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती तिवारी व्यक्त केली आहे . 


No comments:

Post a Comment