Sunday, 12 April 2015

महाराष्ट्राटाला टोलमुक्त करण्याच्या सरकारच्या सुतोवाताचे स्वागत:आता 'सात-बारा' कोरा करा -विदर्भ जनआंदोलन समिती

महाराष्ट्राटाला टोलमुक्त करण्याच्या सरकारच्या सुतोवाताचे स्वागत:आता 'सात-बारा' कोरा करा -विदर्भ जनआंदोलन समिती

 दिनांक- १२ एप्रिल २०१५

महाराष्ट्र राज्य सरकारने आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे ११ आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचा १ असे १२ टोलनाके कायमचे बंद केले आणि ५३ टोलनाक्यांवर कार, हलकी वाहने आणि एसटी बसना टोलमाफ करण्याचा निर्णयाचे विदर्भ जनआंदोलन समितीने स्वागत केले असुन यामुळे सरकारला लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाला जागत असल्याची थोडीशी चुकचुक विदर्भातील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी असुन आता सरकारने टोलमुक्ती सोबत सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासनही टप्पे घेऊन तोल नाक्या सारखे लागु करावे याची सुरवात विदर्भ -मराठवाड्यापासून करावी अशी आग्रही मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे . 

विदर्भातील भाजप नेत्यांचे टोल आरंभा टोलनाका - जाम वरोरा,नंदूरी टोलनाका - चंद्रपूर बामणी
विसापूर - चंद्रपूर बामणी,मलकापूर टोलनाका - बुलडाणा वर टोलमुक्ती दिल्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे .मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांचे टोल बंद झाल्यामुळे  भाजप युती सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध दर्शवला असुन त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना पचत नसल्याची टीकाही ,तिवारी यांनी केली आहे . 

 'जगात सर्वत्र टोल नाके आहेत, दळणवळणासाठी खासगी गुतंवणूक केली जाते. भांडवली गुंतवणुकीसाठी असे निर्णय घेतले जातात. त्यातून रस्त्यांचा दर्जा सुधारतो. त्यामुळे लोकही खुशीने टोल भरतात हा शरद पवारांचा युक्तिवाद वास्तविक नसुन मागील दहा वर्षात भारतात आलेले 'टोल राज्य' हे जगातील सर्वात मोठी लुट असुन ९० टक्के टोल हे राजकीय पक्षाच्या नेत्यांचे असुन सर्वच्या सर्व टोल पाल्झाची वसुली व एकूण गुंतवणूक व देखभालीचा खर्च याची चौकशी झाली तर लुट जनतेसमोर येईल आता राज्य सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील आजी-माजी मंत्र्यांचे  बेकायदेशीर टोलसुद्धा तात्काळ बंद करावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .      

No comments:

Post a Comment