Saturday, 30 May 2015

"सर्व थकीत पिककर्जदारांना नवीन पिककर्ज" ही सरकारची घोषणा ठरली मुर्गजळ : नवीन पिककर्जासाठी आता ५ जुनपासून "डफडे वाजवा आंदोलन "

"सर्व थकीत पिककर्जदारांना नवीन पिककर्ज" ही सरकारची घोषणा ठरली मुर्गजळ :  नवीन पिककर्जासाठी आता ५ जुनपासून "डफडे वाजवा आंदोलन "
दिनांक -३० मे २०१५
यावर्षी  महाराष्ट्रातील  दुष्काळाच्या व नंतरच्या अकाली पावसाने आत्महत्या करीत असलेल्या सुमारे १ कोटी शेतकऱ्यांची  मागील सतत तीन वर्षापासून दुष्काळामुळे  बँकांच्या प्रलंबित पिककर्ज न भरल्यामुळे  बंद असलेली दारे पुन्हा नव्याने उघडण्याची हमी देत व्याजमाफी देऊन आता सातबारा यावर्षी कोरा असणार सर्वांना बँक नवीन पिक कर्ज देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आठवड्यात मंत्रीमंडळाच्या  आढावा बैठकीनंतर केली होती  व सरकारचा आदेश न मानणाऱ्या बँकावर पोलिसामार्फत कारवाई करण्याचे संकेत दिल्यावर शेतकऱ्यांनी बुधवारपासून बंकासमोर नवीन  पिककर्ज  घेण्यासाठी वृतपत्र घेऊन गर्दी केली तर सरकारी बँकांनी अजून आदेश आले नाहीत व आम्ही पुनर्वसन १५ जून नंतर करणार व नाबार्डच्या आदेशानुसारच  फक्त मागील हंगामात ज्यांनी पिककर्ज उचलेले आहे त्यांना पहिला हप्ता भरल्यावरच विचार करण्यात येईल अशी माहिती दिली मात्र विदर्भ मराठवाड्यात मागील तीन वर्षापासून दुष्काळ व नापिकी होत असल्यामुळे मागीलवर्षी जेमतेम १५ टक्के शेतकऱ्यांनी नवीन पीककर्ज खांदेपालट करून घेतले होते तर ९० टक्के शेतकरी थकीतदार झाले असुन मध्यम मुदतीचे कर्जही मोठ्याप्रमाणात आहे यामुळे   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली व्याजमाफीची घोषणा एक मुर्गजळ ठरत असुन सरकारने मागील तीन   वर्षापासुन सतत  दुष्काळ ,अतिवृष्टी व नापिकी मुळे बँकाची सर्व प्रकारची शेतीकर्जावरील व्याज माफ करावे व तसे नाबार्डचे आदेश व निधी बँकांना उपलब्ध करावा अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष व शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी सरकारला केली आहे . 

शेतकऱ्यांना नवीन पिककर्ज ७ जूनपूर्वी मिळणे  आवश्यक आहे मात्र बँका पुनर्वसन करण्यास तयार नाही व १५ जून नंतर  विचार करणार अशी बतावणी करीत आहेत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना केंद्र सरकार व नाबार्डचे निधी  पुरवठा व कर्ज वाटप लक्ष दाखवा असे वरचे अधिकारी सांगत असून मुख्यमंत्री कोणतीही कारवाई करण्यास कायद्याने सक्षम नाहीत तर जिल्याधिकारी काहीच करू शकत नाही असे शेतकऱ्यांना खुले आव्हानं करीत असल्यामुळे शेतकरी येत्या ५ जून पासुन  'डफडे वाजवा' आंदोलन करून बँक व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाला जागविण्याचा प्रयत्न करणार  आहे कारण सध्या संपूर्ण विदर्भात या वर्षी सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप करण्यास टाळाटाळ सुरु केली असून   लाखो शेतकर्‍यांवर सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.या सर्व शेतकर्‍यांना आत्महत्येसारख्या संकटातून वाचविण्यासाठी केंद्र सरकारने नव्याने पीककर्ज द्यावे, असा एकमुखी ठराव आंदोलनादरम्यान घेण्यात येणार  आहे. तसेच  या ठरावाचे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री पाठविण्यात येणार आहे अशी माहीती किशोर तिवारी यांनी दिली . 

यावर्षी प्रचंड विदारक परिस्थिती संपूर्ण विदर्भात निर्माण झाली आहे सरकार फक्त घोषणाच करीत आहे . त्यामुळे 'डफडे वाजवा' आंदोलन करूनहीसरकार  जागणार नसतील तर आम्ही यापुढे 'बदडा' आंदोलन करू, असा इशारा शेतकरी नेते  मोहन जाधव, मोरेश्‍वर वातीले, सुरेश बोलेनवार, अंकीत नैताम, प्रितम ठाकूर, भीमराव नैताम, प्रेम चव्हाण, राजु राठोड, संतोष नैताम, राजु उपलेंचवार, गजानन बोदुरवार, सुधाकर गोहणे, सुनिल राऊत, विलास आत्राम, विलास मांढरे, संदीपसिंग ढालवाले, शंकर अंधेवार, नागोराव येन्नरवार, शंकर गटलेवार, रामदास कुक्कुलवार, नारायण सोमलवार, मुरली वाघाडे, राम मुत्यलवार, अशोक बोमकंटीवार, शेखर जोशी, विठ्ठल चिट्टलवार यांनी दिला आहे. 

No comments:

Post a Comment