Sunday, 4 January 2015

यवतमाळच्या शेतकऱ्याने केली आत्महत्या :त्याचा ' शेतकरी विधवा काय उत्तर देणार -नवाकाळ

यवतमाळच्या शेतकऱ्याने केली आत्महत्या :त्याचा ' शेतकरी विधवा काय उत्तर देणार -नवाकाळ 
मुंबई -६ जाने . २०१५
यवतमाळ जिल्यातील घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा या खेड्यातील  मुस्लिम समाजाच्या आपल्या वडील सैयद अली यांचा शेतीचा वारसा जपणारा व मात्र मागील काही वर्षापासून सारे प्रयोग करून थकलेला अन्सार अली या सावकाराच्या कर्जामुळे वडिलोपार्जित शेती गमावून आता गन्धेवार सावकाराची शेती मकत्याने  म्हणजे वार्षिक भाडेपट्टीने करणाऱ्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने आपल्या शेतात जाऊन नववर्षाच्या पूर्वसंध्येला शेतात जाऊन आपली जीवनयात्रा संपविली ही मुस्लिम समाजाच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्याची विदर्भाची मागील दशकातील पहिलीच शेतकरी आत्महत्या असल्यामुळे विदर्भात याचे पडसाद दूरवर  उमटले मात्र सरकार दरबारी आजपर्यंत सादी दखल घेण्यात आलेली नाही वा राजकारणात मुस्लिम मतांचा बाजार मांडणारा एकही नेता चिखलवर्धा या खेड्याकडे निसार अलीकडे आला नाही .
यवतमाळ  जिल्यात मुस्लिम समाजामध्ये फारच म्हणजे एक दोन खेड्यात शेती करतात मात्र घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे  मुस्लिम समाजाच्या शेतकऱ्यांनी फारच उत्तम शेती  व मशागतीचे विक्रम या आधी केले त्यातच अन्सार अलीची झालेली आत्महत्या मागील कटु सत्य जाणण्यासाठी मी नववर्षाच्या पहिल्या दिवशी गेलो … एका  मोठ्या वाड्यात पाच भावांच्या कुटुंबासोबत अन्सार आपली पत्नी सलमा परवीन ,१२वी मध्ये शिकणारी मुलगी सबा फिरदोस ,९ व ६ मध्ये शिकणारे दोन मुले  बानी आणी जुनेत आपल्या मातीच्या खोपड्यात एका कोनाड्यात बसले होते मला वाटल सलमा व सबा  मुस्लिम समाजाच्या पडदापद्धतीमुळे आलेल्या भीषण संकटावर बोलणार नाहीत म्हणून  भीतभीतच माझा परिचय दिला व अन्सारच्या  आत्महत्याबद्दल मला काही  माहीती विचारण्याची परवानगी मागीतली व त्यांनी होकार देता देताच अश्रुना वाट मोकळी केली मात्र अन्सारअलीच्या पत्नी सलमा परवीननेच मला काही सवाल विचारल्याने मला  या माध्यमातुन मी सरकारला व समाजाला सलमा व सबाची हाक पोहचविण्याचा  प्रयास करीत आहे . 
सलमा परवीनने मला पहिला सवाल केला त्याचे उत्तर माझ्याजवळ नव्हते कारण अन्सारणे कोरडवाहू शेती परवडत नाही म्हणून ती विकली व भाडेपट्टीवर सिंचनाची सोय असलेली शेती केली मात्र तरीही नापिकी झाली व आम्ही का कर्जबाजारी आता शेतकरी आत्महत्यावर सिंचन तोडगा आहे त्यांनी याचे उत्तर द्यावे ,मागच्या वर्षी  कापसाला अन्सारला रु ५००० प्रती क़िटल  मात्र यावर्षी फक्त रु ३५०० का ????. 
मला लग्नकरून अन्सारने १६पूर्वी  आणले .. आज मुलगी सबा १५ वर्षाची १२ वित  आहे तर ,९ व ६ मध्ये शिकणारे दोन मुले  बानी आणी जुनेत यांनी कधी शेत पाहिले नाही मी घराच्या व वाड्याच्या बाहेरही गेली नाही मात्र शेतीमधल्या मागील दशकात वाढलेल्या संकटाची मला पुर्ण जाणीव होत होती मात्र अन्सार असा अचानक सोडून जाणार याचा विचारच मि केला नाही . अन्सार चारही भाऊ हॉटेल ,सायकल दुकान ,नौकरी करतात त्यांनी शेती सोडली म्हणून थोडे कुटुंबाचे पोटतरी भरत आहेत ... मला तर या १६ वर्षात सतत उपासमारीला तोंड द्यावे लागले .  माझा वडिलांच्या घरी लहानपणी शेती होती व आम्ही सुखी होता आज मात्र माझ्या भावांची या शेतीने वाट लावली आहे अशी खंत सलमाने व्यक्त केली . 
आज अन्सारने आपल्यावर भरपूर कर्ज केले आहे ,आपण घराबाहेर कधीच निघाल्यानाहीत सोबत सबा ,बानी व जुनेतचे पुर्ण शिक्षण आहे हा संसाराचा रथ कसा ओठ्णार हा सवाल केल्यावर सलमाचे उत्तर दिले 'त्या देवाने पाठ्विले तोच आता मार्ग देणार' हे ऐकून मला माझे शहाणपण  आवरावे लागले मात्र सलमा ही एकटी शेतकरी विधवा अशा ११ हजारावर शेतकरी विधवा आज अन्नासाठी ,मुलांच्या शिक्षणासाठी सरकारला याचना करीत आहेत मात्र २००१ पासुन शेतकरी पैकेज नावावर सुमारे १ लाख कोटी रुपयाची लुट करणारे नेते यांना साधी अन्नसुरक्षा ,शिक्षण सुविधा , निराधार अनुदान ,आरोग्य सुरक्षा केव्हा देणार हा सवाल सलमा परवीन सरकारला विचारात आहे मात्र सत्तेच्या मस्तीत असलेल्या या नेत्यांना जाग केंव्हा येणार ... 
किशोर तिवारी 
विदर्भ जनआंदोलन समिती 
(०९४२२१०८८४६) 

No comments:

Post a Comment