Sunday, 29 June 2014

११३ वर्षांच्या इतिहासात महाराष्ट्रात मान्सूनचा सर्वात कमी पाऊस : कापूस धान व सोयाबीन उत्पादक दुष्काळाच्या संकटात : शेतकर्‍यांना दुबार पेरणीसाठी बियाणे व पीक कर्ज तात्काळ द्या -किशोर तिवारी

११३ वर्षांच्या इतिहासात महाराष्ट्रात मान्सूनचा सर्वात कमी पाऊस : कापूस  धान व सोयाबीन उत्पादक दुष्काळाच्या संकटात : शेतकर्‍यांना दुबार पेरणीसाठी बियाणे व पीक कर्ज  तात्काळ द्या -किशोर तिवारी

विदर्भ -३० जून २०१४ :
मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही संपूर्ण जून महिना जवळजवळ कोरडाच गेला. या महिन्यातील पावसाची सरासरी तूट टक्के इतकी आहे. गेल्या ११३ वर्षांच्या इतिहासात मान्सूनचा पाऊस इतका कमी पडण्याची आणि   ६० तूट राहण्याची ही पहिलीच  वेळ आहे. संपूर्ण विदर्भ व मराठवाडा दुष्कालाचाच सामना करीत असुन  मान्सूनच्या पावसाची ही भीषण तूट चिंताजनक असुन  शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे ,बँकेकडून पिक कर्ज , चारा ,पाणी व अन्नसुरक्षा  अत्यंत गरजेचे असुन मात्र सरकार व प्रशासन पेरणी झालीच नाही अशी भुमिका घेत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे तर बिमा कंपन्या  सरसकट मदत तात्काळ मिळणार असे आमिष देऊन  लोखो रुपये  या उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांकडून  जबरीने वसुल करीत आहे . महाराष्ट्रात सरासरी ३७ मिमी पाऊस बरसताच शेतकर्‍यांनी पेरणीच्या कामाला प्रारंभ केला गत आठ दिवसात ३०लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक २० लाख हेक्टरक्षेत्र कपाशीच्या लागवडीचे आहे तर ८ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. २ लाख हेक्टरवर इतर लागवड करण्यात आली यामध्ये तुरी ज्वारी आणि मूग, उडीदाच्या क्षेत्राचा समावेश आहे मात्र आता पेरणीनंतर पाऊस नसल्याने पेरणी करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्राच्या २० लाखाहेक्टरवरील कोरडवाहू क्षेत्रातील दुबार पेरणीचे संकट अटळ असून सरकारने शेतकऱ्यांना आता बियाणे वाटप करावे व नव्याने कर्ज द्यावे अशी मागणी विदर्भ जनांदोलन समीतीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे .
संपुर्ण महाराष्ट्रात पाण्याचे संकट  आणीबाणीचे स्वरूप घेऊन समोर येत मात्र आघाडी सरकार  व मुख्यमंत्री  खुर्चीचे व निवडणुकीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत तर  शेतकरी चिंतेने व दुबार पेरणीच्या धक्क्याने आत्महत्या करीत हा प्रकार  तर फारच  किळसवाना  या नेत्या  आपली नाही तर सरकार व प्रशासनाची  पत जिवंत ठेवण्यासाठी सवेन्दनशीलता  दाखऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा ,अशी आग्रही विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे. 


मृग नक्षत्रात पाऊस बरसेल व १० जून नंतर मान्सूनचे आगमन झाले या वेधशाळेच्या बातम्यावर विश्वास ठेऊन महराष्ट्रातील सुमारे ८ लाखावर कोरडवाहू विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या २० लाखावर हेक्टरवरील शेतकर्‍यांनी पेरणीची हिंमत केली आता पावसाने दगा दिल्यामुळे बुडाली असून ,मागील तीन दिवसात पडलेले भयंकर उन्ह व अधीक तापमान त्यामुळे टोबलेले बियाणे अंकुरले परंतु त्यानंतर पाऊसच झाला नाही. आता प्रचंड उकाड्याने अंकुर कोमेजत आहे. बाजारात बियाणे नाहीत व बँकांनी पीक कर्ज वाटप सुरु केलेले नाही सावकाराच्या पैशाने करण्यात आलेली धुळ पेरणी पावसाअभावी उलटली आहे, महागडे बियाणे पेरुनही मृग संपला तरी पाऊस कोसळला नाही. त्यामुळे बियाणे करपले आहे ,शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत . मृग नक्षत्रात हमखास पाऊस बरसतो, या आशेवर शेतकर्‍यांनी धूळ पेरणी केली. रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीला पेरणी करण्यात आली. महागडे कपाशीचे बियाणे टोपण्यात आले. ज्यांच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी स्प्रिंकलरद्वारे ओलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारनियमनाने ओलितही पुरेपूर करता आले नाही अशा स्थितीत महागडे बियाणे उद्ध्वस्त झाले आहे. पुन्हा दुबार पेरणी करावी लागणार आहे,मायबाप सरकारने निवडणुकीच्या तोंडावर तरी कोरडवाहू क्षेत्रातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदत करावी अशी कळकळीची विनंती किशोर तिवारी मुख्यमंत्र्यांना केली आहे
पावसाळ्याची नक्षत्रे सुरू होऊन महिना लोटला. मात्र रोहिणी व मृग नक्षत्र कोरडेच गेले. त्यामुळे शेतजमीन अजूनही कोरडीच आहे. काही शेतकर्‍यांनी कोरड्यातच सरकीची टोबणी केली, परीणामी ९२ टक्के शेतकरी कोरडवाहू शेती ज्यामध्ये कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात त्या शेतकर्‍यांवर संकट ओढवले.
१७ तारखेला महाराष्ट्रात पाऊस पडला व आता पाऊस जोर धारणार म्हणून काही शेतकर्‍यांनी या अपुर्‍या पावसाच्या ओलातच बियाणे टाकले आणी तेव्हापासून पावसानेच दडी मारली आज जुन संपला तरी पाऊस आलेला नाही . सध्या दररोजच आभाळत ढग येतात. परंतु पाऊस मात्र कोसळत नाही. ज्यांनी पेरण्या केल्या, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट आले आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे यावर्षीचा खरीफ हंगाम बुडणार हे निश्‍चित झाले आहे. एकीकडे बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे बोगस बियाण्यांचा बाजारात प्रवेश झाला आहे. अस्सल बियाण्यांचे भाव चढत आहे. या चक्रव्यूहात बळीराजा भरडला जात आहे मात्र लोकनेते व सरकार झोपले आहे ,असा आरोप किशोर तिवारी लावला आहे. 

No comments:

Post a Comment