Thursday, 10 July 2014

रालोआ सरकारच्या कृषिमूल्य स्थिरीकरण निधी, भूमिहीन शेतकऱ्यांना पिक कर्ज व शेतीकामाचा नरेगा समावेशाचे स्वागत पण हमीभाव व कर्जमाफीवर चुप्पीने निराशा केली -किशोर तिवारी

रालोआ सरकारच्या कृषिमूल्य  स्थिरीकरण निधी, भूमिहीन शेतकऱ्यांना पिक कर्ज व शेतीकामाचा नरेगा समावेशाचे स्वागत पण  हमीभाव व कर्जमाफीवर चुप्पीने निराशा केली -किशोर तिवारी    

१० जुलै २०१४

भारताचे  अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज मोदी सरकारचा पहिल्या बजेटमध्ये हमीभाव वाढीचा मोदीचा  फार्मुला सरकार   अमंलात आणणार व आत्महत्याग्रस्त कोरडवाहू शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माफी करणार ही अपेक्षा होती मात्र ती न झाल्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांची निराशा झाली अशी प्रतिक्रीया शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली . 
सरकारने कृषिमूल्य स्थिरीकरण निधी केलेली घोषणा व भारताच्या कोट्यावधी भूमिहीन शेतकऱ्यांना पिक कर्ज ,कोरडवाहू क्षेत्रात विषेय सिंचन निधी ,फ्लोरिडग्रस्त हजारो गावांना विषमुक्त  पाण्याची याजना ,आदिवास्याना विषेय योजना ,रोजगार हमी योजनेमधून शेतकऱ्यांना मजुरी या सर्व घोषणाचे ,किशोर तिवारी यांनी स्वागत केले आहे 

 विदर्भ व मराठवाड्यामध्ये अभूतपूर्व दुष्काळ पडला आहे ,आता दुबार पेरणी साठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत ,नवीन पिक कर्ज , अन्न व चारा -पाणी या साठी सरकारशी पाठपुरावा करावा लागणार आहे ,कापसाचा व सोयाबीनचा हमीभाव प्रख्यात शेती शास्त्रज्ञ एस स्वामीनाथन यांच्या शिफारशीप्रमाणे खर्ज व ५० टक्के नफा या फार्मुल्याप्रमाणे देणे मोदी सरकारला देणेच आहे व त्या हमीभावावर खरेदी होणे आवश्यक आहे सरकारने आज   कृषिमूल्य  स्थिरीकरण निधीची घोषणा करून सुरवात केली आहे आता हमीभाव घेण्यासाठी आम्ही  लढा देऊ ,अशी माहीती किशोर तिवारी यांनी दिली . 

महाराष्ट्रात २० लाखावर शेतकर्‍यांनी केलेली पेरणी वाया गेली आहे. आता पुन्हा पेरणी करण्यासारखी त्यांची स्थिती नाही. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची गंभीर परिस्थिती असताना राज्य व केंद्र सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून सरकारकडून मदत, मोफत बियाणे आणि खावटी मिळावी, या मागण्यांसाठी 12 जुलै रोजी शेतकरी व शेतकरी विधवा पांढरकवडा येथे उपोषण सत्याग्रह करणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment