Wednesday, 5 November 2014

वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाताचे विदर्भ जनांदोलन समिती कडून स्वागत :शिवसेनेने विदर्भाच्या जनतेच्या भावनाचा आदर करावा


वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाताचे विदर्भ जनांदोलन समिती कडून स्वागत :शिवसेनेने  विदर्भाच्या जनतेच्या भावनाचा आदर करावा 

नागपूर -५/ ११/ २०१४
छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी भाजपाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ही आमची तात्विक भूमिका आहे. महाराष्ट्रात आमची सत्ता आली असली तरी आम्ही त्यावर अजूनही कायम आहोत. वेगळ्या विदर्भाची निर्मिती कधी करायची, याचा निर्णय केंद्रातील श्रेष्ठी करतील. ती कधी होईल, तरी राज्याच्या निर्मितीची पद्धत मात्र स्पष्ट आहे. तेलंगणा नव्हे तर छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड या राज्यांच्या धर्तीवर विदर्भ राज्य तयार होईल. महाराष्ट्र अन् विदर्भ या दोन्ही राज्यांचा विकास झाला पाहिजे यावर भर देण्यात येईल, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भाबाबत केलेल्या घोषणेचे विदर्भ राज्य  निर्मितीसाठी भाजपला पाठींबा देणाऱ्या विदर्भ जनांदोलन समितीने स्वागत केले असुन ,शिवसेने अखंड महाराष्ट्रासाठी मतदान मागितल्यानंतर  मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी माणसाने त्यांना या मुद्यावर नाकरल्यानंतर  उद्धवजीने  विदर्भाच्या जनतेच्या भावनाचा आदर करावा व विदर्भ राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती शिवसेना प्रमुख्यांचे जवळचे मित्र व वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर दुरावलेले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे . 
आज सामना मध्ये देवेंद्र फडणवीस यांना  विदर्भ राज्य निर्माण करणाच्या भाषा म्हणजे महाराष्ट्रापासून विदर्भास तोडणे म्हणजे आईपासून मुलास तोडण्यासारखे आहे व  विदर्भातील मुख्यमंत्र्याने महाराष्ट्र तोडण्याची भाषा करावी म्हणजे महाराष्ट्राच्या रखवालदारानेच 'घोटाळा' करण्यासारखे आहे अशी टीका करण्यात आली आहे मात्र आई आपल्या मुलास सतत ६० वर्ष उपाशी ठेऊन कधी मुडदा पाडते का ??? असा सवालही किशोर तिवारी यांनी शिवसेनाला केला आहे . विदर्भावर होत असलेला अन्याय आता अती झाला आहे विदर्भाचे शेतकरी व आदिवासी यांनी वाचविण्यासाठी वेगळा विदर्भ हाच मुक्तीचा मार्ग आहे व रक्तपात न होता तात्काळ देणे हाच मागील निवडणुकीचा निरोप आहे जसा भाजपला समजला तसा शिवसेनेला का समजत नाही असा सवालही तिवारी विचारला आहे . 


झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगडच्या रांगेत विदर्भाला नेऊन ठेवू नका व विदर्भाची भाषा अखंड महाराष्ट्राच्या केशरी दुधात मिठाचा खडा हे  शिवसेनेनं विधान विदर्भाच्या जनतेचा उपमान असुन शिवसेने विदर्भ विरोधी भुमिका निवडणुकीचा प्रमुख मुद्दा केला होता यामुळेच अनेक हाडाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवार दारूण पराभवाला समोर गेले हे सत्य उद्धवजिना कोण  सांगणार असा सवालही तिवारी यांनी केला आहे. 
मागील ६० वर्षात विकासाचे असमतोलामुळे व मराठी माणसाचे वाढलेली जनसंख्या व  प्रशासनिक समस्यांचा डोंगर , प्रादेशिक प्रश्नांचा महापूर यामुळे आता एक नाही कमीतकमी तीन मराठी राज्याची गरज आहे मात्र भाषेच्या नावावर आपल्याच मराठी माणसाच्या कुपोषणाचे बळी व शेकऱ्यांच्या आत्महत्यांचे पिक व लोखो काम मागणारे मराठी हात का दिसत नाही असा सवालही तिवारी यांनी केला आहे . ज्या मराठी माणसाच्या अस्तिवाचा ठेका घेतल्याचा दावा करतांना त्या मराठी जनतेला का विचारत नाहीत व त्यांचा जनादेश केंव्हा मानणार असा सवालही तिवारी यांनी केला आहे . 


No comments:

Post a Comment