Tuesday, 13 January 2015

नवीन वर्षात १६ शेतकरी आत्महत्या-राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल--विकासाच्या नावावर लूट---विदर्भ जनआंदोलन समितीची माहिती -लोकमत


नवीन वर्षात १६ शेतकरी आत्महत्या-राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 

घेतली दखल--विकासाच्या नावावर लूट---विदर्भ जनआंदोलन समितीची 

माहिती -लोकमत 

 विकासाच्या नावावर लूट■ खासगीकरण व विकासाच्या नावावर नव्या जोमाने राज्यात लूट सुरू झाली असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. या बाबीचा प्रचंडताण शेतकरी व शेतमजुरांवर दिसून येत आहे. खुल्या बाजारात कृषी मूल्यांवर बंदी आलेली आहे. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडल्याचे दिसून येते. 


यवतमाळ : विदभातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र अधिकच तीव्र होत असून जानेवारी २0१५च्या पहिल्या १0 दिवसात आणखी १६ कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा आत्महत्या करुन संपविली असुन आता सर्वोच्च न्यायालयानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेसुद्धा दखल घेतल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली आहे. 

विदर्भ जनांदोलन समितीच्या यवतमाळ जिल्हयातील चिखलवर्धा येथील दुष्काळग्रस्त शेतकरी सैयद अन्सार अलीसह विदर्भाच्या मागील महिन्यात झालेल्या ५६ शेतकर्‍यांच्या आत्महत्या संबंधात ही तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली होती त्यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत चौकशीला घेतल्याची सूचना विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांना दिली आहे. विदर्भात जानेवारीच्या पहिल्या १0 दिवसात आणखी १६ कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा आत्महत्या करुन संपविली. मोरेश्‍वर ठावरी अम्बाभ्क्ता (चंद्रपूर), राजेंद्र अवचार पातुर्डा (बुलढाणा ), मधुकर पेंदोर रुंझा (यवतमाळ), हरीश पंचभाई खापरी (यवतमाळ), अमोल घाटेकर पांढरी (अमरावती), सीताराम बागडे केलवद (नागपूर), संदीप मडके वेडद (यवतमाळ), किसान कुमरे पांजरा (वर्धा), रमेश खमनकर रुंझा (यवतमाळ), किसन मेश्राम सेंद्री (भंडारा), पंढरीनाथ सानप अंधेरा (बुलढाणा), शीला आठवले लोहारा (वाशिम), रामराव टोंगे दाढेरा (नागपूर), मनोहर शेजाळ तीवरंग (यवतमाळ), अतुल माने बोरी (यवतमाळ), अशोक उगेमूगे बामड्रा (वर्धा ) या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीने कळविले आहे. प्रचंड नापिकी व खुल्या बाजारात कृषिमूल्यांवर आलेली मंदी सोबत शेतकर्‍यांना यावर्षी आरोग्य, शिक्षण, सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लागणारा मासीक खर्ज व खासगीकरणाच्या व विकासाच्या नावावर नव्या जोमाने सुरु झालेली लूट याचा प्रचंड ताण ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजुरांवर दिसत आहे. डिसेंबर महिन्यात विदर्भात ५७ शेतकर्‍यांनी तर २0१४ मध्ये ११५४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment