Friday, 26 December 2014

विदर्भात मागील ७२ तासात १२ शेतकऱ्यांचा आत्महत्या : महाराष्ट्राची ३ कोटी ग्रामीण जनतेला वाचविण्यासाठी तात्काळ मदत सुरु करावी -किशोर तिवारी

विदर्भात मागील ७२ तासात १२ शेतकऱ्यांचा आत्महत्या : महाराष्ट्राची ३ कोटी ग्रामीण जनतेला वाचविण्यासाठी तात्काळ मदत सुरु करावी -किशोर तिवारी 

दिनाक -२७ डिसेंबर २०१४
महाराष्ट्राचे  कृषी संकट २०१४ च्या दुष्काळ ,प्रचंड नापिकी व खुल्या बाजारात कृषीमुल्यांवर आलेली मंदी सोबत शेतकऱ्यांना यावर्षी  आरोग्य ,शिक्षण ,सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लागणारा मासीक खर्ज व खाजगीकरणाच्या व विकासाच्या नावावर नव्या जोमाने  सुरु झालेली लुट याचा प्रचंड तणाव ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजुरांवर दिसत असून नैरायात गेलेल्या आणखी १२ शेतकऱ्यांनी मागील ७२ तासात आपले जीवन आत्महत्या करून संपविले असून या डिसेंबर महिन्यात विदर्भात २६ तारखेपर्यंत ५२ शेतकऱ्यांनी तर २०१४ मध्ये ११०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मागील २० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या नैराय ,कोरडवाहू विदर्भात कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी संकट , जागतीकरणाच्या ग्रामीण भारतावर होत असलेल्या  विपरीत परिणाम यावर  चळवळ करणारे विदर्भ जनांदोलन समितीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली . 
मागील तीन दिवसात ज्या १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्या आहेत त्यांची नावे  या प्रमाणे आहेत 

१.)सैयद अन्सार अली चिखलवर्धा यवतमाळ  
२.) खुशाल कापसे   देहेगाव  यवतमाळ 
३.) पुनाजी मनवर   मांगकिन्ही  यवतमाळ 
४). मारोती गोडे  पिंपळगाव  वर्धा 
५.) शिवानंद गीते  शिवणी बुलढाणा 
६). विठ्ठल तायवाडे  देवळी वर्धा 
७).  संजय डाखोरे  रेगाव  वाशीम 
८) निलेश  वाळके   गुंजी   अमरावती 
९) सुनिल   राखुंडे  गवथाळा    बुलढाणा  
१०) मधुकर  अडसर    पिंपळगाव   वर्धा      
११)सोमेश्वर वडे  तांबा   यवतमाळ 
१२) मारोती राठोड  गीनग्नुर   यवतमाळ 
यामध्ये एकट्या यवतमाळ मध्ये १९ तर अमरावती मध्ये ९ तर वर्धा ७ ,बुलढाणा ६ आणी वाशीम येथे ४ शेतकऱ्यांचा समावेश आहे . 
एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या माध्यमात समोर येत आहेत मात्र सारा खरीप व आता रब्बी हंगाम बरबाद झाल्यामुळे शेतमजुरांची होत असलेली उपासमाराची दखल सरकार समाज घेत नास्ल्यामुळे ग्रामीण भागात  नैरायात  प्रचंड वाढ होत आहे . विदर्भाच्या कृषी संकटावर सरकारला सल्ले देणारे  पोटभरू कृषी सल्लागार व अर्थशास्त्री यांच्या विकृत सल्ल्यामुळे मागिल दशकात सरकारने ६० हजार कोटीचे पैकेज वर   पैकेज देऊनही विदर्भाचे कृषी संकट अख्या महाराष्ट्रात पसरले असुन आज विदर्भापेक्षा मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या होत असून मात्र सरकार मदत तर सोडा साधी विचारपुस करण्यास तयार नाही ही शोकांतिका आहे ,अशी खंत किशोर तिवारी व्यक्त केली . 
विदर्भाच्या  कृषी संकट हे १९९७ मध्ये सरकारने बाजार खुला केल्यानंतर व खाजगीक्षेत्राला  शिक्षण ,स्वास्थ , वीज ,मोबाईल ,   चैनीच्या वस्तू घेण्यासाठी व वाहनासाठी दारेवर कर्ज तर शेतीसाठी बँकेची दारे बंद ,कृषी वरील सर्व अनुदान कपात तर दुसऱ्या हरितक्रांती   बहुराष्ट्रीय  कंपन्याचे शेतकऱ्यांना मारणारे तंत्रध्यान कारणीभूत असून सरकारला सल्ले व अहवाल देणारे  पोटभरू कृषी सल्लागार व अर्थशास्त्री  यावर चुप असुन शेतकऱ्यांचे खरे मारेकरी हेच असल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केला आहे . 
 विदर्भ जनांदोलन समितीच्या सरकारला मागील तीन महिन्यापासून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना महाराष्ट्र सरकारने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी आणि त्यांच्यावरील पीक कर्जही पूर्णपणे किंवा अंशत: माफ करावे, तसेच या शेतकर्‍यांना मनरेगांतर्गत किमान १00 दिवसांचे वेतन अनुदान देण्यात यावे, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना अन्न, आरोग्य व शिक्षण सुरक्षा मिळावी अशा प्रमुख मागण्या रेटल्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत सरकारला विचारणा केली मात्र राज्याची नौकारशाही यावर जगणार की नाही असा सवालही तिवारी यांनी केला आहे . 
=============================================
.डिसेंबर दरम्यान  विदर्भात ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या 
   १) संदीप मारोतराव नागले घाटलाडकी, चांदूरबाजार, अमरावती 
२) श्रीकृष्ण मनिराम मडावी रामपूर, अकोट, अकोला 
३) आप्पाजी निनावे बपेरा भंडारा 
४) राजू उकंडराव सोंगे वाईगौळ, मानोरा, वाशीम 
५) सुरेंद्र भीमराव निकम चमक, परतवाडा, अमरावती 
६) प्रभाकर निसन भोसले केकतपूर, अमरावती 
७) शैलेश दत्तू थेरे बामर्डा मारेगाव, यवतमाळ 
८) तात्याजी उद्धव सोनुले नवरगाव मारेगाव, यवतमाळ 
९) सुरेश जयसिंग जाधव साखरा दिग्रस, यवतमाळ 
१०) हंसराज उकंडराव भगत घारफळ बाभुळगाव, यवतमाळ 
११) पांडुरंग तानबा हिवसे खराडी, भंडारा 
१२) नामदेव आकाराम खंडारे माधान चांदूरबाजार, अमरावती 
१३) कचरू डोमाजी तुपसुंदरे रामपूर धामणगाव रेल्वे, अमरावती 
१४) वामन संपत राऊत चांडोळ, बुलडाणा 
१५) उमाशंकर विश्वनाथ काटकर अंजनी लोणार, बुलडाणा 
१६) केशव जंगलू चौधरी बोरगाव कळमेश्वर, नागपूर 
१७) रेवनाथ जयराम बारसागडे नगरी गडचिरोली, गडचिरोली 
१८) सचिन भूजंगराव राऊत सिरजगाव चांदूर रेल्वे, अमरावती 
१९) तुकाराम बाबूलाल चव्हाण भोपापूर दारव्हा, यवतमाळ 
२०) सूरज अशोक भोयर अंजी घाटंजी, यवतमाळ 
२१) मोरेश्वर भारत चौधरी दहेली घाटंजी, यवतमाळ 
२२) तुळसाबाई रामचंद्र मून पार्डी कळंब, यवतमाळ 
२३) शैलेश विठ्ठल बोभाटे खापरी, वर्धा 
२४) संजय पंडित थोरात येडशी, वाशीम 
२५) हाजूसिंग रामचंद्र पवार वरंदळी दिग्रस, यवतमाळ 
२६) दीपक मनोहर झाडे पहेलानपूर सेलू, वर्धा 
२७) बंडू विठोबा डहाळकर वाढोणा बाजार राळेगाव, यवतमाळ 
२८) जगन कसनदास चव्हाण भिवापूर चांदूर रेल्वे, अमरावती 
२९) दिनेश शंकरलाल जयस्वाल कोथळी मोताळा, बुलडाणा 
३०) शंकर उद्धव चौधरी साखरा वणी, यवतमाळ 
३१) गजानन नथ्थुजी धवस कुर्ली वणी, यवतमाळ 
३२) नीळकंठ रागो लेडांगे टाकळी वरोरा, चंद्रपूर 
३३) रुपेश अशोक धवणे फाळेगाव बाभुळगाव, यवतमाळ 
३४) राष्ट्रपाल ढोरे काचनगाव हिंगणघाट, वर्धा 
३५) रामदार किसन मेश्राम शेंदुरजना बाजार तिवसा, अमरावती 
३६) श्रीकृष्ण देवसा गुजर माळशेलू मंगरुळपीर, वाशीम 
३७) रामदेव बळीराम चेपटकर वाघोडा पारशिवणी, नागपूर 
३८) शरद डोमाजी कावडे चिखली राळेगाव, यवतमाळ 
३९) सुनील श्रीराम युवनाते अंबोरा कारंजा घाडगे, वर्धा 
४०) मोतीराम किसन अढाव पातुर्डा संग्रामपूर, बुलडाणा

No comments:

Post a Comment