Sunday, 13 July 2014

विदर्भात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्र सुरु :२४ तासात आणखी तीन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली

विदर्भात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्र सुरु :२४  तासात आणखी तीन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली 

दिनाक -१३ जुलै २०१४ 
विदर्भात दुष्काळाचे सावट अधिकच तीव्र असून शेतकऱ्यांनी केलेली तिबार पेरणीही नष्ट झाल्यामुळे मागील २४ तासात आणखी तीन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी  आत्महत्या केल्याच्या घटना विदर्भाच्या नागपुर ,अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातून समोर आल्या असुन शेतकरी आत्महत्यांचे सत्र विदर्भात पुन्हा सुरू झाले आहे कारण मागील ४ दिवसात शेतकऱ्यांच्या एकूण सहा आत्महत्या समोर आल्या असुन या सर्व  दुबार-तिबार पेरणीच्या संकटाने हवालदिल झालेले कर्जबाजारी शेतकरीच असुन जर सरकारी मदत - बियाणे व नवीन पिक कर्ज मिळाले नाहीतर शेतकऱ्यांच्या  शेतकऱ्यांच्या आत्महत्या लोण सर्व विदर्भात पसरण्याची भीती  विदर्भ जन आंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली  आहे . 
शनिवारच्या रात्री यवतमाळ जिल्यातील घाटंजी तालुक्याच्या घोटी या गावच्या प्रयाग भुराजी जाधव या दुबार-तिबार पेरणी मोडलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने कीटकनाशक पाषाण करून आत्महत्या केली ह्या शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी उप-जिल्हाधीकार्याना आपले रोजगार हमी योजनेचे विहिरीचे  थकीत मदत न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली होती व आज त्याने खरच आपली जीवनयात्रा संपविली . घाटंजी तालुक्यातील सर्वच शेतकरी हवालदिल झाले असून ,घरी खाण्यास अन्न नाही ,पिण्यास पाणी नाही ,जनावरांना चारा नाही अशी माहिती शेतकरी नेते मोहन जाधव यांनी यवतमाळ वैद्यकीय विद्यालयात प्रयाग जाधव यांच्या शवविझेदननंतर  शेतकऱ्यांशी चर्चा करून दिली . कैलाश गटफने  उतखेड जिल्हा अमरावती व सुभाष राउत घरदड  जिल्हा नागपूर या दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या  दुबार-तिबार पेरणीच्या संकटाने  आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत मात्र सरकार झोपले आहे .  बियाणे - खतासाठी मदत व पीककर्ज वाटप करा या मागणीसाठी  १२ जुलैला पांढरकवडा येथे हजारो  शेतकरयानी  सरकारचे लक्ष या संकटाकडे  ओढण्याकरिता व  मदतीसाठी उपोषण सत्याग्रह केले असुन  सरकारने आमची हाक ऐकावी अशी विनंतीही तिवारी यांनी केली आहे . 
पांढरकवडा तालुक्यातील (यवतमाळ) वारा -कवठा  या खेड्यातील शेतकरी जयंतराव मिसाळ (४०) या शेतकऱ्याने गुरुवारच्या रात्री दोन वाजता आपली बायको व दोन चिमुकली  मुले झोपली  असतांना  गळफास लावून आत्महत्या केली . जयंतराव मिसाळ ३ एकर  शेतीमध्ये केलेली दुबार पेरणीही वाया गेल्याने तिबार पेरणी बियाणे उधारीवर मिळावे यासाठी आदिलाबाद ,पाटणबोरी व पांढरकवडा येथे सतत आठ दिवस फिरला व कोणीच मदत न दिल्यामुळे आत्महत्येचा मार्गावर गेला . जयंत मिसाळ याने स्टेट बँक व आदिलाबादच्या महेंद्र बँके कडून कर्ज घेतले आहे .  अशीच तिबार पेरणीचीचे  भीषण संकट घाटंजी तालुक्यातील  (यवतमाळ) सायतखर्डा येथील  कोरडवाहु शेतकरी दादाराव नागो  मोरे यांनी केलेली दुबार पेरणी मोडल्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा  संपविली होती . दादाराव मोरे यांना याच महिन्यात जिल्हा सहकारी बँकेने वसुलीची नोटीस दिली होती हे बाब समोर आली आहे 
 पूर्व विदर्भाच्या धान उत्पादक क्षेत्रात सुद्धा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांना आत्महत्या करावयास लावत असुन दुबार पेरणी करूनही पावसाअभावी पऱ्हे सुकत असल्याने लाखनी तालुक्‍यातील(भंडारा -गोंदिया) डोंगरगाव येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. सोनिराम श्रावण मेश्राम (वय ४२), असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सोसायटीचे 14 हजार रुपयांचे कर्ज आहे. हंगामाशिवाय इतर वेळी मासेमारी करून ते कुटुंबाचा चरितार्थ चालवायचे. शेतात दुबार पेरणी केली; पण पावसाअभावी पुन्हा रोपे नष्ट होत असल्याच्या चिंतेने सोनिराम यांनी मंगळवारी रात्री शेताजवळील मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.विदर्भातील सर्वच खेड्यात दुबार -तिबार पेरणी होत असुन सरकार मात्र मदतीला सोडा परंतु   साधी विचारपुस करण्यास तयार नाही
विदर्भात ८ लाखावर  शेतकर्‍यांनी केलेली दुबार  पेरणीहि आता  वाया गेली आहे. आता पुन्हा तिबार पेरणी करण्यासारखी त्यांची स्थिती नाही. विदर्भ व मराठवाड्यात सर्व  ठिकाणी शेतकर्‍यांची गंभीर परिस्थिती असताना राज्य व केंद्र सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, सरकारकडून मदत, मोफत बियाणे आणि खावटी मिळावी, या मागण्यांसाठी शेतकरी करीत आहेत मात्र सरकारने सर्वांना वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप   किशोर तिवारी यांनी केला आहे . दोन वर्षांपासून विदर्भात दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकार त्यांना तुटपुंजी आर्थिक मदत जाहीर करत असते. मात्र, ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. या वेळीसुद्धा तशीच स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ व मराठवाडय़ात दुष्काळ पडला आहे. दुबार पेरणीसाठी २५ हजार हेक्टरप्रमाणे मदत, नवीन पीक कर्ज, अन्न व चारा पाणी यासाठी सरकारशी पाठपुरावा करावा लागणार आहे. कापसाचा व सोयाबीनचा हमीभाव शेती शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांच्या शिफारशीप्रमाणे कर्ज व ५० टक्के नफा या फार्मुल्याप्रमाणे मोदी सरकारला देणे आवश्यक होते मात्र हि मागणीही केराच्या टोपलीत टाकल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढणार असुन सरकारने तात्काळ मदत करावी व विदर्भाच्या शेतकऱ्यांना वाचवा अशी मागणी ,तिवारी यांनी केली आहे

No comments:

Post a Comment