Monday, 13 April 2015

भीमकुंडच्या पूरग्रस्तांचे घरकुल ,पट्टे , पाणी व विजेसाठी उपोषण सत्ताग्रह -घरकुल ,वीज व पाण्यासाठी १ मे पासुन आमरण उपोषणाचा ईशारा


भीमकुंडच्या  पूरग्रस्तांचे घरकुल ,पट्टे , पाणी व विजेसाठी उपोषण सत्ताग्रह -घरकुल ,वीज व पाण्यासाठी १ मे पासुन आमरण उपोषणाचा ईशारा १९१३ मध्ये ऑगस्ट महिन्यात  आलेल्या पुरामुळे संपूर्ण भीमकुंडचे शेतकरी व शेतमजूर अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या शासकीय जमिनीवर राहण्यासाठी गेल्यावर त्यांची व्यथा प्रसार माध्यमांनी जगासमोर सतत मांडल्यावर सरकारने तात्काळ पाणी पुरवठा सुरू करू सर्व कुटुंबांना पट्टे देऊ, वीज व पाणी देण्याचे आश्‍वासन १८ महिन्यापूर्वी दिले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री खा. हंसराज अहीर व आमदार राजू तोडसाम यांनी सुद्धा भीमकुंडला भेट देऊन त्यांना वीज पाणी रस्ता करून देण्याचे आश्‍वासन दिले होते मात्र १८ महिने लोटल्यानंतरही या जंगलात राहणार्‍या आदिवासी व उपेक्षित समाजातील भीमकुंडवासीयांना पाणी, वीज व कोणतीच मुलभूत सुविधा न मिळाल्यामुळे पूरग्रस्तांनी १२ एप्रिल  रोजी विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.यावेळी १० मे पासुन आमरण  उपोषण सुरू करण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला. हा ठराव भीमकुंडचे सरपचं माणिक गेडाम यांनी मांडला व उपसरपंच व्यंकटेश सोटपेल्लीवार यांनी अनुमोदन केले.  
या उपोषण सत्ताग्रहात   किरण कोलवते, गजानन मामीडवार, नारायण रेड्डीवार, विठ्ठल गावंडे, गणपतराव कन्नलवार, बालू प्रतापवार, बाळासाहेब कन्नलवार, रमेश पाटील, अतुल नगराळे, नाना नगराळे, नाना अगरुलवार, कृष्णा मारपवार, किष्टन्ना मॅकलवार, अशोक मॅकलवार, दत्ता गेडाम, कमलाबाई नैताम, किष्टाबाई गोपावार, गंगाबाई शर्लावार, वासुदेव नैताम, समितीचे सचिव मोहन जाधव, अंकीत नैताम, सुरेश बोलेनवार, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल, संतोष नैताम, भीमराव नैताम हे सहभागी झाले होते.
भीमकुंड येथील पूरग्रस्तांसाठी पं. स. घाटंजीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र, तो वारंवार बंद करण्यात येत आहे आपण पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सर्वभीमकुंडवासीयांना घेऊन यवतमाळ जिल्हाधिकारी  ऑक्टोबर२०१४ मध्ये   भेटलो असता त्यांनी दोन महिन्यात नियमित  पिण्याचे पाणी देण्याचे  असे आश्‍वासन दिले होते. मात्र, १० महिने लोटले तरी पाणी तर सोडा साधा अधिकारीही विचारपुस करण्यासाठी आला नाही. उलट भीमकुंडच्या महिलांना २ कि. मी. पायपीट करून नाल्याचे पाणी प्यावे लागत आहे अशी माहिती किरण कोलवते यांनी दिली. फक्त १२ कुटुंबीयांना सौर कंदील देण्यात आले असून वीज पुरवठा नसल्यामुळे सर्व कुटुंब जंगलात अंधारात राहत आहे. या जंगलात कोणत्याही वेळी दुर्घटना होऊ शकते अशी माहिती भीमकुंडचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मारपवार यांनी दिली. भीमकुंड येथील जनता दरबारात आदिवासी नेते किशोर तिवारी यांनी सरकारी उदासीनता व लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणावर गंभीर आक्षेप घेऊन त्यांनी जर १ मे  पर्यंत भीमकुंड येथील पूरग्रस्तांना पाणी, नियमती पट्टे व विजेचा प्रश्न निकाली लावण्याची विनंती केली. जर भीमकुंडच्या पूरग्रस्तांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला तर संपूर्ण परिसरात आमदार, खासदारासह लोक प्रतिनिधींना आम्ही फिरण्यास बंदी घालू असा इशारा तुकाराम मोहुर्ले, दत्ता गटलेवापर, युसुफ खाँ पठाण यांनी दिला

No comments:

Post a Comment