Friday, 8 May 2015

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी तुर मातीमोल भावात विकल्यानंतर आता आता तुर व तुर डाळीच्या किमतीमध्ये साठेबाजारीमुळे अभुतपूर्व वाढ -सरकारने ग्राहकांच्या लुट थांबवावी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी तुर  मातीमोल भावात विकल्यानंतर आता आता तुर व तुर डाळीच्या किमतीमध्ये साठेबाजारीमुळे अभुतपूर्व वाढ -सरकारने  ग्राहकांच्या लुट थांबवावी 

दिनांक -८ मे २०१५ 
मागील जानेवारी ते मार्चमध्ये मध्ये  शेतकर्यांनी आपली तूर जेमतेम ५००० रुपये भावात विकल्यानंतर आता तुरीचे भाव सात ते आठ हजारावर जात असून  महिन्यापूर्वी किरकोळमध्ये ७५ ते ८० रुपयांवर असलेली तूर डाळ आता थेट १०५ रुपयांवर पोहोचली आहे या प्रचंड  दरवाढीच्या फटका ग्राहकांना सोसावा लागत असुन  डाळ गरिबाच्या ताटातून गायब झाली आहे मागील दहा दिवसात साठेबाजी करणाऱ्या मुठभर व्यापाऱ्यांनी  कृत्रिमपणे ही  प्रचंड सर्वच डाळीमध्ये वाढ केली असून सरकारने शेतकऱ्यांनी मंदीच्या नावावर पडेल किमतीमध्ये सारी तुरी विकत घेऊन आता  मार्चमध्ये  कोसळलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले के कारण समोर करून तूर, चणा, वाटाणा, मसूर, मूग आदीच्या दरात बाजारात अचानकपणे झालेली  वाढ व्यापारी कटाचा भाग असुन सरकारने गरीबाची व जनतेची लुट  थांबविण्यासाठी साठेबाजारी करणाऱ्यांवर  तात्काळ कारवाई करावी व गरिबांना सार्वजनिक वितरण प्रणालीमधून तूर डाळीचे वाटप ४० रु . दराने सुरु करावी अशी मागणी विदर्भ जन आंदोलन  समितीचे  नेते किशोर तिवारी यांनी केली आहे . 
किरकोळमध्ये तूर डाळ ११० च्या जाणार 
मागील महिन्याचा शेवटी  बाजारात तूर डाळ दर्जानुसार प्रति किलो ८,२०० ते ९,५०० रुपयांपर्यंत  होती आता मात्र किरकोळमध्ये दर १०० रुपयांवर पोहोचल्याने गरीब, मध्यमवगीर्यांनी खरेदी थांबविली आहे. त्याऐवजी वाटाणा डाळ आणि लाखोळी डाळीची खरेदी वाढविली आहे. ठोकमध्ये वाटाणा डाळ प्रति क्विंटल ३,००० ते ३,५०० रुपये, बटरी डाळ ४,२०० ते ४,५०० रुपये आणि लाखोळी डाळ ३,१०० ते ३,३५० रुपये आहे. या डाळीला गरिबांकडून मागणी वाढल्याने यांच्या किमतीमध्येही दररोज तूर डाळ सोबतच   प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपयांची वाढ  झालेली आहे . हि वाढ   व्यापाऱ्यांनी  कृत्रिमपणे केली असून सरकारने जर कारवाई केली नाहीतर अशीच गरिबांची लुट अजून जास्तच वाढणार असल्याची भीती किशोर तिवारी व्यक्त केली आहे . 
शेतकऱ्यांनी आपला माल मातीमोल किमतीमध्ये विकल्यानंतर होणारी किमतीमधील वाढ वेदना देणारी 
यावर्षी शेतकऱ्यांनी कापुस सरासरी रु ३८०० दराने विकला तुर सरासरी  रु ५००० दराने विकली आता कापसाची खरेदी रु ५००० च्या दराने तर तुरीची खरेदी विक्रमी रु ८००० दराने होत आहे हा सगळा प्रकार विदर्भाच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वेदना देणारा असून मायबाप सरकार या संघटीत बाजाराच्या लुटीपासुन रोखण्यासाठी पर्यायी उपाय कधी देणार असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे

No comments:

Post a Comment