Friday, 30 January 2015

यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी हजारो महिलांचा सत्याग्रह-दारूबंदी न केल्यास आमरण उपोषणाचा ईशारा
यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी हजारो  महिलांचा सत्याग्रह-दारूबंदी न केल्यास आमरण उपोषणाचा ईशारा 
दिनांक ३० जानेवारी २०१५


यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेल्या वर्धा आणि काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर येथे शासनाने दारूबंदी जाहीर केल्यानंतर आता यवतमाळ जिल्हाही दारूमुक्त करावा, यासाठी आज ३०जानेवारीला महात्मा गांधीजीच्या पुण्यतिथीच्या दिवशी पांढरकवडा विदर्भ जनांदोलन समिती कार्यकर्ते व महिला बचत गटांतर्फे  तर्फ़े  व तर सदोबासावली येथे  जनता विकास आघाडीचे प्रमुख व  सामाजिक नेते मुबारक तवर यांच्यासह हजारो आदिवासी महिला  उपोषण सत्ताग्रह केला असुन सरकारने चंद्रपूर सोबतच यवतमाळ जिल्यात दारूबंदीचा जि.आर.अशी सरकारने काढावा असा  एकमुखी ठराव  न केल्यास आमरण उपोषणाचा ईशारा  देणारे  निवेदन यावेळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडविस यांना देण्यात आले . 
पांढरकवडा येथील  उपोषण सत्ताग्रहची सुरुवात  महात्मा गांधीजीच्या प्रतिमेला पांढरकवडा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष  अनिल तिवारी पुष्पहार अर्पण करून केली यावेळी आदिवासी महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा पेन्दोर , वेणूताई पंधरे , सोमित्राबाई चव्हाण व शेतकरी विधवा संघटनेच्या अपर्णा मालीकर ,भारती पवार तर शेतकरी नेते मोहन जाधव ,रमेश चव्हाण ,शेखर जोशी,गोपाल शर्मा   यांनी आपले विचर प्रगट  केले . उपोषण सत्ताग्रहात शेतकरी नेते सुरेश बोलेनवार , अंकित नैताम ,मनोज मेश्राम ,राजू राठोड ,प्रीतम ठाकुर ,नितीन कांबळे ,भिम्राम नैताम ,नंदकिशोर जैस्वाल ,मुरली वाघाडे व संतोष नैताम हे प्रमुखपणे सहभागी  होते . 


यावेळी बोलतांना विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी यावेळी आरोप केला की जिल्ह्यातील गावोगावी खुलेआम दारू विकली जाते. मात्र, पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने 'संपूर्ण यवतमाळ जिला दारूमुळे अधोगतीला जात आहे, दारूसोबतच जुगाराचे व्यसनही वाढले आहे.  यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता, केळकर समितीने यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करा, असा अहवाल दिला आहे म्हणुन सरकारने तात्काळ दारूबंदी करावी अशी मागणी त्यांनी केली . 


महाराष्ट्राच्या युती सरकारने चंद्रपूर जिल्यात दारूबंदीच्या निर्णया सोबतच  आता यवतमाळ जिल्यात दारूबंदी करा कारण  यवतमाळ
 जिल्यात दारूबंदी  करण्यासाठी मागील ३ वर्षापासुन जनांदोलन होत असून येथील आदिवासी व शेतकऱ्यांची तीव्र मागणी  यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ दारूबंदीची शिफारसीची  बजावणी करावी अशी मागणी कृती समितीच्या संयोजक सुरेखा पेंदोरे  यांनी या वेळी केली . तरुण पिढीत व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. मुले दारूच्या आहारी जात आहे. दारूमुळे सुखी संसाराची रांगोळी होत आहे. सहज उपलब्ध होणारी कमी पैशातील दारू हे यामागील प्रमुख कारण आहे. पोलीस व प्रशासनाने संरक्षण दिल्याने गावागावात दारूच्या भट्टय़ा पेटविल्या जात आहे. तरी सरकार झोपले आहे का असा सवाल  मोहन जाधव यांनी यावेळी केला 

No comments:

Post a Comment