Saturday, 29 November 2014

दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यात २४ तासात आणखी १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -आता स्वत:च ता रचून शेतक-री करू लागले आत्महत्या

दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यात २४ तासात आणखी १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -आता स्वत:च ता रचून शेतक-री करू लागले  आत्महत्या

३० नोहेंबर २०१४

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात मागील २४ तासात सरकारी व सामाजिक मदतीची आस संपलेले आणखी १३ कर्जबाजारी व उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आल्या 

त्यातच नापिकीमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देणे अवघड झाल्याने एका अल्पभूधारक वृद्ध शेतकर्‍याने स्वत: चिता रचून जाळून घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना अकोला बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी घडली असुन ज्या १३ शेतकऱ्यांनी विदर्भ मराठवाड्यात आत्महत्या केल्याचे वृत्त प्रकाशित त्यामध्ये 

विदर्भात 

१. चिता रचुन आत्महत्या करणारे . काशिराम भगवान इंदोरे (७५) बाळापुर अकोला 

२. सुरेश गुगल विजासन -चंद्रपूर 
३. विनोद मळीक वाढोणा -अमरावती 
४. किसान शनवारे धामणी -अमरावती 
५. राजु राठोड  कारखेडा -वाशीम 
६- रामकृष्ण गावंडे - किह्नी -बुलठाणा 
७. दिगाबर निम्बुकार -बेलोरा -अकोला 
मराठवाडा -खानदेश 
८. दत्ता मनचीकट्टे -पारडी -नांदेड 
९- मारोती सोनटक्के -पिम्प्रण -नांदेड 
१०. सुखदेव सोनंवाने -पातोंडा -जळगाव 
११. कनैया अंभोरे -ताडऴस -परभणी 
१२. संग्राम  बेम्बले -नांदगाव -लातुर 
१३-प्रकाश लहाने -भारडी -जालना 

आता स्वत:च ता रचून शेतक-री करू लागले  आत्महत्या

 
मनारखेड येथील काशिराम इंदोरे यांच्याकडे चार एकर शेती असून, त्यांना चार मुले आहेत. 
 काशीराम यांनी यावर्षी सोयाबीन व तूर पेरली होती. निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे सोयाबीन झाले नाही. तूर पिकावरही रोगराईचे सावट असल्यामुळे त्याचीही शाश्‍वती नाही. पीक होईल, या आशेवर उदरनिर्वाहासाठी उधार उसनवारी म्हणून घेतलेली रक्कम कशी फेडावी, या विवंचनेत काशिराम होते. शुक्रवारी दुपारी ते शेतात गेले. तेथे काम केल्यानंतर तोडलेली लाकडे व्यवस्थित रचली. ती पेटवून दिल्यानंतर ते चितेवर जाऊन झोपले. यात त्यांचा कोळसा झाला. सायंकाळ झाल्यानंतरही काशिराम घरी न परतल्यामुळे शोधाशोध केली असता, शेतातील प्रकार पाहून सर्वांना धक्काच बसला. एका स्वाभिमानी शेतकर्‍याची अशी अखेर झालेली पाहून नियतीही ओशाळली असणार एवढे मात्र नक्की.

महाराष्ट्र सरकारने २५ नोव्हेंबरला शासकीय परिपत्रक काढून महाराष्ट्रातील सुमार २0 हजार गावात दुष्काळ जाहीर केलेल्या  पश्‍चित विदर्भातील सुमारे १0 हजार खेड्यात दुष्काळ घोषित करून  सरकारने या दुष्काळग्रस्तांसाठी जे सवलतीचे पॅकेज दिले आहे ते उंटाच्या तोंडात जिरा टाकण्यासारखे असून पश्‍चित विदर्भातील दुष्काळ व नैराश्यग्रस्त २0 लाख शेतकर्‍यांची सरकारने अधिकृतकबुली यावर्षीचे कृषी संकट अभुतपूर्व असल्याची केली असून नोव्हेंबर महिन्यातच सार्‍या प्रमुख नद्या, नाले व विहीरी आटल्या असून मार्च महिन्यापर्यंत पाणी, अन्न, चारा, ग्रामीण रोजगार या समस्यांचा डोंगराळ निर्माण होणार असून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील अभूतपूर्व कृषी संकट राष्ट्रीय विपदा घोषित करून महाराष्ट्रातील दुष्काग्रस्तांना कमीत कमी ६0 हजार कोटीची तत्काळ दिलासा रक्कम उपलब्ध करावी व भविष्यासाठी या दुष्काळातून पुढील वर्षी सामना करण्यासाठी शेतकर्‍यांचा सहभाग असणारी भ्रष्टाचारमुक्त अधिकारी व संस्था विरहित योजना राबवावी अशी मागणी यावेळी रेटून धरली . 
 यावेळी महाराष्ट्र सरकारला विदर्भ जनआंदोलन समिती कडून सादर करण्यात आलेल्या  मागण्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान. संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पिककर्ज देण्याची योजना. सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू करणे. सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १00 दिवस प्रति एकरी अनुदान. सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेत मजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान. दुष्काळग्रस्त पश्‍चित विदर्भातील जिल्ह्यात येत्या एका वर्षाकरिता देशी, विदेशी, गावठी दारू, वरलीमटका व जुगारांना बंदी करावी यांचा समावेश आहे अशी यावेळी  अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे .  . 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रासमोर किशोर तिवारी यांनी वाचला प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा व शेतकऱ्यांच्या वेदनांचा पाढा:तात्काळ मदतीसाठी टाकले साकडे


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रासमोर किशोर तिवारी यांनी वाचला प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा   व शेतकऱ्यांच्या वेदनांचा पाढा:तात्काळ मदतीसाठी टाकले साकडे 
दिनांक -२९/११/२०१४
अमरावती येथे २८ तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीनी सर्व सनदी अधिकारी व आमदार खासदार यांचे सोबत विदर्भाचे अभुतपुर्व कृषी संकट व शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी बोलावलेल्या आढावा बैठकीत विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी २००४ पासुन सुरु  असलेली शेतकऱ्यांची सडेलोट व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येणाऱ्या हजोरो कोटीच्या पकेज मधील झालेल्या व होत  असलेल्या प्रचंड अनियंत्रित भ्रष्टाचाराचा पाडा वाचल्याने प्रचंड गाजली असुन मागील १० वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वर उपाययोजना करणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ संपुर्ण चौकशी करून हकालपट्टी करणाच्या मागणीने भ्रष्टअधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे . 
मुख्यमंत्रीनी २८ तारखेला किशोर तिवारी यांना संध्याकाळी ६ ते ६.३० वेळ देऊन वीषेय चर्चेसाठी आमंत्रित केले होते मात्र ऐनवेळी मुख्यमंत्रीनी आपण आपले निवेदन सर्वासमक्ष करण्यासाठी निर्देशित केल्यानंतर तिवारी यांनी सरकारची मदत व कृषीखात्यासह महसुल खात्यामध्ये सुरु असलेली लुट मांडली व  महाराष्ट्र सरकारने २५ नोव्हेंबरला शासकीय परिपत्रक काढून महाराष्ट्रातील सुमार २0 हजार गावात दुष्काळ जाहीर केलेल्या  पश्‍चित विदर्भातील सुमारे १0 हजार खेड्यात दुष्काळ घोषित करून  सरकारने या दुष्काळग्रस्तांसाठी जे सवलतीचे पॅकेज दिले आहे ते उंटाच्या तोंडात जिरा टाकण्यासारखे असून पश्‍चित विदर्भातील दुष्काळ व नैराश्यग्रस्त २0 लाख शेतकर्‍यांची सरकारने अधिकृत
कबुली यावर्षीचे कृषी संकट अभुतपूर्व असल्याची केली असून नोव्हेंबर महिन्यातच सार्‍या प्रमुख नद्या, नाले व विहीरी आटल्या असून मार्च महिन्यापर्यंत पाणी, अन्न, चारा, ग्रामीण रोजगार या समस्यांचा डोंगराळ निर्माण होणार असून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील अभूतपूर्व कृषी संकट राष्ट्रीय विपदा घोषित करून महाराष्ट्रातील दुष्काग्रस्तांना कमीत कमी ६0 हजार कोटीची तत्काळ दिलासा रक्कम उपलब्ध करावी व भविष्यासाठी या दुष्काळातून पुढील वर्षी सामना करण्यासाठी शेतकर्‍यांचा सहभाग असणारी भ्रष्टाचारमुक्त अधिकारी व संस्था विरहित योजना राबवावी अशी मागणी यावेळी रेटून धरली . 
 यावेळी महाराष्ट्र सरकारला विदर्भ जनआंदोलन समिती कडून सादर करण्यात आलेल्या  मागण्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान. संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पिककर्ज देण्याची योजना. सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू करणे. सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १00 दिवस प्रति एकरी अनुदान. सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेत मजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान. दुष्काळग्रस्त पश्‍चित विदर्भातील जिल्ह्यात येत्या एका वर्षाकरिता देशी, विदेशी, गावठी दारू, वरलीमटका व जुगारांना बंदी करावी यांचा समावेश आहे . यावेळी  अध्यक्ष किशोर तिवारी यांचे सोबत  समितीचे सचिव मोहन जाधव, अंकीत नैताम, नितीन कांबळे, प्रेम चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते. आता मुख्यमंत्री काय पाऊले उचलतात याकळे सर्वांचे लक्ष लागले आहे . 

Tuesday, 25 November 2014

पीककर्ज, कापसाला बोनस व वीज बिल माफी नाही -मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ


पीककर्ज, कापसाला बोनस व वीज बिल माफी  नाही -मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ
 
यवतमाळ भेटीत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना जिल्हा पोलिसमार्फ त सर्किट हाउसला ताटकळत ठेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना न भेटताच निघून गेल्याने व राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 'सरकारची तिजोरी खाली आहे पीककर्ज, कापसाला बोनस व वीज बिल माफी देता येत नाही मोबाइलवरचे बोलणे थांबू नये, म्हणून तुम्ही दरमहा मोबाइल बिल भरताच ना! मग वीज बिल नियमित का भरत नाही', अशा शब्दांत यांनी रविवारी अकोला येथील दुष्काळी आढ
ावा कार्यक्रमात शेतकर्‍यांनाच उपदेश दिल्याने विदर्भाचे दुष्काळग्रस्त शेतकरी व्यथित झाले असून,
शेतकरी अभूतपूर्व संकटात असताना त्यांच्या अडचणी ऐकण्यास वेळ नसणे तर त्यांना दिलासा न देता मस्तवालपणा दाखविणे हा तर शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असुन आम्ही भाजप सरकारला येत्या हिवाळी अधिवेशनात शेकडो शेतकरी विधवांच्या हातांनी मिठाचे पोत देऊन आपला त्रागा प्रगट करणार अशा तीव्र शब्दात शेतकर्‍यांना मदतीच्या उशिरावर शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व महसूल मंत्री वागण्यावर व्यक्त केली आहे. या पूर्वी जेव्हा जेव्हा भारताचे महामहीम राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्री यांनी यवतमाळ शहराला भेट दिली त्यांनी वेळात वेळ काढून शेतकरी विधवा व शेतकर्‍यांना वेळ दिला, आस्थेने विचारपूस केली. पण ज्या यवतमाळ जिल्यात भारतात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी आत्महत्यांचा मुद्दा रेटून केंद्रात व राज्यात सत्ता काबीज केली ते सरकार पदारुढ होताच आपल्या जाहीरनाम्यानुसार पीककर्ज, बीज बिलमाफी देणार, लागवड खर्च अधिक ५0% नफा असा कापसाचा व सोयाबीनचा हमीभाव तात्काळ देणार, अशी आशा सर्व विदर्भ मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतकर्‍यांना होती मात्र मागील सहा महिन्यात भारताच्या मोदी सरकारने ह्या मागण्या विचारातच घेतल्या नाहीत तर आता १५ वर्षानंतर सत्तेवर आलेल्या राज्याच्या भाजप सरकारने चक्क हातच वर केल्यामुळे शेतकरी विश्‍वासघात झाल्याचा अनुभव घेत आहेत
व यामुळेच मोठय़ा प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन शेतकरी वाचवा व या कोरडवाहू शेतकर्‍यांना मदतीचा हात द्या, अशी विनंती करून खालील मागण्या सादर केल्या आहेत.
कोरडवाहू शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या 
सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रती हेक्टरी वीस हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई वा मदत देणे. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या सात-बारा कोरा करणे. कोरडवाहू शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १00 दिवसाची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे. कापूस -सोयाबीन, धानासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी प्रमाणे लागवड खर्च अधिक ५0 % नफा असा हमीभाव द्या. सर्व आदिवासींना तात्काळ अन्न सुरक्षा व खावटी देणे. दुष्काळग्रस्त आदिवासी शेतकर्‍यांच्याना व शेतमजुरांना सरसकट अंत्योदय योजने नुसार अन्न सुरक्षा व खावटी वाटप करा. 
आरोग्य सेवा - सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्याना व शेतमजुरांना २0१३च्या यादीनुसार बीपीएलचे कार्ड देऊन मोफत वैद्यकिय सेवा सर्व दवाखान्यात मोफत देणे. सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्याना व शेतमजुरांना, वृद्धाना व विधवा मासिक अनुदान - सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना शेतकरी विधवा, परितक्त्या महिलांना दरमहा कमीत कमी १000 रुपये मासीक अनुदान व सरकारी नोकर सारखेच. प्रत्येक महिन्याला १ तारखेला बँकेतून देण्याची योजना द्या, अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली मात्र सरकार या मागण्यावर गंभीर नसुन शेतकर्‍यांशी चर्चा करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे 
===========

Friday, 21 November 2014

साता समुद्रापडीकलच्या ' मराठी माणसाने ' दिला विदर्भाच्या शेकडो शेतकरी विधवांना मदतीचा आधार

साता समुद्रापडीकलच्या ' मराठी माणसाने ' दिला विदर्भाच्या शेकडो शेतकरी विधवांना मदतीचा आधार 

दिनांक-२२  /११/ २०१४

इंग्लंडच्या एका  क्रमांकाच्या  विटामिन तयार करणाऱ्या व जगात भारतासह ११० देशात  औषधी निर्माण करणाऱ्या  समुहाच्या ( http://vitabiotics.com/ )  आपल्या अथक परिश्रमाने अवघ्या २८ वर्षी  संचालक होणाऱ्या मुंबई मराठी  युवकाने विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व शेतकरी विधवांची व मुलांची होत असलेली सतत उपेक्षा  यांच्या बातम्यांनी  विचलित होऊन  दहा हजारावर किलोमीटरचा साता समुद्राचा  प्रवास करून शेतकरी आत्महत्यानी  भारताचे कृषी संकटाचे  इपीसेंटर  झालेल्या यवतमाळ जिल्यातील पांढरकवडा येथे येउन शेकडो विधवांना  भेटून तर मंगी कोलम पोडासारख्या दुर्गम ठिकाणी भेट देऊन मदतीचा आधार दिला व भविष्यात सर्व अडचणीत सोबत राहण्याचे अभिवचन सुद्धा दिले . 

http://grandmaratha.org/vidarbha-farmers-empowerment-project-2014-farm-widows-meet-at-nagpur-on-4th-november-2014/

हा मायेचा हात या वंचित शेतकरी विधवांना व त्यांच्या मुलांना नुकताच पांढरकवडा येथील सुराणा भवनात मुबईच्या ग्रन्ड मराठा फोंडेशन (http://grandmaratha.org/) या  धर्मदाय संस्था व विदर्भ जनांदोलन समितीने  आयोजीत  कार्यक्रमात  अनुभवास मिळाला  कारण मुळचे मुंबईचे मात्र सध्या इंग्लंडचे नागरिक असलेले  जगाच्या ख्यातनाम विटामिन तयार करणाऱ्या  विटाबिओटिक   कंपनीचे  संचालक  रोहित शेलाटकर यांनी जानेवारी २०१४ मध्ये शेतकरी नेते किशोर तिवारी यांना  विटाबिओटिक  कंपनीचे प्रमुख करतारजी लालवाणी यांची  भेट  करून आम्हाला विदर्भाच्या शेतकरी विधवांना व गरजू शेतकरी मुलांना शिक्षणासाठी भरीव मदत करण्याचा मानस बोलुन दाखविला तेंव्हा  रोहित शेलाटकर यांनी पुढाकार घेऊन ग्रन्ड मराठा फोंडेशन हि  धर्मदाय संस्था तयार करून स्वता सरळ संपर्क करून मदत करण्याचा  कार्यक्रम निश्चित करण्यात आला मात्र  भारताच्या लालफितशाहीमुळे  ग्रन्ड मराठा फोंडेशनची नोंदणी होण्यास विलंब झाला शेवटी रोहित शेलाटकर या महिन्यात दहा हजारावर किलोमीटरचा साता समुद्राचा  प्रवास करून नागपूरमार्गे पांढरकवडा गाठले व  सुमारे १०३ शेतकरी विधवा व त्यांच्या मुलांशी चर्चा केली व ग्रन्ड मराठा फोंडेशन मार्फत पाच लाखाची मदत शेतकरी विधवांना व गरजू शेतकरी मुलांना शिक्षणासाठी दिली तर विधवांच्या आपल्या पायावर उभे राहता यावे  आपल्या कंपनीचा एक  कारखाना जर जागा व शासकीय अडचणी दूर झाल्या ताबडतोब सुरु करण्याच्या मानस जाहीर केला . 
यावेळी आयोजित मिलन सोहळ्यात विदर्भ शेतकरी विधवा संघटणेतर्फे   रोहित शेलाटकर यांना ''विदर्भ शेतकरी मित्र '' हा सन्मानही देण्यात आला . विदर्भ शेतकरी विधवा संघटणेच्या बेबीताई बैस ,अपर्णा मालीकर ,नंदा भंडारे ,भारती पवार ,रेखा गुरनुले ,उषा आष्टेकर ,प्रफ़ुल राठोड , सुरेखा चव्हाण , रमा ठमके , व वंदना मोहुर्ले व अर्चना राउत  यांनी आपले विचार मांडले . 

यावेळी १४ शेतकरी विधवांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी तर २० मुला मुलींना  शालेय शिक्षणासाठी मदत देण्यात आली , ओपन विद्यापिठात  पदवी घेणाऱ्या ६ शेतकरी विधवांना  शिक्षणाचा संपूर्ण खर्च देण्यात आला तर ६० शेतकरी विधवांना शेतीसाठी आर्थिक मदत देण्यात आली व पुढील वर्षी शिक्षणासाठी मदत ग्रन्ड मराठा फोंडेशन करणार मात्र मदतीचा वापर माझे सारखे यश संपादणासाठी  करा कारण मी सुद्धा बोरिवलीच्या चाकरमान्या सामान्य कुटुंबाचा मुलगा असुन लंडन येथे हॉटेलमध्ये प्लेट धुवुन व वेटरची  नौकरी करून या पदावर आल्याची आठवण वारंवार या  शेतकरी मुला -मुलींना व विधवांना त्यांनी करून दिली . एका मुंबईची नाड असणाऱ्या मराठी माणसाने विदर्भाच्या यात कोपऱ्यात व कोलाम पोडाच्या प्रवास करून मदतीचा आधार  दयावा हि एक  या शेतकरी विधवांना सतत  मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या नेत्यांना व अधिकाऱ्यांना शरमेची बाब असे परखड मत यावेळी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मांडले . 
यावेळी  शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते मोहन जाधव ,शेखर जोशी ,भीमराव नैताम ,सुरेश बोलेनवार ,अंकित नैताम ,नितीन कांबळे , मनोज मेश्राम ,प्रीतम ठाकुर ,नंदकिशोर जैस्वाल ,  मुरली वाघाडे ,   बंटी जुवारे  ,दीपक जाजुलवर यांनी आपले विचार मांडले  . 


Sunday, 16 November 2014

सी सीआय व पणन महासंघाची हमीभावापेक्षा कमी भावाने कापुस खरेदीने शेतकऱ्यांची निराशा : सोयाबीन व कापसाच्या अभूतपूर्व नापिकीवर प्रती हेक्टरी मदत व संपूर्ण कर्ज माफी हाच तोडगा-किशोर तिवारी


सी सीआय व  पणन महासंघाची हमीभावापेक्षा कमी भावाने  कापुस खरेदीने शेतकऱ्यांची निराशा : सोयाबीन व कापसाच्या अभूतपूर्व नापिकीवर  प्रती हेक्टरी मदत व संपूर्ण कर्ज माफी  हाच तोडगा-किशोर तिवारी  
  
दिनांक १७ नोहेंबर २०१४
अनेक अडचणीनंतर १५ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या च्या कापूस खरेदीच्या मुहूर्तालाच कापसाची आर्द्रता १२ टक्याच्यावर नसावा व  कापसाचे दर एलआरए ५१६६ जातीला ३८५० रुपये, एच ४, एच६ जातीला ३९५० तर बन्नी, ब्रम्हा जातीला ४०५० रु. इतका भाव केंद्र शासनाने जाहिर केल्याप्रमाणे येत असून सक्तीची ४ % कट्टी सुधा सुरु  केल्यामुळे शेतकऱ्यांची पार निराशा झाली असुन यापेक्षा तात्काळ चुकारा देत व्यापारीच जास्त भाव देत होते आतातर व्यापारी उभ्याने लुट सुरु करतील कारण महाराष्ट्रात ३४५ खरेदीकेन्द्रा पैकी पणन महासंघाने सी सी आय सोबत करार करून जेमतेम फक्त २७ केंद्रावर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. दुसऱ्या तिसऱ्या टप्यात आणखी ७३ केंद्र उघडणे प्रस्तावित आहे व  कापसाची खरेदी शासनाच्या एफएक्यू नॉर्म्स प्रमाणे राहणार आहे यामुळे सरकारने शेतकर्याना वाऱ्यावर सोडले असून लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा मोदींचा हमीभावाची निवडणुकीची खैरात आता हवेतच विरणार हे निश्चित झाले असुन महाराष्ट्रातील कापुस ,सोयाबीन व तुरी उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ६० लाख हेक्टरमध्ये झालेल्या अभूतपूर्व नापिकीमुळे  कमीत कमी रू २० हजार कोटीचे झालेले नुकसान व या  संकटातून  बाहेर काढण्यासाठी सरकारने  कमीतकमी हेक्टरी रु २० हजार मदत ,कोरडवाहू दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना  संपूर्ण कर्जमाफी  तसेच या शेतकऱ्यांना पुढील एक वर्ष अंत्योदय अन्न सुरक्षा , वीज बिल माफी , मुलांची संपूर्ण फी माफी , आजाराजा खर्ज , राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेमधुन शेतकऱ्यांना सरसकट २०० दिवसाच्या मजुरीचे अनुदान देण्यात यावे असा प्रस्ताव सरकारला विदर्भ जनांदोलन समितीने दिला असुन यासाठी मुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस यांना आपण आग्रह धरला असल्याची माहिती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली . 

मुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार हातात घेतल्यानंतर विदर्भात ३० तर मराठवाड्यात ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती माध्यमांनी समोर आणली मात्र या गंभीर विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी  चर्चा करण्यासाठी दिनाक २९ नोहेबरचा  मुहूर्त काढला असून मागील १५ वर्षापासून शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात ६० हजारावर आत्महत्या पाहणारे प्रधान सचिव सुधीर गोयल यांच्या मार्गदर्शनात  काय तोडगा काढणार  आता सारे भाजपवासी पाशा पटेल सारखे शेतकऱ्यांचे कैवारी  चूप कां असा सवालही ,किशोर तिवारी यांनी केला आहे . 
मागील लोकसभा  निवडणुकीमध्ये  सातबारा कोरा करून कापसाला लागवड खर्ज अधिक ५०% नफा असा मोदींचा हमीभावाची  हमी घेणारे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात गेले तर गोपीनाथ मुंडेजी देवाघरी गेले आज पंतप्रधान मोदिजी सतत विदेशात व  आमचे नेते नितीनजी  गडकरी युरोपात  व विदर्भाच्या सर्व आशा असलेला देवेंद्र फडणवीस सत्कारात ,आम्ही शेतकऱ्यांनी काय आत्महत्याच कराव्या कारण मागल्या सरकारचे कृषी धोरणच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडतात असा सतत ओरड करणारे नेतेच  तेच धोरण सरकार बदलुन रेटत असतील शेतकऱ्यांचे मरण निश्चत आहे कारण मागच्या सरकारचे कापसाचे हमीभाव सरकारने कायम ठेवले ,पिक कर्ज पत देण्याचे धोरण मागील सरकारचे कायम ठेवण्यात आले ,शेतकऱ्यांना लुटणारा  जागतीक बाजार व खुली अर्थ प्रणाली अधिक जोमाने रेटण्यात सुरुवात मागील सहा महिन्यात झाली आहे यामुळे सारी कृषी व ग्रामीण जनता विचारात पडली आहे मात्र स्वदेशीचा नावाचा गजर करणारे या सरकारला शेतकरी विरोधी धोरणे बदलण्यासाठी कोणत्या मुहूर्तावर बोलणार असा सवाल तिवारी यांनी केला आहे . 


Monday, 10 November 2014

विदर्भात एकाच दिवशी पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या :सरकारच्या संवेदनाहीनतेमुळे शेतकरी आले मेटाकुटीस

विदर्भात एकाच दिवशी पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या :सरकारच्या  संवेदनाहीनतेमुळे शेतकरी आले मेटाकुटीस

दिनांक -११ /११/२०१४

 विदर्भात  आलेले कृषीसंकट  दिवसेन दिवस अधिकच गंभीर होत असून आज एकाच दिवशी ५ कर्जबाजरी  उपासमारीला तोंड देत असलेले  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या यातील यवतमाळ जिल्यातील लोणीचे सखाराम रामटेके ,लाखीनाचे प्रवीण गोहणे व वरुडभक्तचे   शामरावजी  सिंगल्दुरे तर अमरावती जिल्याचे विठ्ठल आडवू तर गोंदिया जिल्याच्या खोकरी गावचे चंदुभाऊ  निबासरे यांनी यावर्षी झालेल्या नापिकीनंतर पिकाला मातीमोल भावात विकल्यानंतर  आता सरकारच्या मदतीची आस संपल्यावर आपली जीवनयात्रा संपविली असल्याची माहिती विदर्भ जनांदोलन समितीची नेते किशोर तिवारी यांनी दिली 

विदर्भ ३०लाख हेक्टर मध्ये कापुस ,सोयाबीन ,धान व तुरीची पिक पूर्णपणे बुडाले असून मात्र अधिकारी सरकारला या अभूतपूर्व संकटाची जाणीवच करून देत नसून दररोज कमीत कमीत पाच शेतकरी विदर्भ व मराठवाड्यात मागील दोन महिन्यापासून आत्महत्या करीत मात्र सारे लोकनेते सत्तेचा नंगा नाज  करीत असुन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असा आरोपही तिवारी यांनी केला आहे. 

 काँग्रेस आघाडीकडून निराशा पदरी पडलेल्या सर्व स्तरावरील मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मोठय़ा आशेने भरभरून मते टाकली,बहुप्रतीक्षेनंतर केंद्रात भाजपाची सत्ता आली भाजपाच्या यशात शेतकर्‍यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु अवघ्या अल्प कालावधीतच जगाचा पोशिंदा केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने निराश झाला आणि हेच का 'अच्छे दिन', म्हणून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करताना दिसून येत आहेत .आम्ही भाजपला मतदान करा कापसाचा व सोयाबीन हमीभाव वाढणार ,सातबारा कोरा होणार अशी ओरड केली होती मात्र यावर भारत सरकार व राज्य सरकार काहीच बोलत नसल्यामुळे शेतकरी आम्हाला समोरून जाब विचारत आहेत कारण त्यांना भाजप -शिवसेनेचा कोणताही नेता दिसत नाही हि  वेदनेची बाब आहे कारण नव्या केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. नेहमीच नव्या आशेवर जगणार्‍या शेतकर्‍यांचे जीवन निराशमय झाले आहे मात्र यांची हाक कोण ऐकणार असा सवालही तिवारी यांनी केला आहे .
पूर्वी केंद्रात अन् राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्षातील भाजपाचे नेते आंदोलनाच्या माध्यमातून तत्कालीन सरकारवर आसूड ओढायचे. जणू आम्हीच शेतकर्‍यांचे खरे कैवारी आहोत, असे ते दाखवायचे. मात्र केंद्रात सत्ता स्थापन होताच शेतकर्‍यांच्या प्रश्नावर, परिस्थितीवर साध्या प्रतिक्रियादेखील प्रसार माध्यमांसमोर व्यक्त करून शेतकर्‍यांना दिलासा देताना आता ते दिसत नाही. मोठय़ा अपेक्षेने मोदी सरकारकडे पाहणार्‍या शेतकर्‍यांची घोर निराशा झाल्याचे चित्र शेतकर्‍यांत दिसून येत आहे.
चालू हंगामात उशीरा सुरू झालेल्या आणि अपुर्‍या पावसामुळे खरीप उत्पादनात लक्षणीय घट येत आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे रबी हंगामही पूर्णपणे धोक्यात सापडला आहे. सोयाबीन, कापूस या खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्यानंतर रबी पिकांना पोषक वातावरण नसल्यामुळे रबी उत्पादनातही घट येण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षीपेक्षा उत्पादनात घट होऊनही मात्र शेतमालाच्या भावात ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे. महासंघाने कापूस खरेदी सुरू न केल्यामुळे व्यापारी शेतकर्‍यांच्या अडचणीचा लाभ घेत हमी भावापेक्षा कमी भावात सर्व शेतमालाची खरेदी करी
शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखाण्यासाठी  कापसाला सहा हजार रुपये भाव द्या, नापिकीग्रस्तांना मदत,  सर्व कोरडवाहू दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचे पीककर्ज आणि वीज बिल माफ, ह्या मागण्या सरकारने तात्काळ मंजूर कराव्या अशी विनंती   तिवारी यांनी केली  आहे.


Thursday, 6 November 2014

विदर्भात ४८ तासात आणखी ६ नापिकीग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या : मुख्यमंत्रांनी तात्काळ मदत घोषीत करावी -किशोर तिवारी

 विदर्भात ४८ तासात आणखी ६ नापिकीग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या : मुख्यमंत्रांनी  तात्काळ मदत घोषीत करावी -किशोर तिवारी
६ नोव्हेंबर २०१४
एकीकडे विदर्भाच्या शहरात नवनियुक्त आमदारांचे मोठ्या धामधुमीत सत्कार होत आहेत त्याच वेळी ग्रामीण विदर्भात नापिकी व उपासमारीला तोंड देत असलेले आपली जीवनयात्रा आत्महत्या  करून संपवीत आहेत मात्र या गंभीर विषयावर अधिकारी बघ्याची भूमिका घेत झोपा काढत आहेत कारण मागील ४८ तासात पश्चिम विदर्भात आणखी सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे घटना समोर आल्या आहेत यात यवतमाळ जिल्यात तळणी येथील वामन राठोड ,फुलसावन्गीचे विनोद राठोड ,ब्राह्मणगाव (शामपूर )चे बंडू झिंगापवार  तर वाशीम जिल्यात मनोरा येथे साठीश राठोड ,मालेगाव येथील भगवान जगनाडे तर चांदूरबाजार येथील देविदास  सुर्जोशी यांचा समावेश आहे ,यामुळे यावर्षी विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा आकडा आता ९४२ वर गेला असुन ,विदर्भाच्या शेतकऱ्यांना वाचविण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पाऊले उचलावी अशी विनंती विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. 

'आपण शेतकऱ्यांची होत असलेली उपासमार व प्रचंड नापिकी बद्दल मुख्यमंत्री यांना कल्पना दिली असून शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत त्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेसी यांचेशी चर्चा केली असुन तात्काळ मदत घोषित करण्याची  विनंती केली आहे मात्र मुख्यमंत्री इतर कामात गुंतले असल्यामुळे यावर तोडगा निघण्यास विलंब होत आहे व विदर्भ --मराठवाडा मध्ये नापिकीग्रस्त शेतकरी दररोज ३-४ शेतकरी मागील दोन महिन्यापासून आत्महत्या करीत हि शोकांतिका आहे जे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा बाजार करून सत्तेत आलेत त्यांनी लवकरात लवकर या कृषी संकटावर लक्ष द्यावे अशी मागणी सुधा तिवारी यांनी केली आहे . 
या वर्षी संपूर्ण विदर्भात ३० लाख हेक्टर मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्याने शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात  झाली आहे. शेतकऱ्याचा सोयाबीन वर जर  खर्च अडीच हजार असताना उत्पन्न मात्र दोन हजार रुपयांचे होत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. येरव्ही सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरणी केल्यानंतर आठ ते दहा क्विंटल होणारे उत्पन्न आता केवळ ८० किलोवर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा सुरूवातीलाच पावसाने दडी मारली. त्यानंतर सुरळीत पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली मात्र पुन्हा पावसाने दगा दिल्यानंतर अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उशिरा पेरणी झाल्याने आणि वातावरणातील बदलाने उत्पन्नात कमालीची घट झाली. एरव्ही३० किलो सोयाबीन बियाण्याची लागवण केली की त्यापासून आठ ते दहा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न व्हायचे. मात्र यावर्षी ३० किलोला ८० किलो अशी सोयाबीनची उतारी आहे. त्यातच सोयाबीन काढणीचा खर्च प्रती बॅग १ हजार ५००रुपये झाला आहे. मशीन आणि ट्रॅक्टरचा खर्च एक हजार रुपये असा २ हजार ५०० रुपये खर्च आहे. याव्यतिरिक्त लागवण आणि मजूरीचा खर्च वेगळा असे असताना काढणीचाच खर्च २ हजार ५०० रुपये उत्पन्न मात्र २ हजार रुपये अशी परिस्थिती तालुक्यात सर्वदूर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेकांनी सोयाबीनची ही उतारी पाहून त्यामध्ये जनावरे सोडणेच पसंत केले आहे मात्र अधिकारी सरकारला अंधारात ठेवत आहेत ,असा आरोप तिवारी यांनी केला आहे . 
दिवाळी हा सण सर्वांसाठीच महत्वाचा. तीन दिवसांवर हा सण येऊन ठेपला असताना पैशाची तजवीज करण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. नातेवाईक, आप्तेष्ट, सावकारांचे कर्जासाठी उंबरठे झिजविले जात आहे. असे असताना प्रशासनाकडून या गंभीर परिस्थितीची कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. वास्तविक सोयाबीन पिकाचा आतापर्यंत सर्वे व्हायला हवा होता. तसेच शेतकर्‍यांना फुल ना फुलाची पाकळी अशी आर्थिक मदत करून त्यांना दिवाळी सणापूर्वी दिलासा द्यायला हवा होता. 
विदर्भाचे नगदी पिक  कपाशीचे उत्पन्न पाण्याअभावी जाऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकर्‍यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत असून, २० लाख हेक्टर मध्ये कापसाची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. कपाशीचे उत्पन आता एकरी एक ते दोन किंटळचा होणार नाही त्यातच कापसाचा बाजार भाव हमीभावापेक्षा कमी झाला आहे सरकारने तात्काळ कापुस उत्पादक   शेतकऱ्यांची मदत करावी अशी मागणी तिवारी यांनी पुन्हा केली आहे .
निसर्गाच्या लहरीपणासोबतच वीज वितरणाचा मनमानी कारभारही शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. सध्या कृषी फिडरवर २२ तासाचे भारनियमन होत आहे. केवळ दोन तास वीज उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे,मात्र शेतकऱ्यांचा . कोणीच वाली दिसत नाही अशा अडचणीत शेतकर्याना फक्त देवच वाचवू शकतो कारण सर्वच नेते शेतकऱ्यांच्या कबरीवर बसून सत्ता काबीज करण्याचा प्रयन्त करीत आहेत याला आता शेतकऱ्यांनीच उत्तर देणे गरजेचे आहे मात्र शेतकरी जाती राजकारणात आंधळा झाल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली .

Wednesday, 5 November 2014

वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाताचे विदर्भ जनांदोलन समिती कडून स्वागत :शिवसेनेने विदर्भाच्या जनतेच्या भावनाचा आदर करावा


वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाताचे विदर्भ जनांदोलन समिती कडून स्वागत :शिवसेनेने  विदर्भाच्या जनतेच्या भावनाचा आदर करावा 

नागपूर -५/ ११/ २०१४
छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी भाजपाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ही आमची तात्विक भूमिका आहे. महाराष्ट्रात आमची सत्ता आली असली तरी आम्ही त्यावर अजूनही कायम आहोत. वेगळ्या विदर्भाची निर्मिती कधी करायची, याचा निर्णय केंद्रातील श्रेष्ठी करतील. ती कधी होईल, तरी राज्याच्या निर्मितीची पद्धत मात्र स्पष्ट आहे. तेलंगणा नव्हे तर छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड या राज्यांच्या धर्तीवर विदर्भ राज्य तयार होईल. महाराष्ट्र अन् विदर्भ या दोन्ही राज्यांचा विकास झाला पाहिजे यावर भर देण्यात येईल, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भाबाबत केलेल्या घोषणेचे विदर्भ राज्य  निर्मितीसाठी भाजपला पाठींबा देणाऱ्या विदर्भ जनांदोलन समितीने स्वागत केले असुन ,शिवसेने अखंड महाराष्ट्रासाठी मतदान मागितल्यानंतर  मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी माणसाने त्यांना या मुद्यावर नाकरल्यानंतर  उद्धवजीने  विदर्भाच्या जनतेच्या भावनाचा आदर करावा व विदर्भ राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती शिवसेना प्रमुख्यांचे जवळचे मित्र व वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर दुरावलेले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे . 
आज सामना मध्ये देवेंद्र फडणवीस यांना  विदर्भ राज्य निर्माण करणाच्या भाषा म्हणजे महाराष्ट्रापासून विदर्भास तोडणे म्हणजे आईपासून मुलास तोडण्यासारखे आहे व  विदर्भातील मुख्यमंत्र्याने महाराष्ट्र तोडण्याची भाषा करावी म्हणजे महाराष्ट्राच्या रखवालदारानेच 'घोटाळा' करण्यासारखे आहे अशी टीका करण्यात आली आहे मात्र आई आपल्या मुलास सतत ६० वर्ष उपाशी ठेऊन कधी मुडदा पाडते का ??? असा सवालही किशोर तिवारी यांनी शिवसेनाला केला आहे . विदर्भावर होत असलेला अन्याय आता अती झाला आहे विदर्भाचे शेतकरी व आदिवासी यांनी वाचविण्यासाठी वेगळा विदर्भ हाच मुक्तीचा मार्ग आहे व रक्तपात न होता तात्काळ देणे हाच मागील निवडणुकीचा निरोप आहे जसा भाजपला समजला तसा शिवसेनेला का समजत नाही असा सवालही तिवारी विचारला आहे . 


झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगडच्या रांगेत विदर्भाला नेऊन ठेवू नका व विदर्भाची भाषा अखंड महाराष्ट्राच्या केशरी दुधात मिठाचा खडा हे  शिवसेनेनं विधान विदर्भाच्या जनतेचा उपमान असुन शिवसेने विदर्भ विरोधी भुमिका निवडणुकीचा प्रमुख मुद्दा केला होता यामुळेच अनेक हाडाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवार दारूण पराभवाला समोर गेले हे सत्य उद्धवजिना कोण  सांगणार असा सवालही तिवारी यांनी केला आहे. 
मागील ६० वर्षात विकासाचे असमतोलामुळे व मराठी माणसाचे वाढलेली जनसंख्या व  प्रशासनिक समस्यांचा डोंगर , प्रादेशिक प्रश्नांचा महापूर यामुळे आता एक नाही कमीतकमी तीन मराठी राज्याची गरज आहे मात्र भाषेच्या नावावर आपल्याच मराठी माणसाच्या कुपोषणाचे बळी व शेकऱ्यांच्या आत्महत्यांचे पिक व लोखो काम मागणारे मराठी हात का दिसत नाही असा सवालही तिवारी यांनी केला आहे . ज्या मराठी माणसाच्या अस्तिवाचा ठेका घेतल्याचा दावा करतांना त्या मराठी जनतेला का विचारत नाहीत व त्यांचा जनादेश केंव्हा मानणार असा सवालही तिवारी यांनी केला आहे .