Sunday, 5 April 2015

कारेगाव वडगाव पाच जणांचा विहीरीत गुरमरूनकारेगाव वडगाव प्रकरण - सहाव्या मजुराचा सरकारच्या उपेक्षेने मृत्यू : जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व २० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी विदर्भ जनांदोलन समितीचा आंदोलनचा ईशारा मृत्यू : प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करीता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे याचिका

कारेगाव वडगाव प्रकरण - सहाव्या मजुराचा सरकारच्या उपेक्षेने  मृत्यू  : जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व २० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी विदर्भ जनांदोलन समितीचा आंदोलनचा ईशारा 


दिनांक - ८ एप्रिल २०१५

राळेगाव तालुक्यातील कारेगाव वडगाव येथे  ३१ मार्च रोजी भर दुपारी पाणी पुरवठा करणाऱ्या  सार्वजनिक  विहिरीत गाळ काढणान्यासाठी सरकारने दिलेले दिशानिर्देश न पाळल्यामुळे  व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे  पाच  निष्पाप तरुणांचा विहीरीत  गुरमरून झालेला मृत्यू झाल्यानंतर मरणासन्न अवस्थेत जखमी झालेल्या  रामू देवराव बावणे(३०) या युवकाने सरकारने लक्ष न दिल्यामुळे व जीव वाचविण्यासाठी कोणतीही युद्धस्तरावर प्रयन्त न झाल्यामुळे आज मृत्यू  झाला असून या प्रकरणात सरकारने दिलेले दिशानिर्देश न पाळल्यामुळे  व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आता सहा निष्पाप प्राण गेले असुन सर्व आजी -माजी मंत्री आमदार -खासदार आम्ही प्रश्नवर उचलत आहेत व मोबदला लवकरच देण्यात येईल अशी फक्त आश्वासने देत असून जर ही घटना मुंबई -पुणे वा पश्चिम  महाराष्ट्रात घटली असतीतर सारे सरकार व राजकीय पक्ष  यावर आग ओकत आजपर्यंत  बेजाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असती व मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तात्काळ मदत दिली असती मात्र जसे सरकार विदर्भाचे शेतकरी मारत आहेत त्याचप्रमाणे अधिकारी आता मजुरांना मारत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला  आहे मागील दोन वर्षात अशा घटना चार ते पाच वेळा झाल्या जर अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई झाली असती तर राळेगाव तालुक्यातील कारेगाव वडगाव येथे  ३१ मार्च रोजी भर दुपारी ही घटना घडली नसती व ६ निष्पाप  जीव मेले नसते मात्र यानंतरही आजपर्यंत कोणतीही कारवाई होत नाही ही शरमेची बाब असून  सरकारने रामू देवराव बावणे याला मुंबईला वा दिल्लीला उपचाराला नेले असते त्याचा जीव वाचला  असता मात्र अधिकारी व मंत्र्यांच्या नाकर्त्यापणामुळे हे रामू बावणे जिव  गेला असा आरोपही तिवारी यांनी लावला आहे 

या घटनेला  जबाबदार असलेले सर्व सनदी अधिकारी यांनी जबाबदारी निश्चित करण्यासाठी व दोषींवर मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करून या घटनेत विहिरीत गुदमरून मृत्यू पडलेले गणेश राजेश्वर नंदूरकर (२४), विजय पुरुषोत्तम नंदूरकर (४५), शंकर रमेशजोगी (२८), आशीष उर्फ पिंटू तुकाराम मडावी (२८), भुपेश कवडू कुडमेथे (३२) व रामू देवराव बावणे(३०) यांच्या परिवारजनाना प्रत्येकी वीस लाख रुपये व मरणासन्न अवस्थेत जखमी झालेल्या   व प्रफुल हिवरकर (२२) या मजुराला प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरणार अशी घोषणा  किशोर तिवारी यांनी केली आहे. 
यापुर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केलेल्या   याजीकेत राळेगाव तालुक्यातील कारेगाव वडगाव येथे  ३१ मार्च रोजी भर दुपारी वर्धा नदीच्या पात्रात  सार्वजनिक विहिरीत गेल्या कित्येक दिवसांपासून गाळ साचल्याने ग्राम सेविकेने  गावातील गणेश नंदूरकर, शंकर जोगी यांना याविहिरीतील गाळ काढण्याचे काम गुत्त्याने दिले. ३१ मार्च रोजी या मजुरांनी विहिरीतील गाळ काढण्यासाठी पाणी उपसायला आॅईल इंजीन लावले होते. विहिरीचे अर्धे तोंड आधीच सिमेंटच्या छताने झाकण्यात आले होते. त्यामुळे आतमध्ये प्राणवायू कमी प्रमाणात जात असताना हे मजूर गाळ काढण्या कामी लागलेत.जोमात काम सुरू असतानाच अचानकपणे या खोल विहिरीत इंजीनचा धूर सर्वत्र व्यापल्याने तिथे कार्बन डाय आॅक्साईडने जागा घेतली. परिणामी, या मजुरांना आॅक्सीजन न मिळाल्याने गुदमरून आरडा ओरडही केली. त्यांचा आवाज ऐकून वाचविण्यासाठी विजय नंदूरकर, भुपेश कुडमेथे, ग्रा. पं. चपराशी असलेल्या आशीष मडावी याने धाव घेऊन विहिरीत उतरले. मात्र तिथे निर्माण झालेल्या विषारी वायूने या तिघांचाही बळी घेतला. त्यात सुदैवाने रामू देवराव बावणे(३०) व प्रफुल हिवरकर (२२) या मजुराला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचीही प्रकृती अतिशय गंभीर असून उपचारार्थ त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले होते व नंतर रामू देवराव बावणे(३०) याचे सुद्धा निधन झालले आहे  .

कारेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल नंदूरकर यांचा विजय नंदूरकर हा चुलत भाऊ तर गणेश नंदूरकर हा पुतण्या होता. गणेश हा गाळ उपसणार्‍या तीन मजुरां सोबत कामी होता. तर विजय तिघांना वाचविण्याच्या प्रयत्नात दगावला.त्याच्या मागे पत्नी नंदा (४0), विशाल (१९), वृषभ (१५) ही दोन मुले आहेत.घरचा कर्ता पुरुष जाण्याने गरीब कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेमुळे नंदूरकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  ग्रामपंचायतीचा शिपाई आशीष मडावी हा विहिरीत अडकलेल्या मजुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात इतरांसोबत धावला आणी  विहिरीत उतरला व श्‍वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला. वडील तुकाराम (६0), आई गिरीजाबाई (५४), पत्नी दुर्गा (२४) हे निराधार झाले. या घटनेतील मृत गणेश नंदूरकर याच्या बहिणीचा विवाह २८ एप्रिलला आहे. लग्न काही दिवसावर आले असताना भाऊ सोडून गेल्याने ती ओशाळली आहे. लग्नाची तयारी आता कोण करेल, या विचाराने ती धाय मोकलून सतत रडत आहे. भूमीहीन कुटुंबात ५0 वर्षीय वडील राजेश्‍वर, ४५ वर्षीय आई मंदा हे दाम्पत्य आधारहीन झाले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी काही दिवसातच सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्यासंदर्भात सुरक्षितता लक्षात घेवून नवे दिशानिर्देश जारी करणार  केले आहेत कारण  गतवर्षी कळंब येथे विहिरीतील गाळ उपसण्याच्या प्रकरणात जनरेटर वापरण्यात आल्याने मजुरांचा मृत्यू झाला होता. या घटनांचा  पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने धडा घेत दिशानिर्देश दिले होते मात्र  मजुरांना मार्गदर्शन करण्यासाठी कुणीही पदाधिकारी वा कर्मचारी या ठिकाणी हजर नव्हते त्यामुळेच निष्पाप मजुरांचा बळी पडला आहेत मात्र पाच जनाचा बळी जाऊनही पोलिसांनी  कारवाई केली हानी व जबाबदार अधिकारी मोकळे बाहेर फिरत असल्यामुळे आदिवासी व मागासवर्गीय मजुरांचे बळी घेणाऱ्यांना शिक्षा होण्यासाठी आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे याचिका केल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली . 


No comments:

Post a Comment