Friday, 26 September 2014

"मागण्या मान्य करेल त्यालाच करा मतदार -किशोर तिवारी यांचे आवाहन -पाच ऑक्टोबरला निर्धार मेळावा -दिव्यमराठी


"मागण्या मान्य करेल त्यालाच करा मतदार -किशोर तिवारी  यांचे आवाहन -पाच ऑक्टोबरला निर्धार मेळावा -दिव्यमराठी 
***शेतकरीसर्वसामान्यांच्या मागण्यासंदर्भात सर्व प्रमुख राजकीय पक्षांशी संपर्क करून येत्या पाच आॅक्टोबरला निर्धार मेळाव्यात घोषणा करण्यात येईल, अशी माहिती विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली आहे. ***
प्रतिनिधी | यवतमाळ
जोपक्ष संपूर्ण पीक कर्जमाफी, कापूस -सोयाबीनला हमीभाव टोलमुक्त महाराष्ट्र देईल, त्यालाच मतदान करण्याचे आवाहन विदर्भ जनांदोलन समितीचे अध्यक्षकिशोर तिवारी  यांनी केले आहे. 
शेतकरी आदिवासी आर्थिक संकटाला तोंड देत असताना राजकीय पक्ष जनतेच्या मूळ मागण्यांना बगल देत अाहेत. केंद्रामध्ये भाजपचे मोदी सरकार आल्यावर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 'महायुतीने' सात-बारा कोरा करण्याचे, लागवड कर्ज अधिक ५० टक्के नफा कापूस, सोयाबीन धानाला देण्याचे तसेच संपूर्ण महाराष्ट्र 'टोलमुक्त' करण्याचे आश्वासन दिले होते. महायुतीचा 'घटस्फोट' झामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात बदल झाला आहे. मात्र, उपरोक्त मागण्यांची ठोस अंमलबजावणी होईल काय, हा प्रश्नच आहे. विधानसभा निवडणुकीत जे शेतकऱ्यांच्या मूळ मागण्या सोडवण्यास प्राधान्य देतील, त्यांनाच विदर्भाच्या शेतकरी, आदिवासी तसेच नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन तिवारी यांनी केले आहे. सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार दारिद्रेषेचे कार्ड सर्व गरिबांना अंत्योदय अन्नसुरक्षा घरकुल, कोरडवाहू शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसांची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे, कापूस -सोयाबीन - धानासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव देणे, सर्व आदिवासींना तत्काळ खावटी देणे, दुष्काळग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना शेतमजुरांना सरसकट खावटी वाटप करणे, सर्व गरिबांना २०१३ च्या यादीनुसार मोफत वैद्यकीय सेवा सर्व सरकारी दवाखान्यांत जेनरिक औषधीचे दुकान, सर्व शाळांना दुपारचे जेवण अक्षयपात्र योजनेनुसार देण्यात यावे यासह अनेक मागण्या जाहीरनाम्यात टाकण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षांना साकडे घालणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment