Sunday, 3 May 2015

'कर्जमुक्ती व हमीभाव वाढ' -शेतकरी विधवा करणार प्रधानमंत्री निवसासमोर उपोषण

'कर्जमुक्ती व हमीभाव वाढ' -शेतकरी विधवा करणार प्रधानमंत्री 

निवसासमोर उपोषण
दिनांक -३ मे २०१५
आपली हाक व बोंब आता राज्यात कोणीही ऐकत नाही सरकार विदर्भाच्या कोरडवाहु शेकर्‍यांच्या संपूर्ण पीककर्ज माफी व लागवड खर्च अधिक ५0 टक्के नफा असा हमीभाव देण्यास तयार नाही व सरकारने सर्व शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला असून संपूर्ण जगात फिरणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले दु:ख दूर करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे आता राजधानी दिल्लीला जाऊन शेकडो शेतकरी विधवा पंतप्रधान निवसाबाहेर उपोषण सत्ताग्रह करण्याच्या एकमुखी ठराव आज पांढरकवडा येथे आयोजित ''सात बारा कोरा करा '' या आंदोलनात घेण्यात आला. हा ठराव विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या सचिन केबीसी फेम अपर्णा मालीकर यांनी मांडला व आंदोलनात सामील झालेल्या शेकडो शेतकरी विधवा व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी याला पाठींबा दिला. 
आंदोलन कर्ज मुक्तीसाठी सरकारला बाध्य करण्यासाठी शेतकर्‍यांचे सर्व पक्ष ,पंथ व विचार सोडून करा वा मारा असे टोकाचे 'सात बारा कोरा करा' आंदोलन सुरू करण्याची घोषणा कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर मागील दोन दशकापासून सतत लढा देणारे शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी हे आवाहन यावेळी बोलताना केले . 
आंदोलनात विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबी बैस ,भारती पवार ,चंद्रकला मेर्शाम ,अचर्ना राउत ,अंजुबाई भुसारी ,इंदू आष्टेकर ,सुनिता पेंदोरे ,जनाबाई घोडाम सह शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते मोहन जाधव ,प्रेम चव्हाण ,सुनील राऊत ,किरणताई कोल्वते ,प्रीतम ठाकूर ,अंकित नैताम, गोपाल शर्मा , मनोज मेर्शाम, मुरली वाघाडे ,रामभाऊ मुत्तलवार , शेखर जोशी ,संतोष नैताम ,प्रकाश बोलेनवार ,भीमराव नैताम ,यशवंत गोलमवार , श्रीराम आत्राम ,भास्कर टेकाम ,अतुल कुडवे ,सीताराम आडे,भारत धुर्वे ,रामकुल कुमरे ,माधव तोडसाम सह शेकडो शेतकरी विधवा शेतकर्‍यांनी सहभाग घेतला . 
यावेळी शेतकरी नेट किशोर तिवारी यांनी भाजपच्या केंद्राच्या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी शेतकर्‍यांना एकदाची थकित पीक कर्जामधुन मुक्ती देण्यासाठी 'सातबारा कोरा ' करण्याचे अभिवचन वारंवार दिले होते व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप -सेना युती सत्तेवर येताच शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे जाहीर आश्‍वासन विदर्भाच्या सर्व सभेत दिले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक प्रचार २१ मार्च वर्धा व दाभाडी येथे सुरु करताना शेतकरी आत्महत्यामुळे व शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे होत असून मला सत्तेवर आणा मी सर्व शेतकर्‍यांना नव्याने बँकांची दारे खुली करतो व पीक कर्ज देतो तसेच शेती नफ्याची होण्यासाठी शेतीमालाचा हमीभाव लागवड खर्च अधिक ५0 टक्के नफा व या हमीभावावर सर्व शेतीमालाची सरकारकडून खरेदी करण्याची गाव्ही दिली होती. मात्र केंद्रात व राज्यात अर्मयाद सत्ता आल्यानंतर 'सातबारा कोरा ' करण्याचे व लागवड खर्च अधिक ५0 टक्के नफा असा हमीभाव देण्याच्या आश्‍वासनाचा केंद्र व राज्य सरकारला सोयीने विसर पडला असल्यामुळे आता आम्ही या आंदोलन सुरू केले असून सरकार शेकर्‍यांच्या संपूर्ण पीक कर्ज माफी व लागवड खर्च अधिक ५0 टक्के नफा असा हमीभाव देण्यास तयार होत तोपर्यंत आम्ही रेटणार असल्याची घोषणा केली . 
यावर्षी २0१५ मध्ये महाराष्ट्रात ११६0 तर विदर्भात ५१२ शेतकर्‍यांनी तसेच १९९५ पासून भारतमध्ये २0१४ पर्यंत ज्या ३ लाख १४ हजार व महाराष्ट्रामध्ये ६४५२0 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून याला शेतीमालाचे भाव व नापिकीमुळे झालेले कर्ज कारणीभूत असून यावर सरकारने तात्काळ तोडगा काढावा व जागतीकरणाच्या व खुल्या अर्थक ारणामुळे कृषी संकट आले आहे .त्या असून मुठभर लोकांना श्रीमंत करणारी व कोट्यवधी शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास लावणारी विकास धोरणे बदलली पाहिजे अशी मागणी शेतकरी विधवा अपर्णा मालीकर यांनी केली . सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पीककर्ज व दुष्काळग्रस्त व तणावग्रस्त मदतीचे पॅकेज शेतकरी आत्महत्या कमी होऊ शकत नाही यासाठी फक्त नाले रुंदीकरण हाच एकमेव पर्याय आहे, अशी मुक्ताफळे दररोज फोडत असून, भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेती विकास व तणावग्रस्त शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी 'कर्जमुक्ती व हमीभाव वाढ' या गरजापूर्तीसाठी आवश्यक असलेली दिशा,धोरणे राबविण्यास अपयशी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे पीक आले असून याअपयशाची जबाबदारी सरकारने घ्यावी, यावर्षी महाराष्ट्र सरकारने एकूण ३९ हजार ४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास ६0 टक्के गावांमध्ये पूर्णत: खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. यामुळे ९0 लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असून जागतिक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापूस, तूर, सोयाबीन व दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहेत तरी शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी सरकारने हमीभाव वाढ व पीक कर्जमाफी दयावी अशी मागणी विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबीताई बैस अशी मागणी यावेळी यांनी केली

No comments:

Post a Comment