Thursday, 18 December 2014

गुजरातच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याची कापसाच्या हमीभाव वाढीसाठी राजकोट येथे आत्मदहान : भारताच्या कृषीधोरणावर पतंप्रधान मोदींना पुनर्विचार करण्याची वेळ आणली


गुजरातच्या  कापूस उत्पादक  शेतकऱ्याची  कापसाच्या  हमीभाव वाढीसाठी राजकोट येथे आत्मदहान : भारताच्या  कृषीधोरणावर पतंप्रधान मोदींना पुनर्विचार करण्याची वेळ आणली 
दिनांक १९डिसेंबर, २०१४
भारताचा बाजार जगासाठी खुला करण्यासाठी जागतीकरणाची  गती  सुपरफास्ट करण्याची घोषणा करुण येत अर्थसंकल्प  सादर करण्यासाठी   विश्वव्यापार  संघटनेच्या सुधारणा तात्काळ लागू  करण्यासाठी करारावर वर करार करीत असलेल्या मोदी सरकारला बुधवारी गुजरात राज्यातील  राजकोट जिल्ह्यातील २१ वर्षीय कापूस  उत्पादक शेतकरी अरविंद कोळी  यांनी कृषीउत्पन  बाजार  समितीच्या गेट वर कापसाला मिळत असलेली  किमान आधारभूत किंमत (एमएसपी) विरुद्ध एक प्रतिकात्मक निषेध करीत    स्वत:ला    पेटवून केलेले  आत्मदहन  व  गुजरात राज्यामध्ये  संघाच्या  परिवारातील भारतीय किसान संघाने कापसाचा हमीभाव  वाढीसाठी ,शेतकऱ्यांना सरळ अनुदान व परंपरागत शेती पुनर्जिवित करण्यासाठी सुरु केलेले आंदोलन मोदींच्या  गुजरात राज्य  देशातील सर्वात मोठा कापूस उत्पादक राज्य असतांना व  या वर्षी देखील, राज्य मजबूत उत्पादन साक्षीदार होते असतांना  मात्र आंतरराष्ट्रीय मागणी अभाव, कापूस जागतिक  दर यामुळे  शेतकरी  कर्ज बाजारी झाला आहे व भारताचे कृषीसंकट  हे  अस्मानी नसून सरकारच्या चुकीच्या धोरणाचे बळी आहेत असा स्पष्ट निरोप  राजकोट जिल्ह्यातील २१ वर्षीय कापूस  उत्पादक शेतकरी अरविंद कोळी   आत्मदहनामुळे मोदींना दिला असुन सरकारने  भारतातील शेतकरी वाचविण्यासाठी  खुली अर्थ व्यवस्था  केराच्या  टोपलीत टाकावी व अमेरीका  युरोप व चीन सारख्या प्रगत देशाप्रमाणे  आपल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी  सरळ अनुदान व खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव तात्काळ दयावा अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या  प्रश्नांवर मागील २० वर्षापासून सतत लढा देणारे शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी  पंतप्रधान मोदी याना एक निवेदन देऊन केली आहे . 


भारतात शेतकरी आत्महत्या सत्र मोठ्या प्रमाणात सरकारने डंकेल करार केल्यानंतर नगदी पिक घेणाऱ्या व कोरडवाहू शेतकऱ्यांमध्ये सुरु झाले तर २००४ मध्ये कापसाची आयात खुली करून सरकारने ३ लाखावर शेतकऱ्यांना आत्महत्यासाठी आमंत्रित केले हे सत्य रासायनिक शेतीमधील खतांच्या व कीटकनाशकांच्या  किमतीत झालेले अनियंत्रित वाढ व वापर त्याच वेळी जागतील बाजारात कापसाच्या पडणाऱ्या किमती ह्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत यावर्षी आपले शेतकरी मरू नये म्हणून चीन कापसाची आयात बंद केली आहे ,भारतात  कापसाच्या गिरण्या शेवटची घटकामोजत  महाराष्ट्रातील सर्व जीनचालक व कापसाचे दलाल दिवाळघोरी  घोषीत करीत आहेत तर शेतकऱ्यांना तिप्पट कर्ज करून २५% सरासरी कापसाचे उत्पादन होत  असून राज्य सरकार मात्र झोपले आहे त्याच वेळी केंद्र सरकार शेतकऱ्यांना गाड्णाऱ्या सुधारणा करण्यासाठी  मुठभर  उद्योगांना व अमेरिका सारख्या देशांची पाठराखण करण्यासाठी बाजार खुला करणे ,विषारी  रसायने आणि वादग्रस्त तंत्रज्ञान खुले करणे व आपल्याच संघ परिवाराचे म्हणणे केराच्या टोपलीत टाकणे अत्यंत गंभीर असुन ,मोदींनी गुजरात घटनेचा बोध घेऊन आपले धोरण तात्काळ दुरुस्त करावे ,हि विनंती तिवारी यांनी केली आहे . 

लोकसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात प्रचाराचा नारळ फोडताना मोदींनी कृषि हमीभाव  आधारभूत किंमत  ठरविताना स्वामिनाथन आयोगाची आठवण करून लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा हा फार्मुला  दीला व सर्व शेतकऱ्यांना बँकेकडून पत पुरवढा देण्याचे आश्वासन दीले मात्र आज त्यावर केंद्र व राज्य सरकार ब्रहि बोलत नाही ही तर साफ बेईमानी आहे यावर मात्र आता  संघाकडून जसा पाहिजे तसा दबाव  येत नसुन आम्हाला भाजपला पाठींबा देण्यासाठी विनंती करणारे संघाचे संघटन मंत्रीही सरकारचे मंत्री आता आम्हालाही विसरले उत्तर देऊन कानावर हात ठेवत आहेत असून ही तर चळवळीच्या कार्यकर्त्यांनाच  आत्महत्या करण्यास  बाध्य करीत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे 

No comments:

Post a Comment