Wednesday, 25 March 2015

'किसानोसे मन की बात' ने निराश झालेल्या विदर्भाच्या सहा शेतकऱ्याच्या मागील ४८ तासात आत्महत्या

 पंतप्रधान मोदी यांच्या  'किसानोसे मन की बात' ने निराश झालेल्या विदर्भाच्या सहा शेतकऱ्याच्या  मागील ४८ तासात आत्महत्या 
दिनांक -२५ मार्च २०१५
दोन दिवसापूर्वी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात उपासमारीला तोंड देत असलेल्या   ९०  लाख शेतकऱ्यांच्या कृषी संकटाच्या मुळात असलेल्या प्रमुख दुखणे शेतीमालाचा कमी भाव व सतत नापीकी व तोट्याच्या शेतीमुळे झालेल्या कर्जाच्या डोंगरावर उपाय यावर एकही  शब्द न उच्चारल्यामुळे निराश झालेल्या व मदतीपासून वंचित असलेल्या अतितणावात असलेल्या सहा शेतकऱ्यांनी मागील ४८ तासात आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत यामध्ये अकोला जिल्यातील वडद येथील दादाराव उमाले व जामटीचे सुरेश इंगळे तर  बुलढाणा जिल्यातील जन्डोलचे गणेश सोनुने तर अमरावती जिल्यातील अमरापुरचे गजानन मान्गुळकर सह यवतमाळ जिल्यातील बोरगाव येथील आदिवासी शेतकरी तानबा तोडसाम यांचा समावेश असून यावर्षी जानेवारीमध्ये ६४ तर फेबुर्वारीमध्ये ५६ तर २४ मार्चपर्यंत ६४ अशा १८४  दुष्काळग्रस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन  भाजप च्या केंद्र व राज्य सरकारने गंभीर कृषी संकटाला उपेक्षीत केल्याने तणावग्रस्त शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे . 
शेतकऱ्यांचा अनावर संताप २४ मार्चला पांढरकवडा येथे सकाळी भरचौकात दिसला जेंव्हा बोरगावचे युवा शेतकरी  तानबा तोडसाम यांना  महाराष्ट्र बँकेच्या  अधिकाऱ्याने ५६ हजाराचे पीककर्ज भरण्यासाठी तगादा लावल्यानंतर भरचौकात असलेल्या सतीश  कृषीकेंद्रामध्ये  कीटकनाशक मोनोचा डबा घेतला व सारा डबा त्यांच्या  दुकानासमोरच  पोटात कोणालाही कल्पना येण्या अगोदरच खाली केले हा प्रकार सतीश  कृषीकेंद्राचे मालक अशोक कानडुरवार  यांनी पाहिला व  तानबा तोडसामला पकडण्याचा  प्रयन्त केला मात्र तो तिथून निघून गेला नंतर अशोक कानडुरवार तात्काळ पोलिसांना पाचारण केले मात्र पुढच्या चौकात तानबा तोडसाम  मरून पडला होता ,यवतमाळ जिल्यात दररोज दोन ते तीन शेतकरी मागील सात महिन्यापासून आत्महत्या करीत मात्र मस्तवाल सरकार कोणतीही ठोस उपाययोजना करण्यास तयार नाही सत्तेच्या  मस्तीने मंत्री ,आमदार व अधिकारी आंधळे झाले असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे . 
एकीकडे  यावर्षी महाराष्ट्र सरकारने एकूण ३९ हजार ४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास ६० टक्के गावांमध्ये पूर्णत: खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत व आता गारपिटीने उरले रब्बीचे पिक नष्ट  यामुळे ९०  लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात उपासमारीला तोंड देत असतांना यावर एक शब्द न उच्चारल्यामुळे शेतकऱ्यांची उरली सुरली आशाही आता संपली आहे  या उलट भूसंपादन कायदा दुरुस्ती विधेयक शेतकऱ्यांचा हिताचा असून  केंद्र सरकार शेतक-यांच्या हितासाठीच काम करत आहे म्हणत शेतक-यांच्या समस्यांची आम्हाला जाणीव आहे असा दिलेला निरोप म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ झोळण्याचा प्रकार असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे . 

मागील वर्षी मार्च महिन्यात मोदी यांनी सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ येथील दाभाडी खेड्यातुन संपूर्ण भारताच्या शेतकऱ्यांशी 'चाय पर चर्चा ' केली होती व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला लागवड अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देऊ तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ केले जाईल असे जाहीर अभिवचन दिले होते व आज आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी  यावर घोषणा करतील अशी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी धरली होती मात्र मोदी यांनी यावर चुप्पी साधल्याने सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि पारिवारिक चिंता या कारणांमुळे पश्‍चिम विदर्भाच्या सहा जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख शेतकरी सर्वाधीक दु:खी असून, मानसिक तणावाखाली आहेत. ४ लाख ३४ हजार २९१ शेतकरी मोठ्या निराशेत गेले आहेत . शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी सरकारने  सर्व महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्तांना अंत्योदय अन्न सुविधा, आरोग्य, रोजगार सुरक्षा, पीक कर्ज माफी द्यावी अशी मागणी सतत होत आहे  मात्र त्याला सुद्धा सरकार याला  पाने पुसत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत असलल्याचा आरोप तिवारी यांनी केला  आहे. 

No comments:

Post a Comment