Monday, 18 May 2015

मोदी सरकारचे पहिले वर्ष विदर्भाच्या शेतकरी व ग्रामीण जनतेला निराशा व त्रागा देणारे -किशोर तिवारी

मोदी सरकारचे पहिले वर्ष विदर्भाच्या शेतकरी व ग्रामीण जनतेला निराशा व त्रागा देणारे -किशोर तिवारी 

१८ मे २०१५
सध्या मोदींच्या विकासाच्या मार्गाला जे  विरोध करीत आहेत  त्यांना  वाळीत टाकले जात आहेत  आता संघ परिवाराच्या भारतीय किसान संघ वा स्वदेशी जागरण मंच यांना चुप करण्यात येत आहे मात्र असे कोंबड्याच्या टोपलीवर चादर टाकून कटूसत्य असलेली सकाळ होणार नाही हा  मोदींचा विचार चुकीचा आहे कारण १९९९ मध्ये सुद्धा अटलबिहारी यांच्या भाजपप्रणीत सरकारचा पहिला वाढदिवस असाच 'इंडिया  शायनीग' च्या  नावाने साजरा करण्यात येत असतांना भारतीय मजदूर संघाच्या नेते दत्तोपंत ठेंगडी यांनी दिवाळखोर मजूर विरोधी व शेतकरी विरोधी  नीती  खुला विरोध केला होता मात्र त्यांना सुद्धा चूप करण्यात आले होते त्याचा परिणाम २००४ मध्ये भाजपला दिसला होता आता मोदिजींचा विकासाचा मार्ग व मुठभर लोकांचा हातात एक वटलेली सत्ता व गरीब व शेतकऱ्यांचा पडलेला विसर भाजपला इतिहासाची आठवण करून देणार हे  निश्चित होत आहे कारण सरकारने विदर्भाच्या शेतकऱ्यांचा केलेला विश्वासघात त्यामुळे  होत असलेल्या शेतकरी आत्महत्या आहेत . 
मागीलवर्षी मार्च महिन्यात भाजपच्या लोकसभेच्या प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा निवडले व त्यांच्या 'किसानोसे चाय पर चर्चा ' या कार्यक्रमासाठी  मागील दशकात साऱ्या जगाचे लक्ष कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी वेधणाऱ्या यवतमाळ जिल्याला निवडण्यात आले व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचार सांभाळणाऱ्या जाहीरात अहमदाबादच्या कंपनीने नरेंद्र मोदी हे कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी व्यथित असून भाजपच्या निवडणूक प्रचाराचा हा प्रमुख मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले व मोदिजीना भारताच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक दिवाळखोरीला व आत्महत्यांना कारणीभूत असलेल्या फक्त तीन प्रमुख कारणावर जनतेला उपाय ठोस आश्वसनाद्वारे देण्यासाठी  विदर्भ जनांदोलन समितीला अधिकृतपणे   आमंत्रित करण्यात आले व  शेतकरी आत्महत्या  मुक्तीचा  मसुदा तयार करण्यात आला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कृषी संकटाची कारणे वं उपाय असणारा महामंत्र वर्ध्यापासून  २० मार्च ते २० मे पर्यंत सत्ता काबीज होत पर्यंत सतत दिला मात्र त्यानंतर भाजपच्या सरकारने आपल्या आर्थिक धोरणात व विकासाच्या आराखड्यात या कृषी संकटाची कारणे वं उपाय असणारा महामंत्राला जागा देण्यात आली नाही ह्याचा परीणाम विदर्भात मोदी सरकारच्या मागील एक वर्षात  या दशकातील सर्वात जास्त  शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात झाल्या ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी वाचवा महामंत्राने भाजपला अभूतपूर्व सत्ता दीला त्या शेतकरी वाचवा महामंत्रावर मोदी सरकारचा उदोउदो होत असतांना गंभीर चर्चा होणे गरजेचे झाले आहे कारण विदर्भाच्या जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात या भाजपच्या दांभिकनेत्यांनी केला आहे , यामुळे सतत उपेक्षित व वंचित राहीलेल्या विदर्भाच्या शेतकऱ्यांना व आदिवास्याना होत असलेल्या वेदनांची व दाटलेल्या अंधाराची भाजपच्या विजयाच्या जल्लोषात एका समाजाच्या संवेदनशील कोपऱ्यात व्हावी हीच या आपला त्रागा कमी करण्यासाठी सुरु असलेली धडपड आहे . 
भारताच्या आत्महत्याग्रस्त व देशोधडीला लागलेल्या कोट्यावधी शेतकऱ्यांवर जादु करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी वाचवा महामंत्र कोणता होता यावर भाजपचे नेते बोलत नाहीत त्यावर चर्चा होणे अत्यंत अनिवार्य झाले कारण विदर्भाच्या कापूस उत्पादक भाग हा सरकारच्या खुल्या बाजाराच्या व जागतिककरणाच्या पूर्वी आर्थिकसंपन्न होता   मात्र आज आर्थिक दिवाळखोरीला तोंड देत आहे याला प्रमुख कारण विदर्भाचे नगदी पिक कापुसामध्ये अधिक खर्चाचे बियाणे व जागतिक मंदी व बाजाराकडून व सावकाराकडून होणारी शेतकऱ्यांची लुट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी वाचवा महामंत्र देताना शेतकऱ्यांना लागवड खर्च अधिक  ५० टक्के नफा असा हमीभाव व त्याभावावर सर्व माल विकत घेण्याची सरकारी यंत्रणा देण्याची ,सर्व शेतकऱ्यांना सावकार मुक्ती करण्यासाठी पिक कर्जमाफी करण्याची व जगात मंदीच्या लाटेत फसलेल्या कापसासारख्या नगदी पिकांच्या जागी डाळीचे व अन्नाचे पिक घेण्यासाठी विषेय अनुदान आधारीत योजना देण्याचे भरीव आश्वासन दिले मात्र त्यांनी या महामंत्रावर काम करण्याचे सत्तेवर आल्यावर विचारपूर्वक टाळले असून त्यांच्या विकासाचा मार्ग विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या मरणाचा मार्ग ठरत आहे . 
सध्या ग्रामीण विदर्भामध्ये सतत नापिकी व निसर्गाच्या कोपामुळे प्रचंड आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत ,शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण ,मुलींचे लग्न ,खरीप हंगामाची तयारी यावर विचार करण्यास वेळ नाही कारण हातात काम नसल्यामुळे घरात खाण्यासाठी अन्न नाही मात्र मायबाप सरकारने मागील एक वर्षात कोणतीही दिलासा देणारी योजना आणली नाही ,बँकांनी पिककर्ज पुनर्वसन करून मागील तीन वर्षाच्या  थकितदारांना कर्ज देण्याचे आदेश असतांना वाटप सुरु केले नाही तर सारे अधिकारी व मंत्री नाले साफ  करण्यात गुंतले आहेत त्यांनी ११९५ पासून पाणलोट विकास योजनेची नेत्यांनी केलेली नासाडी पहावी कारण कृषी संकटाचे मूळ कृषी मालाच्या भावात ,बाजाराच्या लुटीवर ,बँकांच्या नाकर्तेपणावर व विदेशी नगदी पिकांच्या बियाणे ,रासायनिक खते ,कीटक नाशके यांच्या लुटीमुळे असुन जोपर्यंत  पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला शेतकरी वाचवा महामंत्र ज्यामध्ये  शेतकऱ्यांना लागवड खर्च अधिक  ५० टक्के नफा असा हमीभाव व त्याभावावर सर्व माल विकत घेण्याची सरकारी यंत्रणा देण्याची ,सर्व शेतकऱ्यांना सावकार मुक्ती करण्यासाठी पिक कर्जमाफी करण्याची व जगात मंदीच्या लाटेत फसलेल्या कापसासारख्या नगदी पिकांच्या जागी डाळीचे व अन्नाचे पिक घेण्यासाठी विषेय अनुदान आधारीत योजना देण्याचे तरतूद करीत नाही तो पर्यंत आपण कितीही नाले खोदा शेतकरी आत्महत्या थांबणार नाही हे निश्चित आहे . 

किशोर तिवारी 
संयोजक 
विदर्भ जनांदोलन समिती 
०९४२२१०८८४६No comments:

Post a Comment