Saturday, 12 July 2014

विदर्भाचे दुष्काळग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करणार -सरकारी मदत, बियाणे, कर्जमाफी व संपूर्ण वीजमाफीसह सर्व आदिवासींना नवीन खावटीसाठी उपोषण सत्ताग्रहात एकमुखी ठराव

विदर्भाचे दुष्काळग्रस्त  जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करणार  -सरकारी मदत, बियाणे, कर्जमाफी व संपूर्ण वीजमाफीसह सर्व आदिवासींना नवीन खावटीसाठी उपोषण सत्ताग्रहात   एकमुखी ठराव 
दिनांक -१२ जुलै २०१४
 शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. सरकारला अनेक निवेदने पाठवल्यानंतरही ते मदत द्यायला तयार नाही आत्ता जर  तात्काळ शेतकर्‍यांना सरकारी मदत, बियाणे, कर्जमाफी व संपूर्ण वीजमाफीसह सर्व आदिवासींना नवीन खावटी देण्यात आली नाही तर हजारो शेतकरी व शेतकरी विधवा यवतमाळ जिल्हाधिकरी कार्यालयावर १ ऑगस्टला हल्लाबोल आंदोलन करतील व मागण्या मान्य होतपर्यंत आमरण उपोषण करतील , अशी घोषणा   आज वतमाळ जिल्ह्य़ातील पांढरकवडामध्ये उपोषण सत्याग्रहात शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली . आज या आंदोलनात हजारो शेतकरी व शेतकरी विधवा शामील झाले होते . 
मान्सूनने महाराष्ट्राच्या विदर्भ व मराठवाड्याच्या कोरडवाहु कापुस व सोयाबीन उत्पादक  शेतकऱ्यांवर कहरच केला असुन  १० लाखावर शेतकरी आणी २० लाखावर उपासमारीची वेळ आली असून 


शेतकऱ्यांनी केलेली पहिली आणि दुसरी पेरणी वाया गेली असून आता तिसरी पेरणी आर्थिक परिस्थिीमुळे शेतकरी करू शकत नाही. विदर्भात शेतकऱ्यांची गंभीर  परिस्थिती असताना राज्य व केंद्र सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून  सरकारकडून मदत, मोफत बियाणे आणि खावटी मिळावी, या मागण्यांसाठी आज  शेतकरी व शेतकरी विधवा यवतमाळ जिल्ह्य़ातील पांढरकवडामध्ये उपोषण सत्याग्रह केले होते . यामध्ये  पांढरकवडाचे माजी नागराध्यश अनिल तिवारी शेतकरी नेते मोहन जाधव ,सुरेश बोलेनवार ,अंकीत नैताम ,मारेश्व्वर वातीले ,प्रेम चव्हाण ,भीमराव नैताम ,शेखर  जोशी,नंदकिशोर जैस्वाल ,नितीन कांबळे ,सुनील राउत ,प्रीतम ठाकूर ,मनोज मेश्राम ,गजेंद्र आष्टेकर ,राजू राठोड ,सुधाकर गोहणे ,नंदकिशोर लांडे ,प्रमोद अलोणे ,सुधाकर शिवनवार सह शेतकरी विधवा अपर्णा मालीकर ,भारती पवार ,रेखा गुरनुले ,शीला मांडवगडे ,ज्योती जीद्देवार ,चंद्रकला मेश्राम व उमा जीद्देवार सहभागी  झाले होते .
मोदी सरकारने कापसाचा हमीभाव व सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन पुर्ण न केल्याची खंत यावेळी किशोर तिवारी यांनी व्यक्त केली व महायुतीच्या नेत्यांना सोबत घेऊन आपण मोदींना साकडे टाकणार ,अशी घोषणाही किशोर तिवारी यांनी केली .
 कापसाला भाव व कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती हाच एकमेव पर्याय असुन सरकारने ह्या  मागण्या पुर्ण केल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत यासाठी हा लढा पुढे  रेटण्याची घोषणाही आज करण्यात आली .  
गेल्या दोन वर्षांपासून विदर्भात दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकार त्यांना तुटपुंजी आर्थिक मदत जाहीर करीत असते. मात्र, ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असतो. यावेळी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील अनेक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहेत. मात्र, त्याकडे सरकारचे लक्ष नाही. राज्य सरकार सध्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहे, तर दुसरीकडे 'अच्छे दिन आये' अशी घोषणा करीत सत्तेवर आलेले केंद्र सरकार फारसे गंभीर असल्याचे दिसून येत नाही. जून महिन्यात ७, ११ १७ व २४ तारखेला पावसाने हजेरी लावल्यावर शेतकऱ्यांनी कापसाची आणि सोयाबीनची सुमारे २० लाख हेक्टर क्षेत्रावर केलेली पेरणी पूर्णपणे नष्ट झाली असून दुबार व तिबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडय़ावर दुष्काळाचे सावट निर्माण झाली आहे.
या संदर्भात विदर्भ जन आंदोलन समितीचे प्रमुख आणि शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी सांगितले, शेतकऱ्यांसमोर उपोषणाशिवाय पर्याय नाही. दुष्काळाचा प्रचंड फटका हा यवतमाळ जिल्ह्य़ाला बसला आहे. त्यामुळे शेतकरी या जिल्ह्य़ामध्ये उपोषण करणार आहेत. या उपोषणात शेतकऱ्यांना सरकारी मदत, बियाणे, कर्जमाफी व संपूर्ण वीज माफीसह सर्व आदिवासींना नवीन खावटी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या विधवा या उपोषणात सहभागी होणार आहेत. हजारो शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी बियाणे विकत घेण्यासाठी घरचे सोने गहाण ठेवून बँकेतून पीक कर्ज घेतले आहे आणि ते सुद्धा वाया गेले आहे. शेजारच्या तेलंगणा सरकारने तात्काळ हेक्टरी दहा हजार रुपये मदत केली आहे. शिवाय सोने गहाण ठेवून घेतलेले कर्ज माफ केले आहे, पण राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि नेते सध्या विधानसभा निवडणुकीच्या कामात आहेत. राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येणार आहे. 
राज्यात पिण्याचे पाण्याचे संकट असून आणीबाणीचे स्वरूप समोर येत असताना आघाडी सरकार व मुख्यमंत्री खुर्ची व निवडणुकीच्या राजकारणात व्यस्त आहेत. तर शेतकरी चिंतेने आत्महत्या करीत आहेत. नेत्यांनी सरकार व प्रशासनाची पत कायम ठेवण्यासाठी संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, असेही तिवारी म्हणाले. पाऊस लांबल्याने या वर्षीचा खरीप हंगाम बुडणार हे निश्चत झाले आहे. एकीकडे बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे बाजारात बोगस बियाणे आले आहे, बियाण्यांचे भाव चढत आहे. या चक्रव्यूहात बळीराजा भरडला जात असताना सरकार मात्र झोपले आहे, असा आरोप तिवारी यांनी केला.
हजारो शेतकर्‍यांनी केलेली पेरणी वाया गेली आहे. आता पुन्हा पेरणी करण्यासारखी त्यांची स्थिती नाही. यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे, तर अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची गंभीर परिस्थिती असताना राज्य व केंद्र सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, सरकारकडून मदत, मोफत बियाणे आणि खावटी मिळावी, या मागण्यांसाठी 12 जुलै रोजी शेतकरी व शेतकरी विधवा पांढरकवडा येथे उपोषण सत्याग्रह करणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली आहे. 
दोन वर्षांपासून विदर्भात दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकार त्यांना तुटपुंजी आर्थिक मदत जाहीर करत असते. मात्र, ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. या वेळीसुद्धा तशीच स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत, मात्र त्याकडे सरकारचे लक्ष नाही. जून महिन्यात 7, 11, 17 व 24 तारखेला पावसाने हजेरी लावल्यावर शेतकर्‍यांनी कपाशीची आणि सोयाबीनची सुमारे 20 लाख हेक्टर क्षेत्रावर केलेली पेरणी पूर्णत: नष्ट झाली असून, दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळेच पांढरकवडा येथे मदतीसाठी उपोषण आंदोलन आज हजारो शेतकरी व शेतकर्‍यांच्या विधवा उपोषणात सहभागी झाल्याचे ,किशोर तिवारी यांनी  यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment