Tuesday, 24 February 2015

भाजपाचा पीक कर्जमाफी व हमीभाव वाढिला अर्थसंकल्पापूर्वीच नकार:हा तर शेतकऱ्यांच्या विश्वासघात -किशोर तिवारी

भाजपाचा  पीक कर्जमाफी व हमीभाव वाढिला  अर्थसंकल्पापूर्वीच नकार:हा तर  शेतकऱ्यांच्या विश्वासघात -किशोर तिवारी 

दिनांक -२४.२,२०१५
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी परदेशात  बेकायदेशीर खाती जमा असलेला  काळा पैसा प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५  लाख प्रमाणे जमा करू हे निवडणुकीपुर्वी  दिलेले आश्वासन ही गंमत होती  असा खुलासा केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून अधिकृतपणे भारताच्या सरकारने मोदी यांच्या गुंतवणूक अधिक ५० टक्के नफा या सूत्राने  कृषीमालाला आधारभूत किंमत देणे शक्य नाही असे स्पष्ट केले असून तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मागील पीककर्ज माफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला व सर्व पूर्वीचे कर्जमाफी पॅकेज दिल्याने  बँका एनपीए वाढ झाली आहे तर  बँकांना सुद्धा  परतावा राज्यांनी दिला नसल्यामुळे पतपुरवठा मर्यादित म्हणून केंद्र आणि राज्य सरकार कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही त्यामुळे नवीन एनडीए सरकार भविष्यात आणखी पिक कर्जमाफी  योजना राबविणार नाही अशी घोषणा केल्यामुळे  निवडणुकीमध्ये भाजपने शेतकऱ्यांना हमीभाव वाढीचे व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन हा ही 'जुमला'च असल्याचे  कटू सत्य समोर आले असून हा सारा शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा असून मोदी सरकारने  विदर्भाच्या  शेतकऱ्यांची निराशा केली असुन भाजपाने पुन्हा विदर्भाच्या जनतेच्या कौल घ्यावा अशी मागणी  विदर्भ जन आंदोलन समितीचे  संयोजक किशोर तिवारी यांनी केली आहे . 
सर्वोच्च न्यायालयाच्या  न्यायमूर्ती सुलेमान मुखोपाध्याय  आणि एनव्ही रमण यांच्या खंडपीठापुढे भारताचे  अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदरसिंग  प्रतिज्ञापत्र करून सर्व शेतमालाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) शेतकऱ्याच्या गुंतवणूक अधिक ५० टक्के  नफा या मोदी सूत्र आधारावर  सरकार देऊ शकत नाही कारण कृषी मुल्य आयोगाच्या नियमात बसत नाही व सरकार असे करू शकत नाही असा धक्कादायक खुलासा केला असून येत्या अर्थ संकल्पात आता हमीभाव वाढ होणार नाही हे स्पष्ट झाले आहे . 
यावर्षी महाराष्ट्र सरकारने  एकूण ३९४५३ गावां पैकी २४८११ गावे म्हणजे आसपास ६० %  गावे पूर्ण खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत यामुळे ९० लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या    प्रभावात असुन  जागतीक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापुस ,तुर ,सोयाबीन दुध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहे अशा आणीबाणीच्या वेळी विदर्भाच्या शेतकऱ्यांनी भारताच्या अर्थमंत्री अरुण जेटली यांना हमीभाव  वाढ ,पिककर्ज मुक्ती व कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचे पिक घेण्यासाठी  अनुदान अशी तीन सूत्री असलेला  एकात्मिक कार्यक्रम सादर करण्यासाठी  विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी विनंती केली होती मात्र सरकारने हमीभाव वाढ व पीककर्ज हे आम्ही गमती जमतीने केलेले जुमले होते असा निरोप दिल्याने  अर्थ संकल्पात शेतकऱ्याने सरकार पुन्हा वाऱ्यावर सोडणार स्पष्ट झाले आहे आता हातात मशाली घेतल्याशिवाय हे मस्तवाल सरकार जागत नाही आता असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे . 

No comments:

Post a Comment