Tuesday, 3 February 2015

भारताच्या अर्थसंकल्प २०१५ मध्ये विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी 'हमीभाव-पीककर्ज -पिक प्रणाली ' यावर उपाय सुचविणारा एकात्मिक कार्यक्रम करा -किशोर तिवारी


भारताच्या अर्थसंकल्प २०१५ मध्ये  विदर्भातील शेतकरी आत्महत्या  रोखण्यासाठी 'हमीभाव-पीककर्ज -पिक प्रणाली ' यावर उपाय सुचविणारा  एकात्मिक कार्यक्रम  करा -किशोर तिवारी 
३ फेब्रुवारी२०१५ 
महाराष्ट्र सरकारने यावर्षी एकूण ३९४५३ गावां पैकी २४८११ गावे म्हणजे आसपास ६० %  गावे पूर्ण खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत यामुळे ९० लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या    प्रभावात असुन  जागतीक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापुस ,तुर ,सोयाबीन दुध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहे शेतकऱ्यांचे नुकसान लाखोत झाले तर सरकारने सर्व शेतकर्याना सरसकट ४५०० रुपये मदत देत आपण सात हजार कोटीचे पैकेज दिले असे सांगत भिरत आहेत मात्र मागील तीन महिन्यापासुन  केंद्र सरकारने आपली सुमारे ५००० रुपये कोटीची मदत देणे तर सोडा यावर साधी चर्चा करण्यास तयार नसुन यातच दररोज महाराष्ट्रात आठ ते दहा शेतकरी नैरायामुळे उपासमारीला तोंड देत आत्महत्या करीत आहेत मात्र हमीभाव वाढ ,पीककर्ज माफी ,कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचे अन्नाचे पिक घेण्यासाठी अनुदान सोबत अन्न सुरक्षा ,मुफ्त शिक्षण  सुविधा,आरोग्य सुरक्षा हे तातडीचे उपाय नसुन यासाठी येत्या दहा वर्षाचा दुष्काळमुक्तीचा व खाजगी कंपनीचे महागडी वीज उपलब्ध करण्याचे थोतांड सरकार शेतकर्यांना देत आहे म्हणून अशा आणीबाणीच्या वेळी विदर्भाच्या शेतकऱ्यांनी भारताच्या अर्थमंत्री अरुण जेटली यांना हमीभाव  वाढ ,पिककर्ज मुक्ती व कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचे पिक घेण्यासाठी  अनुदान अशी तीन सूत्री असलेला  एकात्मिक कार्यक्रम सादर केला असुन सरकारने यासाठी आपल्या निवडणूक आश्वासन पूर्ण करण्यासाठी व विदर्भाच्या शेतकऱ्यांना दिलेले अभिवचन पुर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूदिसह घोषित करावा ,असे पत्र भारताच्या अर्थमंत्री अरुण जेटली यांना विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी पाठविले आहे . 
सध्या वीज व पाणी नसल्यामुळे विदर्भ व मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत व येत्या दहा वर्षात वीज व पाणी देणार अशा फोकनाड गोष्टी सर्वच सत्ताधारी नेते करीत आहेत मात्र त्यांना वीज व सिंचन परीपूर्ण असलेल्या पंजाब व गुजरात मध्ये हमीभाव नसल्यामुळे ,कर्जाच्या त्रासामुळे झालेल्या हजारो शेतकरी आत्महत्या का दिसत नाही असा सवाल किशोर तिवारी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे . 
लोकसभा व विधानसभेच्या निवडनुकीच्या प्रचारामध्ये शेतीमाला भाव मिळत नाही व बँका शेतकर्याना कर्ज देत व सावकार लुटतात  म्हणून आम्ही  लागवड खर्च व ५० टक्के नफा असा हमीभाव देणार ,सातबारा कोरा करून नवे पिक कर्ज देणार अशी आश्वासने देऊन आमची मते लबाडीने घेणारे नेते आज जनतेला तोंड दाखवत नसुन 'अबकी बारी ' चा नारा देणारे कार्यकर्ते कोणत्या ऑफिसमध्ये कोणते टेंडर निघत आहे व कोणाला बदली पाहिजे अशी ओरड करीत फिरत आहेत हा सारा प्रकार हताश शेतकरी पहात आहे व मात्र मांजर जशी डोळे लाऊन दुध पिते असेच सारे सत्ताधारी का करीत असल्याचा सवाल ,तिवारी यांनी केला आहे 
यावर्षी जागतीक मंदीने कापसाचे ,तुरीचे व दुधाचे भाव पाडले आहेत त्यातच शतकाच्या एक गंभीर दुष्काळ पडला आहे यावर कोणतीही चर्चा होत नाही ,मजुरांना मजुरी नाही रेशन दुकानात अन्न मिळत नाही ,दवाखान्यात औषध वा डॉक्टर दिसत नाही मात्र आढावा बैठक व हप्ता वसुली मात्र थांबत नाही असा सवाल उपाशी शेतकरी सरकारला करीत आहेत . मागेल तिथे वरळी मटका केंद्र व पानठेल्यावर दारू सहज उपलब्ध झाली आहे मात्र कापसाचे वा तुरीचे खरेदी केन्द्र सुरु का होत नाही असा सवालही किशोर तिवारी सरकारला केला आहे . 
  

No comments:

Post a Comment