Wednesday, 13 May 2015

तूर डाळीच्या साठेबाजांवर करा कठोर कारवाई-महाराष्ट्र टाईम्स

तूर डाळीसाठेबाजांवर करा कठोर कारवाई-विदर्भ जन आंदोलन समिती


म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर 
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/crime/articleshow/47257277.cmsतूर डाळीच्या साठेबाजीमुळे सध्या भाव प्रचंड वाढले असून, ग्राहकांची लूट सुरू आहे. त्यामुळे साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. मागील जानेवारी ते मार्चमध्ये मध्ये शेतकऱ्यांनी आपली तूर जेमतेम ५००० रुपये भावात विकल्यानंतर आता तुरीचे भाव सात ते आठ हजारावर जात असून महिन्यापूर्वी किरकोळमध्ये ७५ ते ८० रुपयांवर असलेली तूर डाळ आता थेट १०५ रुपयांवर पोहोचली आहे. या प्रचंड दरवाढीचा फटका ग्राहकांना सोसावा लागत असून डाळ गरिबांच्या ताटातून गायब झाली आहे. मागील दहा दिवसात साठेबाजी करणाऱ्या मुठभर व्यापाऱ्यांनी कृत्रिमपणे ही प्रचंड सर्वच डाळीमध्ये वाढ केली असून सरकारने शेतकऱ्यांनी मंदीच्या नावावर पडेल किमतीमध्ये सारी तुरी विकत घेऊन आता मार्चमध्ये कोसळलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले के कारण समोर करून तूर, चणा, वाटाणा, मसूर, मूग आदीच्या दरात बाजारात अचानकपणे झालेली वाढ व्यापारी कटाचा भाग असून सरकारने साठेबाजी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी व गरिबांना सार्वजनिक वितरण प्रणालीमधून तूर डाळीचे वाटप ४० रु . दराने सुरु करावी अशी मागणी विदर्भ जन आंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे . 

किरकोळमध्ये डाळ प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचल्याने गरीब, मध्यमवर्गीयांनी खरेदी थांबविली आहे. त्याऐवजी वाटाणा डाळ आणि लाखोळी डाळीची खरेदी वाढविली आहे. ठोकमध्ये वाटाणा डाळ प्रति क्विंटल ३,००० ते ३,५०० रुपये, बटरी डाळ ४,२०० ते ४,५०० रुपये आणि लाखोळी डाळ ३,१०० ते ३,३५० रुपये आहे. या डाळीला गरिबांकडून मागणी वाढल्याने यांच्या किमतीमध्येही प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपयांची वाढ झालेली आहे. ही वाढ व्यापाऱ्यांनी कृत्रिमपणे केली असून सरकारने जर कारवाई केली नाहीतर अशीच लूट सुरू राहील, अशी भीती तिवारी यांनी व्यक्त केली आहे. 

यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस सरासरी रु. ३८०० दराने विकला तूर सरासरी रु. ५००० दराने विकली. आता कापसाची खरेदी रु ५००० च्या दराने तर तुरीची खरेदी विक्रमी रु ८००० दराने होत आहे. हा सगळा प्रकार विदर्भाच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वेदना देणारा असून मायबाप सरकार या संघटित बाजाराच्या लुटीपासून रोखण्यासाठी पर्यायी उपाय कधी करणार, असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment