राजकीय पक्षांना पडलाय शेतकऱ्यांच्या समस्यांचा विसर -मदतीची संपली आस-विदर्भ जनआंदोलन समितीचा आरोप -दिव्यमराठी
| ||
प्रतििनधी | यवतमाळ
| ||
शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असताना तसेच दुबार, तिबार पेरणीची मदत मिळाल्याने अडचणीत आले असताना त्याला मदत मिळेल, यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत. आता तर आचारसंहिता लागल्याने तातडीच्या मदतीची अपेक्षाही संपली आहे. उपासमारीला तोंड देत असलेल्या आदिवासींना खावटीची मदत देता कपडे पैसे वाटण्याचा प्रयत्न नेते करीत असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला. विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित होताच राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू झाली. विविध राजकीय पक्षांचे नेते, मंत्री आणि आमदार कामाला लागले आहेत. आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून गेल्या काही दिवसांत वाटाघाटी सुरू असली, तरी मेळावे आणि बैठकांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. उमेदवारी कशी मिळेल, यासाठी आघाडी आणि महायुतीमधील अनेक इच्छुक नेते मुंबई आणि दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. राज्यातील मंत्र्यांनी आता उमेदवारी मिळेलच, यादृष्टीने तयारी सुरू केली असून, केवळ स्वत:च्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांची काय स्थिती आहे, हे बघायला आता कुणालाच वेळ राहिलेला नाही. या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या तिबार पेरणी मदत, सात-बारा कोरा करणे, कापूस सोयाबीनच्या हमीभावात वाढ या समस्यांचा मुद्दा बाजूला सारून विविध राजकीय पक्षांचे नेते आणि इच्छुक उमेदवार मते वळवण्याकडे लक्ष देत आहेत. सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतर मंत्री आणि विविध पक्षांतील राजकीय नेत्यांना वेळच मिळणार नाही. तीन महिन्यांत झाल्या ६० जणांच्या आत्महत्या यवतमाळजिल्ह्यात मागील तीन महिन्यांत ६० च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, सरकारला आणि विरोधी पक्षांतील नेते उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. यावर्षी जून, जुलैमध्ये पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिकांचे आणि शेतीचे नुकसान झाले. आपला 'अजेंडा' घोषित करावा शेतकऱ्यांनीकर्ज घेतले आहे, मात्र परतफेड करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नाही, अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी निदान शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा. आचारसंहितेमुळे आता मदत मिळणार नसली तरी सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत आपला 'अजेंडा' घोषित करावा,अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केला आहे |
Friday, 19 September 2014
राजकीय पक्षांना पडलाय शेतकऱ्यांच्या समस्यांचा विसर -मदतीची संपली आस-विदर्भ जनआंदोलन समितीचा आरोप -दिव्यमराठी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment