Thursday, 11 December 2014

शेतकऱ्यांना पैकेज नाही पीक कर्जमाफी व वाढीव हमिभावाचे आश्वासन पुर्ण करा या मागणीसाठी शेकडो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी केली युतीच्या वचननाम्याची होळी

शेतकऱ्यांना पैकेज नाही पीक कर्जमाफी व  वाढीव हमिभावाचे आश्वासन पुर्ण  करा या मागणीसाठी शेकडो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी केली  युतीच्या वचननाम्याची  होळी 
दिनांक - ११ डिसेंबर २०१४

 मागील दहा वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुमारे २० हजार कोटींचे २००५ पासूनचे  देण्यात आलेले  सर्व पैकेज अधिकारी ,ठेकेदार व राजकीय नेत्यांनीच खाल्याने या वेळी घोषीत करण्यात आलेले ७ हजार कोटीचे पैकेज बँकांना व खाजगी  सावकारांना लाभकारी ठरणार म्हणून   आम्हाला पैकेज वा बोनसचा गाजर  देऊ नका तर व्याज नाही  संपुर्ण पिक कर्जमाफी सह   महाराष्ट्राच्या युती सरकारने केंद्रात व राज्यात सत्ता प्राप्तीसाठी दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी नापिकीचे प्रती हेक्टरी अनुदान ,संपुर्ण पीक कर्जमाफी व  पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या  फार्मुल्याप्रमाणे  लागवड  खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव कापसाला ,सोयाबीनला ,तुर व धानाला द्या या मागणीसाठी यवतमाळच्या  पैकेज नंतर सतत नापिकी व कर्जाला बेजारून  १४ शेतकऱ्यांनी  आत्महत्या केल्या  त्या दहेली या  गावी आज  ११ डिसेंबरला   रोजी  युतीच्या पीक कर्जमाफी व  वाढीव हमिभावाचे आश्वासनाच्या  वचननाम्याची  होळी करून शेकडो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी  सरकारचे शेतकऱ्यांच्या  मागण्याकडे  लक्ष वेधण्या  प्रयास  विदर्भ जन आंदोलनाचे नेते किशोर तिवारी नेतृवात केला असुन या आंदोलनात शेतकरी नेते प्रेम चव्हाण ,मारेश्वर वातीले ,अंकित नैताम , शेखर जोशी सह भीमराव नैताम व दहेली गावचे शेतकरी नेते  जयकुमार चौधरी सह सरपंच वासुदेव  भोयर ,नंदकिशोर मानकर , रामभाऊ एलादे , योगेश मानकर , अशोक बोंद्रे ,संदीप चौधरी ,बेबीताई मेश्राम ,रेखाताई  बोंद्रे ,सुचिता ठाकरे , सतीश भोयर ,अमर पांडे व दीपकराव येरावार सह परीसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शामील झाले होते . 
यावेळी बोलतांना शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी  शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त शेतकर्याना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान , संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू केली नाही वं सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू केली नाही, सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच  सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ द्यावे ह्या मागण्या यावेळी केली . मागील १२ वर्षापासून  तेच अधिकारी  पैकेज तयार करीत असुन आणी हजोरो कोटी रुपये पाण्यात जात आहेत मात्र सरकार लोकांनी बदलले आहे मात्र तेच अधिकारी मेलेल्या शेतकऱ्यांच्या टाळू वरचे  लोणी खात असुन यांना कोण हटवणार असा सवालही तिवारी यांनी केला यावेळा सरकारला केला आहे . 
कर्जावरील व्याजमाफी व कर्जाचे पुर्नवसन हे थोतांड असुन खाजगी  सावकारांचे कर्जमाफी  सरकार कोणत्या रेकोर्ड वरून करणार कारण सध्या गावात कृषीकेंद्र मालक ,मास्तर , पोलिसवाले व अन्ना कोणताही परवाना न घेता कर्ज देतात ही तर  मृगजळ  दाखविण्याचा प्रकार आहे असा टोलाही तिवारी यांनी यावेळी लगावला . हे सरकार जे  करायेचे आहे ते करीत नसुन पैकेज बाजार मांडून शेतकरी आत्महत्यांना आमंत्रण देत आहे असा आरोपही तिवारी यावेळी लगावला आहे . 
ज्योपर्यंतमहाराष्ट्राच्या युती सरकारने केंद्रात व राज्यात सत्ता प्राप्तीसाठी दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी नापिकीचे प्रती हेक्टरी अनुदान ,संपुर्ण पीक कर्जमाफी व  पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या  फार्मुल्याप्रमाणे  लागवड  खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव कापसाला ,सोयाबीनला ,तुर व धानाला देणार शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत सरकारने शेतकरी वाचविण्यासाठी आपले वचन पुर्ण करावे अशी मागणीही तिवारी यांनी यावेळी केली .  


No comments:

Post a Comment