Saturday, 21 June 2014

हमीभावा अन्यायामुळेच शेतकरी आत्महत्या-हमी भावाचा प्रश्न महायुती रेटणार-लोकमत


हमीभावा अन्यायामुळेच शेतकरी आत्महत्या- किशोर तिवारी यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा-लोकमत 


यवतमाळ : विदर्भामध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भामध्ये घेण्यात येणारे कापूस, सोयाबीन व धान्याच्या हमीभावामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
कापूस, सोयाबीन व धानाच्या हमीभावाचा प्रश्न महायुतीच्यावतीने रेटण्यात येणार असून या संदर्भात किशोर तिवारी यांनी १७ जून रोजी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व आमदार सुभाष देसाई यांनी तीन तास प्रदीर्घ चर्चा केली. मातोश्रीवर झालेल्या या तीन तासांच्या चर्चेमध्ये महाराष्ट्राच्या कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने विशेष कृती कार्यक्रम घोषित करावा, याकरिता शिवसेनेने गांभीर्याने सर्व प्रश्नांचा व नैराश्याचा सखोल अभ्यास सुरूकेला असून सर्व प्रश्नांची एकत्रित मांडणी करून महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या व शेतकर्‍यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा संकल्प उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
या प्रयत्नांचा पहिला टप्पा शेतकर्‍यांच्या शेती मालाला रास्ता भाव मिळवून देणे व शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी व नैराश्याच्या मूळ प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्णयही १७ जूनच्या बैठकीत घेण्यात आला. महायुतीच्या खासदारांकडून राज्यातील कोरडवाहू शेतकर्‍यांच्या हमी भाव व पीक कर्ज यासारख्या गंभीर प्रश्नांवर केंद्र सरकारने एक निश्‍चित कार्यक्रम जाहीर करावा, तसेच येत्या निवडणुकीत शेतकर्‍यांना सुखाचे दिवस यावे यासाठी धोरणे निश्‍चित करण्याचे ठरविण्यात आले. 
मागील सरकारने जाता जाता कृषी मूल्य आयोगामार्फत येणार्‍या हंगामामध्ये कापूस, सोयाबीन व धानाचे हमीभाव घोषित करताना कापसाला जेमतेम ५0 रुपये भाववाढ दिली. सोयाबीन व धानाच्या हमीभावाला मात्र पाने पुसण्यात आली. मात्र त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाचे हमीभाव लागवडीचा खर्च व त्यावर ५0 टक्के नफा जुळवून निश्‍चित करण्याचे व त्यासाठी या हमीभावावर शेतकर्‍यांचा माल घेण्यासाठी व्यापार्‍यांसोबत सरकारनेसुद्धा बाजारात व्यवस्था उभी करण्याचे ठोस आश्‍वासन दिले होते. या हमी भावाच्या फॉर्म्युल्यामुळे कापसाला सहा हजार ८00 रुपये प्रतिक्विंटल, सोयाबीनला पाच हजार ४00 रुपये व धानाला कमीत कमी तीन हजार २00 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. येणार्‍या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, असे आवाहनही तिवारी यांनी केले आहे

No comments:

Post a Comment