Tuesday, 26 May 2015

"विदर्भ राज्य नाही" भाजपचे आणखी एक घुमजाव - नितीन गडकरी,हंसराज अहीर ;देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा दयावा

"विदर्भ राज्य नाही"  भाजपचे आणखी एक घुमजाव - नितीन गडकरी,हंसराज अहीर ;देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा दयावा 

दिनांक  २७ मे २०१५ 
पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी  दिलेले "सात बारा कोरा ' करण्याचे व कापसाचा व सोयाबीनचा हमीभाव लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा देऊन सर्व माल खरेदी करण्याचे आश्वासनाला पाने पुसल्यानंतर ज्या प्रमुख व अत्यंत ज्वलंत अशा  विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासनाला आता 'भाजपने जन्मात कधी विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन दिलेच नव्हते' या एका वाक्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विदर्भाच्या ३ कोटी जनतेच्या विश्वासघात केला असून भाजप निवडणुकीत विदर्भासाठी मतदान करा असा टाहो फोडणाऱ्या समस्त विदर्भवादी नेत्यांना तोंडघशी पाडले असून आता  विदर्भ राज्यासाठी लढण्याचे अॅफिडेव्हिट देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वेगळ्या विदर्भाची लोकसभेत करणारे केंद्रीयमंत्री हंसराज अहिर व  राज्य निर्मितीसाठी कधीकाळी युवा जागर यात्रा काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या मधील चौकडी मोदी -शहा -जैटेली -गोयल यांच्या हुकुमशाहीला शह देण्यासाठी आपल्या पदाचा विदर्भातील भाजपचे सर्व खासदार व  आमदारांसोबत पंदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी  विदर्भ राज्य निर्मितीसाठी भाजप पाठींबा देणारे विदर्भ जनदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केली आहे . 

मागील एक वर्षात मोदी -शहा जोडीने अख्या केंद्र सरकारचा व भाजपचा काबीज केली असुन विदर्भातील एकमेव भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांना सत्ताकेंद्रापासून दूर केले आहे व सहा महिन्यापूर्वी सर्व निर्णय शहाच घेतील या अटीवर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आले मात्र अशा प्रकारे प्रत्येक व्यासपीठावर आणि भाषणात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हिरीरीनं मांडणारे आणि त्यासाठी प्रसंगी मित्रपक्ष शिवसेनेला दुखावणारे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुरती गोचीकरण्यासाठीच  'विदर्भ वेगळा करण्याचा शब्द आम्ही कधी कोणाला दिला नव्हता,' अशी पलटी मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप कार्यालयात शहा यांनी काळ  पत्रकार परिषदमध्ये गडकरी-फडणवीस सोबत असतांना   मारली असुन त्यांची  गोची झाली केली आहे  या नेत्यांनी वेळोवेळी वेगळ्या विदर्भासाठी घेतलेली भूमिका खरी की अमित शहांचे मत अंतिम, असा संभ्रम आता वैदर्भीय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे म्हणून विदर्भाच्या भाजप नेत्यांनी .आपली अस्मिता व जनाधार वाचविण्यासाठी विदर्भाचा मुद्द्या समोर करून मोदी -शहा यांचा एकाधिकार व दहशतवाद मोडून काढण्याचा सुतोवात करावा असे आवाहनही तिवारी यांनी केले आहे . भाजपने विदर्भवादी भूमिका उघडपणे ९० च्या दशकात स्वीकारली. १९९७ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी वेगळ्या विदर्भाचा ठराव मंजूर केला. तोच ठराव पुढे करून आजपर्यंत त्यांनी विदर्भावरील निष्ठा प्रगट केली. २०१० मध्ये तेलंगण राज्य निर्मितीचे वारे वाहू लागले आणि भाजप विदर्भाच्या आंदोलनात सक्र‌ियपणे सहभागी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी शेगाव येथून, तर सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथून 'युवा जागर यात्रा' काढली. विदर्भाचा लढा अखेरपर्यंत लढू, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. भाजपने तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बोलावून, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात 'विदर्भ जनजागरण यात्रे'चा समारोप घडविला होता याची आठवणही तिवारी या भाजपनेत्याना करून दिली आहे  .

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन पहिल्यांदा नागपुरात आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात फडणवीस म्हणाले, 'योग्य वेळ येताच विदर्भाचे वेगळे राज्य होईल.' त्यानंतर डिसेंबर मध्ये दिल्लीत योजना आयोगासंदर्भातील बैठकीला गेले असता ते म्हणाले, ' विदर्भाचा निर्णय दिल्लीत होईल'. कोल्हापुरात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात विदर्भ राज्य निर्मितीचा विषय चर्चेला आला नाही. मुख्यमंत्र्यांनी मी विदर्भवादी असल्याची भूमिका बोलता बोलता स्पष्ट केली. अमित शहा यांनी आज विदर्भ भाजपच्या अजेंड्यावर नसल्याचे स्पष्ट केले. विदर्भाचा मुद्दा निवडणूक जाहीरनाम्यात नाही, हे खरे आहे, मात्र भाजपच्या कार्यकारिणीने संमत केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शहा यांच्यावर तो बंधनकारक आहे की नाही,कारण 
 वेगळ्या विदर्भाच्या नावावर प्रचार करून भाजपने विदर्भातील लोकसभेच्या सहा आणि विधानसभेच्या ४४ जागा जिंकल्या होत्या हा जनतेचा विश्वासघात असून आता वेगळ्या विदर्भासाठी करा व मरा हाच पर्याय असुन  आता विदर्भाच्या जनतेनी रस्त्यावर येण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे . 
========================
========================
 

No comments:

Post a Comment