Monday, 9 June 2014

राओला सरकारचा पहिला अर्थसंकल्पामध्ये 'विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी ' रु. ३०,हजार कोटीचे विषेय तरतूद करा - किशोर तिवारी

राओला सरकारचा पहिला अर्थसंकल्पामध्ये 'विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी ' रु. ३०,हजार कोटीचे विषेय तरतूद करा - किशोर तिवारी 
नागपुर -९ जुन २०१४
भारताच्या राष्ट्रपतींनी  शेतकऱ्यांना व कृषीला दिलेल्या आश्वासन नंतर नव्या आशा घेऊन  महाराष्ट्राच्या विदर्भातील ३० लाख  आत्महत्याग्रस्त  नैराय्य व  कर्ज मुले उपासमारीला तोंड असलेले शेतकऱ्यांनी भारताच्या नवीन अर्थमंत्र्यांना विदर्भाला शेतकरी आत्महत्या मुक्त करण्यासाठी पिक कर्ज ,वाढीव भाव देण्यासाठी विषेय अर्थिक मदत व कापूस -सोयाबीन वर आधारीत उद्योग लावण्यासाठी रु. ३०,हजार कोटीचे विषेय तरतूद करा ,अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी एका निवेदनाद्वारे केली आहे 
विदर्भ हा प्रांत स्वतंत्र भारतामध्ये उपेषित व मागास राहीला आहे शेतकरी आत्महत्या ,आदिवासींचे कुपोषण ,भूकबळी , विकासाच्या ,सिंचनाच्या,उद्योग योजना कट रचुन देण्यात आल्या नाहीत यामुळे विदर्भ गुलामगीरीत आला असून यामुळे विदर्भात मोवोवाद वाढला आहे.  शेतकरी ,आदिवासी ,युवक या ६० वर्षाच्या अन्नायामुळे  नैराय्य व दुखामुळे सरकारपासून दूर जात आहे करीता आपल्या पहील्या अर्थ संकल्प मध्ये  विषेय रु. ३० हजार कोटीचे पकेज द्यावे ,अशी मागणी किशोर तिवारी केली आहे . 
निवेदनामध्ये अर्थ मंत्र्याचे लक्ष पंतप्रधान मोदी यांनी विदर्भाच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या जी कारणे वारंवार मांडली आहे त्यानुसार कापसाला व सोयाबीनचा हमीभाव ,सर्वांना  पिककर्ज  ,नवीन सिंचन सुविधा ,नवीन टेक्नोलोजी साठी भकम्म  निधी देणे अत्यंत आवश्यक आहे . मोदी सरकारने 'राष्ट्रीय शेतकरी आत्महत्या निर्मुलन आयोगाची ' स्थापना करावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. 
भारताचे अर्थमंत्री दिल्लीच्या पोटभरू शेतीचा गंध नसणाऱ्या तथाकथीत कृषी क्षेत्रातील जाणकारांना बोलावून विचारणा करीत आहेत तर ज्या नौकरशाहीमुळे  शेतकऱ्यांच्या मागील दशकात २  लाखावर आत्महत्या झाल्या ,चुकीच्या भांडवलदारी धोरणामुळे शेतीमध्ये रेकॉर्ड उत्पादन होत आहे आणी शेतकऱ्याच्या आत्महत्या सुद्धा रेकॉर्ड होत आहेत त्याच सल्ला विकणाऱ्या लोकांनी सरकारमध्ये गर्दी केली आहे यामुळेच आम्ही विदर्भाचा विषेय पकेज रेटत आहोत ,ज्या महाराष्ट्रात मागील दशकात सरकारी आकडेवारी प्रमाणे ५५,०००हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणी विदर्भ शेतकरी आत्महत्यांची राजधानीच  झाली आहे म्हणून विदर्भ विषेय पकेज  आवश्यक झाले आहे . 
मोदीविदर्भाच्या शेतकऱ्यांचे मागणीपत्र आम्ही सरकारला सादर केले आहे . सरकारने आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाजार करून विसरू नये अशी विनंती किशोर तिवारी अर्थ मंत्री अरुण जैटली यांना केली आहे. 

No comments:

Post a Comment