Thursday, 9 April 2015

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीच्या पंतप्रधान मोदींची यांच्या घोषणेचे विदर्भ जनांदोलन समिती कडून स्वागत : महाराष्ट्राच्या १ कोटी ३४ लाख शेतकऱ्यांना वाढीव मदतीसाठी साकडे

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीच्या  पंतप्रधान मोदींची यांच्या घोषणेचे विदर्भ जनांदोलन समिती कडून स्वागत  : महाराष्ट्राच्या १ कोटी ३४ लाख शेतकऱ्यांना वाढीव मदतीसाठी साकडे 
दिनांक -९ एप्रिल २०१५

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अधिकाधिक शेतकर्‍यांना मिळावी यासाठी निकष शिथिल करतानाच शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीच्या दीडपट भरपाई देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली व सोबतच  दुष्काळ आणि कर्जाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पीडित शेतकर्‍यांना मदतीचा हात पुढे करीत भरपाईसाठी पूर्वीचा ५० टक्के नुकसानीचा निकष ३३ टक्क्यांवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही मोदी सरकारने घेतला आहे या दोन्ही दिलासा घोषणेचे विदर्भ जनांदोलन समितीकडून स्वागत करण्यात आले असुन  एकीकडे नुकसानीच्या दीडपट भरपाई देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात दुसरीकडे महाराष्ट्राचे भाजप सरकार केंद्राचे निकष बदलून ५० टक्के भरपाई देत असुन यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १ कोटी ३४ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकूण रुपये ५ हजार कोटीच्या मदतीपासून वंचित रहावे लागले असुन यामुळेच मागील तीन महीन्यात दुष्काळग्रस्त विदर्भ ,मराठवाडा , खानदेश व उत्तर महाराष्ट्रात ११६० शेतकऱ्यांनी आत्महत्या  केल्या असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषीत केलेली वाढीव मदत महाराष्ट्रातील सुमारे १ कोटी ३४ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक शेतकरी नेते किशोर तिवारी केली आहे . 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांना कर्जाचे पुनर्वसन करण्यासाठी दिलेले आदेश दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारे नसुन  शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात एकदाची पिककर्ज माफी हाच तोगडा असुन सरकारने महाराष्ट्राच्या   १ कोटी ३४ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी पिककर्ज माफी द्यावी अशी आग्रही मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिके गमावलेल्या व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना  मुलीच्या लग्नासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी तसेच गंभीर आजाराचा उपचार करण्यासाठी शेतीवर विषेय कर्ज देण्यासाठी सरकारने आदेश ध्यावे अशी मागणीही  किशोर तिवारी यांनी केली आहे. 

 यावर्षी महाराष्ट्र सरकारने एकूण ३९ हजार ४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास ६० टक्के गावांमध्ये पूर्णत: खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे   व आता गारपिटीने उरले रब्बीचे पिक नष्ट  यामुळे  १ कोटी ३४ लाख दुष्काळग्रस्त शेतकरी  गंभीर दुष्काळाच्या प्रभावात उपासमारीला तोंड देत आहेत . भाजप शेतकऱ्यांना  शेतीमालाला लागवड अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देऊ तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ केले जाईल असे जाहीर अभिवचन दिले होते मात्र त्याच्या विसर पडल्याने   सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि पारिवारिक चिंता या कारणांमुळे पश्‍चिम विदर्भाच्या सहा जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख शेतकरी सर्वाधीक दु:खी असून, मानसिक तणावाखाली आहेत. ४ लाख ३४ हजार २९१ शेतकरी मोठ्या निराशेत गेले आहेत . शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी सरकारने  सर्व महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्तांना अंत्योदय अन्न सुविधा, आरोग्य, रोजगार सुरक्षा, पीक कर्ज माफी द्यावी अशी मागणी सतत होत आहे  त्यावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीरपणे विचार करावा अशी विनंतीही  तिवारी यांनी केली  आहे.

No comments:

Post a Comment