Friday, 5 December 2014

पश्चिम विदर्भाच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यानसारखीच भाजपने केली लोकनियुक्त आमदारांची उपेक्षा : हा तर पश्चिम विदर्भाच्या ग्रामीण जनतेचा उपमान

पश्चिम विदर्भाच्या दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यानसारखीच   भाजपने केली लोकनियुक्त  आमदारांची उपेक्षा : हा तर पश्चिम विदर्भाच्या ग्रामीण जनतेचा  उपमान 
५ डिसेंबर २०१४
महाराष्ट्राच्या  मंत्री मंडळाचा विस्तार करतांना ज्या यवतमाळ जिल्याने इतिहास घडउन  पाच आमदार निवडून दिले व सत्ताधारी दिग्गज्ञ नेत्यांना  नाकारून भरघोस यश दिले  त्या दुष्काळग्रस्त जिल्यासोबतच  पश्चिम विदर्भाच्या खामगावचे भाऊसाहेब पुंडकर , चैनसुख संचेती , गोवरधनजी शर्मा , अमरावतीचे  प्रभाकर भारसाकडे ,डॉ . सुनील देशमुख तर यवतमाळचे मदन येरावार  यांना मंत्रीमंडळात  स्थान न देणे व मागील दाराने आलेल्या  विधान परिषदेच्या धनासेठाना  मंत्रिपद देणे हा तर  पश्चिम विदर्भाच्या ग्रामीण जनतेचा शेतकऱ्यांचा ,आदिवासींचा जनदेशाचा उपमान असुन यवतमाळ जील्यासह  पश्चिम विदर्भाची  जनता  भाजपच्या या  मीठ चोळण्याचा प्रकारचा बदला  योग्य वेळी घेणार अशी खोचट प्रतिक्रिया शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे . 
 पश्चिम विदर्भाच्या कापूस  उत्पादक  शेतकऱ्यांनी या वर्षी आपला रोष प्रगट करीत भाजपला भरघोस मतदान केले असुन सरकार मात्र दुष्काळ कठीण समयी वाऱ्यावर सोडत आहे व 'बघु पाहू 'ची भूमिका घेत आहेत कारण या शेतकऱ्यांचे दुखः जाणणारा कोणताही नेता सरकारमध्ये  नव्हता म्हणून मंत्री मंडळाचा विस्तारात  भाऊसाहेब पुंडकर वा अरुण अडसर सारखे शेतकरी नेते  चैनसुख संचेती , गोवरधनजी शर्मा , अमरावतीचे  प्रभाकर भारसाकडे ,डॉ . सुनील देशमुख तर यवतमाळचे मदन येरावार सारखे अनुभवी आमदार  मंत्रीमंडळात  घेण्यात येतील अशी अपेक्षा होती मात्र भाजपच्या गटबाजीने व नितीन गडकरी यांचे राज्य सरकारमध्ये  वजन कमी करण्याच्या कुटील हेतुने या जेष्ठ नेत्यांचा  अनुभवाचा फायदा अडचणीच्या वेळीस सरकारला होत नसुन भाजपपेक्षा तर शिवसेना परवडली कारण एकमेव आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद देऊन  पश्चिम विदर्भाच्या शेतक
ऱ्यांचे  अश्रू पुसणारा खरखूरा शेतकरी पुत्र मंत्री केला आहे अशीही पुष्टी तिवारी यांनी जोडली आहे .
यवतमाळ जिल्यात मोठ्या मोठ्या पाणी पाजणारे  अतिउच्च शिक्षा विभूषित डॉ . अशोक उईके ,प्रा . राजु तोडसाम  यांना आदिवासींना आपला आवाज सरकारमध्ये रेटण्यासाठी मंत्री करा असा आग्रह  अनेक केंद्रीय मंत्री सह  संघाच्या  नेत्यांना धरला होता तरी त्यांना डावळल्याने  आदिवासी मोठ्या प्रमाणात भाजप पासुन दुर  गेले आहेत मात्र सत्तेच्या मस्तीत असणाऱ्यांना याची आता काय चिंता ,असा सवालही तिवारी यांनी विचारला आहे . 

No comments:

Post a Comment