Tuesday, 15 July 2014

विदर्भात वरुण देवाने कृपा केली मात्र आघाडी सरकारची उपेक्षा सुरूच :लगतच्या तेलंगाना प्रमाणे बियाणे व मदत व कर्जमाफी देण्याची विदर्भ जनआंदोलन समितीची मागणी

विदर्भात वरुण देवाने कृपा केली मात्र आघाडी सरकारची उपेक्षा सुरूच :लगतच्या तेलंगाना प्रमाणे बियाणे व मदत  व कर्जमाफी देण्याची विदर्भ जनआंदोलन समितीची मागणी


यवतमाळ : १८ जुलै २०१४
विदर्भात दुष्काळाचे सावट अधिक तीव्र होत असतांना वरुण देवाने लाखो शेतकरी व शेतमजुरांची हाक एकूण १७ जुलै भरपुर कृपा केली असून ४५ दिवस मान्सूनने दगा दिल्याने मागील वर्षीच्या भीषण दुष्काळाच्या सामना करणाऱ्या विदर्भातील शेतकर्‍यांवर दुबार व तिबार पेरणीची पाळी आली आहे. अशीच अवस्था लगतच्या तेलंगाना राज्यातही आहे मात्र तेलंगणाच्या व आंध्रच्या सरकारने तीन हेक्टर पर्यंत रुपये १२,००० प्रती हेक्टरी  प्रमाणे मदत २४ जूनलाच दिली आहे तर त्या तेथील सरकारने १ लाखापर्यंतचे कोरडवाहू शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ केले आहे मात्र महाराष्ट्राचे नाकर्त्या सरकारने आजही आम्ही सर्वेच करीत आहोत व संपूर्ण अहवाल आल्यावर मदतीचा निर्णय घेऊ अशी भूमिका घेतल्याने यावर्षी पिक कर्ज वंचित ,दुबार-तिबार पेरणी मोडलेले शेतकरी आपली शेती करण्यापासून वंचीत राहतील कारण सध्या गावात व खेड्यात सावकारतर  सोडा किराणा दुकानदारही उधार देत असून मजुरी नसल्यामुळे शेतमजूर उपासमारीला तोंड देत आहेत त्याचवेळी हजारो कोरडवाहु शेतकरीसुद्धा  मागील वर्षाच्या दुष्काळामुळे  ज्वारी ,धान ,तूर व गहु न पिकल्यामुळे  उपासमारीला तोंड देत आहेत या सर्व  हवालदिल झालेल्या कर्जबाजारी शेतकर्‍यांना सरकारी मदत, बियाणे व नवीन कर्ज मिळाले नाही तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे हे लोण सर्व विदर्भात पसरण्याची भीती विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. 
मुख्यमंत्र्यांनी विदर्भ -मराठवाड्याला भेट द्यावी 

सातारा -सोलापूरचा दौरा करून चारा- पाणी व तिथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वर तोडगा शोधणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी   विदर्भाचा दौरा करून  मागील १ जून पासुन सरकारी आकडेवारी नुसार आत्महत्या केलेल्या ५६ शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन तात्काळ मदतीचा निर्णय घ्यावा कारण एकीकडे यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना शासन मात्र कुठलाच निर्णय घेताना दिसत नाही असे चित्र दिसत आहे,तरी  मुख्यमंत्र्यांनी विदर्भाला भेट द्यावी अशी विनंती तिवारी यांनी केली आहे .
मागील तीन वर्षापासून कोरडा वा ओला दुष्काळाचे संकट आल्यामुळे ९० टक्के शेतकऱ्यांना बँकाची  दारे बंद झाली आहे व आज  शेतकऱ्यांना कोणीच पैसे देत नसून जिल्हा सहकारी बँक सक्तीची वसुली करीत आहे विशेष म्हणजे घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथील कोरडवाहू शेतकरी दादाराव मोरे याच्यावर याच महिन्यात जिल्हा सहकारी बँकेने वसुलीची नोटीस बजावल्या नंतर त्याने आपली जीवनयात्रा मागील आठवड्यात संपविली आहे . सरकारी बँका पुनर्वसन तर सोडा पात्र शेतकऱ्यांना सुद्धा पिक कर्ज नाकारत आहे अनेक बँक अधिकारी उघडपणे लाज घेऊन नवीन केसेस करीत आहेत मात्र प्रशासन झोपले आहे . आंधळी  सरकार दळत व  अधिकारी -राजकीय नेते खात आहेत अशी विदारकता गावत दिसत असुन   एकीकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असताना प्रशासन व शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. दोन वर्षांपासून विदर्भात सतत दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. यंदासुद्धा भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दुबार पेरणीसाठी २५ हजार रुपये हेक्टरप्रमाणे मदत, नवीन पीककर्ज, अन्न व चारा यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, कापसाचा व सोयाबीनचा हमीभाव शेती शास्त्रज्ञ स्वामिनाथन यांच्या शिफारशीप्रमाणे कर्ज व ५0 टक्के नफा या फॉर्म्युल्याप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणीसुद्धा तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे विदर्भ जनआंदोलन समितीच्यावतीने बियाणे-खतासाठी मदत व पीक कर्ज वाटप करा, या मागणीसाठी १२ जुलै रोजी पांढरकवडा येथील हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत उपोषण सत्याग्रहाचे आयोजनही केले होते व मागण्याचे निवेदनही सरकारला वारंवार देली आहेत परंतु आम्ह्ची हाक कोणीच ऐकत नाही असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे   . 

No comments:

Post a Comment