Tuesday, 3 March 2015

पश्चिम विदर्भाचे ४.५ लाख दुष्काळग्रस्त शेतकरी अतिशय तणावामुळे आत्महत्येचा मार्गावर

पश्चिम विदर्भाचे ४.५ लाख दुष्काळग्रस्त   शेतकरी अतिशय तणावामुळे आत्महत्येचा मार्गावर 

दिनांक -३ मार्च २०१५
विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांची कारणे शोधण्याकरिता महसूल विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणात सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि पारिवारिक चिंता या कारणांमुळे पश्चिम  विदर्भाच्या सहा जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख शेतकरी सर्वाधिक दु:खी असून, मानसिक तणावाखाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने सरकारच्या शेतकऱ्यांसाठी दिलेले पैकेज पूर्णपणे निकामी असून गेल्या १५ वर्षांत पश्चिम विदर्भात ११हजारावर  शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली असताना या आत्महत्या आता आणखी वाढतील, असा धोक्याचा इशारा मानसोपचार तज्ज्ञांनी  सरकारला दिला असून  यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे कारण अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम आणि वर्धा या सहा जिल्ह्यातील हे शेतकरी दु:खी आहेत व  या शेतकऱ्यांची शेती करण्याची क्षमता नसून ९३ टक्के शेतकरी कर्जबाजारी असल्याचा   अहवाल सरकारला पाठवला  आल्याचे वृत्त अधिकाऱ्यांच्या गोटातूनच आज देण्यात प्रकाशित करण्यात आले आहे ,अशी धक्कादायक माहीती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली . . 
यापुर्वी उच्चन्यायालयाच्या आदेशाने शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विदर्भात २००६ मध्ये केलेल्या दौऱ्याच्या पूर्वी अशा प्रकारचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी सुमारे ३ लाख शेतकरी शेतकरी सर्वाधिक दु:खी असून, मानसिक तणावाखाली असुन आत्महत्या करण्याच्या मार्गावर असल्याचा अहवाल सरकारला देण्यात आला होता  त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि जीवनमान स्तर जाणून घेण्यासाठी यंदा महसूल विभागाने केलेले हे दुसरे सर्वेक्षण आहे. तर निसर्गाची अवकृपा आणि नापिकीला कंटाळून मागील दोन महिन्यात अमरावती विभागात १४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर मागील १५ वर्षांत ११ हजार ९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासकीय आकडेवारीनुसार आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक तीन हजार ११४ शेतकऱ्यांनी विविध कारणांसाठी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भातीलआत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण करताना अ, आणि असे तीन वर्ग करण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांकडे असलेली शेतजमीन, पारिवारिक जबाबदाऱ्या, आजारपण, मागील तीन वर्षांचे सरासरी वार्षिक उत्पन्न, शेतीकरिता खर्ची लागलेला पैसा, बँकांचे कर्ज, सावकारांचे कर्ज आणि सध्याची आर्थिक परिस्थिती यावर आधारित हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यानुसार सहा जिल्ह्यातील लाख ३४ हजार २९१ शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तर मध्यम तणावाखाली लाख १४ हजार ६५४ शेतकरी आहेत. उर्वरित लाख ६६ हजार ९५० शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असून,या वृतात म्हटले आहे . 
याच दरम्यान यवतमाळ जिल्यात सरकारने केलेल्या चार खेड्याच्या सर्वेक्षणात सरकारच्या शेतकऱ्यांसाठी दिलेले पैकेज पूर्णपणे निकामी असून गेल्या १५ वर्षांत पश्चिम विदर्भात ११हजारावर  शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली असताना या आत्महत्या आता आणखी वाढतील, असा धोक्याचा इशारा मानसोपचार तज्ज्ञांनी  सरकारला दिला असुन आता सरकारने तात्काळ दुष्काळग्र्स्ताना अन्न ,आरोग्य ,रोजगार सुरक्षा ,पिक कर्ज माफी द्यावी अशी मागणी किशोर तिवारी केली आहे . 

No comments:

Post a Comment