Sunday, 16 November 2014

सी सीआय व पणन महासंघाची हमीभावापेक्षा कमी भावाने कापुस खरेदीने शेतकऱ्यांची निराशा : सोयाबीन व कापसाच्या अभूतपूर्व नापिकीवर प्रती हेक्टरी मदत व संपूर्ण कर्ज माफी हाच तोडगा-किशोर तिवारी


सी सीआय व  पणन महासंघाची हमीभावापेक्षा कमी भावाने  कापुस खरेदीने शेतकऱ्यांची निराशा : सोयाबीन व कापसाच्या अभूतपूर्व नापिकीवर  प्रती हेक्टरी मदत व संपूर्ण कर्ज माफी  हाच तोडगा-किशोर तिवारी  
  
दिनांक १७ नोहेंबर २०१४
अनेक अडचणीनंतर १५ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या च्या कापूस खरेदीच्या मुहूर्तालाच कापसाची आर्द्रता १२ टक्याच्यावर नसावा व  कापसाचे दर एलआरए ५१६६ जातीला ३८५० रुपये, एच ४, एच६ जातीला ३९५० तर बन्नी, ब्रम्हा जातीला ४०५० रु. इतका भाव केंद्र शासनाने जाहिर केल्याप्रमाणे येत असून सक्तीची ४ % कट्टी सुधा सुरु  केल्यामुळे शेतकऱ्यांची पार निराशा झाली असुन यापेक्षा तात्काळ चुकारा देत व्यापारीच जास्त भाव देत होते आतातर व्यापारी उभ्याने लुट सुरु करतील कारण महाराष्ट्रात ३४५ खरेदीकेन्द्रा पैकी पणन महासंघाने सी सी आय सोबत करार करून जेमतेम फक्त २७ केंद्रावर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. दुसऱ्या तिसऱ्या टप्यात आणखी ७३ केंद्र उघडणे प्रस्तावित आहे व  कापसाची खरेदी शासनाच्या एफएक्यू नॉर्म्स प्रमाणे राहणार आहे यामुळे सरकारने शेतकर्याना वाऱ्यावर सोडले असून लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा मोदींचा हमीभावाची निवडणुकीची खैरात आता हवेतच विरणार हे निश्चित झाले असुन महाराष्ट्रातील कापुस ,सोयाबीन व तुरी उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ६० लाख हेक्टरमध्ये झालेल्या अभूतपूर्व नापिकीमुळे  कमीत कमी रू २० हजार कोटीचे झालेले नुकसान व या  संकटातून  बाहेर काढण्यासाठी सरकारने  कमीतकमी हेक्टरी रु २० हजार मदत ,कोरडवाहू दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना  संपूर्ण कर्जमाफी  तसेच या शेतकऱ्यांना पुढील एक वर्ष अंत्योदय अन्न सुरक्षा , वीज बिल माफी , मुलांची संपूर्ण फी माफी , आजाराजा खर्ज , राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेमधुन शेतकऱ्यांना सरसकट २०० दिवसाच्या मजुरीचे अनुदान देण्यात यावे असा प्रस्ताव सरकारला विदर्भ जनांदोलन समितीने दिला असुन यासाठी मुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस यांना आपण आग्रह धरला असल्याची माहिती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली . 

मुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार हातात घेतल्यानंतर विदर्भात ३० तर मराठवाड्यात ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती माध्यमांनी समोर आणली मात्र या गंभीर विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी  चर्चा करण्यासाठी दिनाक २९ नोहेबरचा  मुहूर्त काढला असून मागील १५ वर्षापासून शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात ६० हजारावर आत्महत्या पाहणारे प्रधान सचिव सुधीर गोयल यांच्या मार्गदर्शनात  काय तोडगा काढणार  आता सारे भाजपवासी पाशा पटेल सारखे शेतकऱ्यांचे कैवारी  चूप कां असा सवालही ,किशोर तिवारी यांनी केला आहे . 
मागील लोकसभा  निवडणुकीमध्ये  सातबारा कोरा करून कापसाला लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा मोदींचा हमीभावाची  हमी घेणारे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात गेले तर गोपीनाथ मुंडेजी देवाघरी गेले आज पंतप्रधान मोदिजी सतत विदेशात व  आमचे नेते नितीनजी  गडकरी युरोपात  व विदर्भाच्या सर्व आशा असलेला देवेंद्र फडणवीस सत्कारात ,आम्ही शेतकऱ्यांनी काय आत्महत्याच कराव्या कारण मागल्या सरकारचे कृषी धोरणच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडतात असा सतत ओरड करणारे नेतेच  तेच धोरण सरकार बदलुन रेटत असतील शेतकऱ्यांचे मरण निश्चत आहे कारण मागच्या सरकारचे कापसाचे हमीभाव सरकारने कायम ठेवले ,पिक कर्ज पत देण्याचे धोरण मागील सरकारचे कायम ठेवण्यात आले ,शेतकऱ्यांना लुटणारा  जागतीक बाजार व खुली अर्थ प्रणाली अधिक जोमाने रेटण्यात सुरुवात मागील सहा महिन्यात झाली आहे यामुळे सारी कृषी व ग्रामीण जनता विचारात पडली आहे मात्र स्वदेशीचा नावाचा गजर करणारे या सरकारला शेतकरी विरोधी धोरणे बदलण्यासाठी कोणत्या मुहूर्तावर बोलणार असा सवाल तिवारी यांनी केला आहे . 


No comments:

Post a Comment