Sunday, 19 April 2015

दारुबंदीसाठी २० एप्रिलला होणाऱ्या महिला आंदोलनाला विदर्भ जनांदोलन समितीचा सक्रीय पाठींबा

दारुबंदीसाठी  २० एप्रिलला होणाऱ्या महिला आंदोलनाला विदर्भ जनांदोलन समितीचा सक्रीय पाठींबा 
दिनांक -१९ एप्रिल २०१५
 चंद्रपूरप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातही संपूर्ण दारुबंदी करावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभरातील महिला २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे  देणार असुन यामध्ये सर्व सामाजिक संस्था सहभागी होणार असून आंदोलनाचे संयोजक संगीता पवार  व उमेश मेश्राम यांनी मागील अनेक दिवसापासून या आंदोलनाची तयारी केली असून सर्व राजकीय पक्ष व दारूमुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या संस्थाना यामध्ये शामिल होण्याचे आवाहन केले असून या मागणीसाठी सरकारवर अनेक वर्षांपासून रेटा धरणाऱ्या विदर्भ जनाडोलन समितीने या आंदोलनाला पाठींबा दिला असून ,यवतमाळ जिल्यात दारू हा सर्वात मोठा समाजाचा जीव घेणारा शत्रु म्हणून  थैमान घालत असून लाखो घरात हि समस्या गंभीर स्वरुपात मागील काही वर्षात संसारात व घरात अंधार करीत आहे तरी आता ज्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेल्या वर्धा आणि काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर येथे शासनाने दारूबंदी जाहीर केल्यानंतर आता यवतमाळ जिल्हाही दारूमुक्त करावा यासाठी २० एप्रिल होत असलेल्या दारूबंदी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ,समितीचे सचिव मोहन जाधव यांनी केले आहे . विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी हे दिल्लीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गेल्यामुळे त्यांनी  विदर्भ जनांदोलन समितीतर्फे  मोहन  जाधव सह  कार्यकर्त्यांना आंदोलनात सक्रीय भाग घेण्यास सुचना दिलाय आहेत . 
सध्या जिल्यात गावागावात दारूबंदीचे आंदोलन होत आहे मात्र  पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने 'संपूर्ण यवतमाळ जिला दारूमुळे अधोगतीला जात आहे, दारूसोबतच जुगाराचे व्यसनही वाढले आहे.  यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता, केळकर समितीने यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करा, असा अहवाल दिला आहे म्हणुन सरकारने तात्काळ दारूबंदी करावी अशी मागणी किशोर तिवारी यांनी सरकारला  केली आहे  . 

महाराष्ट्राच्या युती सरकारने चंद्रपूर जिल्यात दारूबंदीच्या निर्णया सोबतच  आता यवतमाळ जिल्यात दारूबंदी करा कारण  यवतमाळ जिल्यात दारूबंदी  करण्यासाठी मागील ३ वर्षापासुन जनांदोलन होत असून येथील आदिवासी व शेतकऱ्यांची तीव्र मागणी  यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ दारूबंदीची शिफारसीची  बजावणी करावी अशी मागणी कृती समितीच्या संयोजक अपूर्वा  तिवारी  यांनी यावेळी केली आहे  . तरुण पिढीत व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. मुले दारूच्या आहारी जात आहे. दारूमुळे सुखी संसाराची रांगोळी होत आहे. सहज उपलब्ध होणारी कमी पैशातील दारू हे यामागील प्रमुख कारण आहे. पोलीस व प्रशासनाने संरक्षण दिल्याने गावागावात दारूच्या भट्टय़ा पेटविल्या जात आहे. तरी सरकार झोपले आहे का असा सवाल सुद्धा अपूर्वा  तिवारी यांनी  केला आहे . 

No comments:

Post a Comment