Saturday, 7 March 2015

महाराष्ट्राचे आर्थिक संकल्प २०१५-केंद्राच्या निराशेनंतर आता विदर्भाच्या शेतकऱ्यांचे राज्य सरकारला मदतीसाठी साकडे

महाराष्ट्राचे आर्थिक संकल्प २०१५-केंद्राच्या निराशेनंतर आता विदर्भाच्या शेतकऱ्यांचे  राज्य सरकारला मदतीसाठी साकडे 

दिनांक -७ मार्च २०१५
नवीन महाराष्ट्राचे सरकार  लोककल्याणासाठी कटीबद्ध असुन या सरकारच्या पहिल्या आर्थिक संकल्पात जनतेला सुखी करण्यासाठी अर्थमंत्री सुधीरभाऊ मूनगट्टीवार यांनी    लोकांकडून सूचना आमंत्रित जाहीरपणे मागीतल्या आहेत व त्यांना हजारो सूचना आल्याचे वृत्त सरकारने दिले असून सरकार या सूचनांवर सरकार गंभीर असल्याचे सुद्धा अर्थमंत्री सुधीरभाऊ मूनगट्टीवार यांनी जाहीर केल्यानंतर विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांना  लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीनी शेतकरी आत्महत्या ह्या शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे व शेतकऱ्यांच्या तोट्याच्या शेतीमुळे झालेल्या कर्जामुळे होत असुन आपण यावर गुंतवणूक अधिक ५० टक्के नफा या सूत्राने कृषीमालाला आधारभूत किंमत व सर्व शेतकऱ्यांना नवीन कर्ज देऊ या  दोन्ही आश्वासनाला आठवण करून देत जसे तेलंगाना व उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना पिककर्जमाफी तशी व जशी दिल्लीकरांना आप पार्टी वीजबिलात माफी दिली तशी  तरतूद करून याची घोषणा  सरकारच्या पहिल्या आर्थिक संकल्पात करावी  अशी मागणी  शेतकरी नेते व विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी अशी मागणी केली आहे . 
यावर्षी महाराष्ट्र सरकारने एकूण ३९ हजार ४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास ६०टक्के गावांमध्ये पूर्णत: खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. यामुळे ९० लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असून जागतिक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापूस, तुर, सोयाबीन व दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. अशा आणीबाणीच्या वेळी विदर्भाच्या शेतकर्‍यांनी भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना हमीभाव वाढ, पिककर्ज मुक्ती व कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचे पीक घेण्यासाठी अनुदान अशी तीन सूत्री असलेला एकात्मिक कार्यक्रम भारत  सरकारला किशोर तिवारी सादर होता  मात्र  सरकारने हमीभाव वाढ व पीककर्ज माफी याचा .समावेश केंद्रीय  अर्थसंकल्पात केला नाही म्हणून महाराष्ट्राच्या सरकारने दिलासा द्यावा अशी मागणी अर्थमंत्री सुधीरभाऊ मूनगट्टीवार यांना किशोर तिवारी यांनी केली आहे. 
अर्थमंत्री सुधीरभाऊ मूनगट्टीवार यांना दिलेल्या निवेदनात तिवारी यांनी  विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांची कारणे शोधण्याकरिता महसूल विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणाचा हवाला देत म्हटले सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि पारिवारिक चिंता या कारणांमुळे पश्चिम  विदर्भाच्या सहा जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख शेतकरी सर्वाधिक दु:खी असून, मानसिक तणावाखाली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असुन  शेतकऱ्यांकडे असलेली शेतजमीन, पारिवारिक जबाबदाऱ्या, आजारपण, मागील तीन वर्षांचे सरासरी वार्षिक उत्पन्न, शेतीकरिता खर्ची लागलेला पैसा, बँकांचे कर्ज, सावकारांचे कर्ज शेतकरी आत्महत्यांची कारणे असुन  सहा जिल्ह्यातील चार लाख ३४ हजार २९१ शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत तणावाची असून यांना वाचविण्यासाठी सरकारने येत्या अर्थ अर्थसंकल्पात सर्व महाराष्ट्राच्या  दुष्काळग्र्स्ताना अंत्योदय अन्न सुविधा ,आरोग्य ,रोजगार सुरक्षा ,पिक कर्ज माफी द्यावी अशी मागणी किशोर तिवारी केली आहे . 

No comments:

Post a Comment