Monday, 27 October 2014

विदर्भात कापुस - सोयाबीन उत्पादक शेतकरी नापिकी व बाजाराच्या मंदीने प्रचंड संकटात - भारत सरकारने आश्वासीत हमीभावाने तात्काळ खरेदी करावी

विदर्भात कापुस - सोयाबीन उत्पादक शेतकरी नापिकी व बाजाराच्या मंदीने  प्रचंड संकटात - भारत सरकारने 
आश्वासीत हमीभावाने तात्काळ खरेदी करावी 

दिनांक -२७ ऑक्टोबर २०१४

विदर्भातील २० लाखावर शेतकऱ्यांनी सुमारे ३० लाख हेक्टर मध्ये कापसाची व सोयाबीन या नगदी पिकाची पेरणी केलेल्या कोरडवाहु शेतकऱ्यांना पाऊसाने दगा दिल्याने या दशकातील सर्वात उत्पन होत असुन त्यातच जगात कापसाला व सोयाबीनला मंदीचे पडसाद बाजारात पडत असुन शेतीमालाचे भाव हमीभावापेक्षा कमी भावात व्यापारी घेत असुन एकीकडे उत्पन जेमतेम ३०% होत असतांना लागवडीचा खर्च दुपट्टीने वाढला असतांना पहिलेच कर्जबाजारी असलेले शेतकरी उपासमारीला तोंड देत असुन अशा कठीण समयी भारताच्या लाडक्या संवेदनशील पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी लागवड खर्च अधिक ५० % नफा या प्रमाणे हमीभाव देऊन कापसाची व सोयाबीनची खरेदी विदर्भात तात्काळ करावी अशी मागणी भाजपला लोकसभेत व विधानसभेत खुला पाठींबा देणारे विदर्भ जन आंदोलन समितीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मोदींना केली आहे . 
जगात कापसाचे भाव प्रती पौंड १३४ सेंट वरून ६६ सेंट आले असून चीन सुद्धा भारताच्या कापसाची आवक ५० % कमी करणार या मंदीच्या वातावरणात विदर्भात कापुस उत्पादक शेतकरी दुष्काळाच्या घायेत आत्महत्या करीत असुन मागील दोन महिन्यात विदर्भात ३०० च्या वर तर यावर्षी ९०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून मागील लोकसभेत महायुतीने लागवड खर्च अधिक ५० % नफा असा हमीभाव व संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली होती मात्र आज कोणताही नेता यावर बोलत नाही यामुळे शेतकरी  फसवल्यागेल्या सारखे  झाले असून मोदींनी तात्काळ महाराष्ट्राच्या शेती संकटावर दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी तिवारी यांनी केली आहे. 

यावर्षी शेतकऱ्यांनी तिबार पेरणी करून आपले कापुस व सोयाबीनचे पिक उभे केले होते मात्र १५ सप्टेंबर पासून पावसाची दडी, विविध किडींचा प्रकोप आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतच सोयाबीनची पानगळ , कापसाचे बोंडे सडल्यामुळे  आणी  सध्या कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन झालेली नापिकी जबाबदार असून मोठ्या प्रमाणात ऐन  दसरा -दिवाळी -निवडणुकी धामधूमित  शेतकरी आत्महत्या केल्या आहेत अशी  गंभीर अवस्था आहे व  खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहेत व कापसाचे उत्पन्न २०%  टक्का  होत आहे तर संपूर्ण सोयाबीन बरबाद झाले मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार झोपले आहे का असा सवाल ,तिवारी यांनी केला आहे . 

यावर्षी विदर्भातील तीस  लाख हेक्टरवरील सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे तर कापसाची बोंडे गळून पडली आहे  या परिस्थितीतून वाचण्यासाठी शेतकरी ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन यावरही पाणी फेरत आहे,निसर्ग प्रकोप शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. काल-पर्वापर्यंत हिरवे दिसणारे शेतशिवार उन्हाच्या तडाख्याने करपले आहे. सुरुवातीपासूनच पावसाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे. मृग आणि रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. उशिरा आलेल्या पावसाने पेरणी उशिरा झाली. सर्वाधिक फटका बसला तो सोयाबीनला व कापूस या नगदी पिकाला  मात्र पावसाचा लपंडाव सुरूच होता. सोयाबीन फुलोऱ्यावर असताना पावसाने पाठ फिरविली. परतीचा पाऊसही बरसला नाही. त्यामुळे आधीच कुपोषित असलेले पीक रोगाला बळी पडले. बुरशीजन्य रोगांचे प्रारंभी आक्रमण झाले. त्यानंतर मोझॅकने कहर केला. हिवरीगार दिसणारी पाने पिवळी पडू लागली. त्यातच उंट अळीचाही प्रकोप सुरू झाला. शेंगा हिरव्या अवस्थेत असतानाच सोयाबीनची पानगळ झाली. सोयाबीनच्या झाडाला पाने नाही आणि अपरिपक्व शेंगा दिसत आहे. अशा स्थितीत अपुऱ्या पाण्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरवरील सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे कापसाची नापिकी पेक्षाही जास्त आहे त्यातच निसर्गाच्या लहरीपणासोबतच वीज वितरणाचा मनमानी कारभारही शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. सध्या कृषी फिडरवर २२ तासाचे भारनियमन होत आहे. केवळ दोन तास वीज उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे,मात्र शेतकऱ्यांचा . कोणीच वाली दिसत नाही अशा अडचणीत शेतकर्याना मोदींनी मदतीचा हात द्यावं अशी आशा  तिवारी यांनी व्यक्त केली

No comments:

Post a Comment